पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

माईल्स टू गो बिफोर आय स्लीप

इमेज
    The woods are lovely, dark and deep,       But I have promises to keep,       And miles to go before I sleep अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या “स्टॉपिंग बाय वूड्स” या कवितेतील या ओळी प्रेरणा देतात असं वाटतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट   यास प्रवासात सहज सुचलेलं हे काव्य खूप साध आहे पण शेवटच्या चार ओळीं मध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. जो खरोखरी प्रेरणादायी आहे. दोन दिवसापूर्वी कामानिमित्त बाहेर पडलो होतो त्यावेळी एफ.एम. वर (कार मध्ये) प्रसिद्ध शो सुरु होता त्यामध्ये निवेदकाने या कवितेचा उल्लेख केला आणि काही काळा साठी मी भूतकाळात गेलो. या ओळी सर्वप्रथम मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नावाने तयार केलेल्या कॅलेंडर वर पाहिल्या, वाचल्या होत्या, आणि त्याच दिवशी या ओळीनी हृदयात घर केलं होत. आयुष्यात प्रेरणा घेण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही, लागते ती फक्त इच्छाशक्ती, ती असली कि झालं, आणि आपण हि त्यादिशेने वाटचाल सुरु करतो.                     कवी रॉबर्ट प्रवासा दरम्यान जंगलातून जाताना त्याने हि कविता लिहिली असावी कारण त्यात तो म्हणतो आहे वूड्स आर लव्हली डार्क अँड डीप, जंगल आणि निसर्ग

एप्रिल फुल

इमेज
मार्च एंड आणि येणारा एप्रिल यामध्ये मजेचा दिवस, दिवस आनंदात घालवण्याचा दिवस असं म्हणू फार तर आपण, मला आठवतं शाळेत असताना एक एप्रिल ला सकाळी झोपेतून उठविताना बाबा हमखास “एप्रिल फुल” करायचे, कधी “आजी आली आहे” म्हणून तर कधी “कोण आलयं बघ तरी” अस म्हणून अंथरुणातून उठायला लावायचे आणि मग कसं “एप्रिल फुल” बनविलं म्हणून हशा पिकायचा आणि मग सुरु व्हायचं आई-बाबांना “एप्रिल फुल” करण्याचं सत्र, जे दिवसभर चालायचं, सुरुवात घरातून व्हायची आणि मग मित्राना “एप्रिल फुल” करण्यात एक औरच मजा यायची. आता मात्र आयुष्य खूप फास्ट झालयं, खूप बिझी झालयं अस वाटतं कारण एक एप्रिल ला “एप्रिल फुल” म्हणायला हि वेळ नाही, आणि सुचतं हि नाही, कारण व्यापच एवढा वाढलाय !! शीघ्र कवी म्हणून ख्याती असलेले हसरत-जयपुरी यांनी लिहिलेल्या गीता मधली मस्ती तुम्ही कधी अनुभवली आहे का? शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि मो.रफी यांचा बहारदार आवाज त्या गाण्यात सुद्धा खट्याळ पणा अनुभवता येतो. अशी मस्ती करण्यास आज कुणीही अडविलेले नाही पण वेळ परवानगी देत नाही, तसे पाहिले तर “एप्रिल फुल” यास पाश्चात्य संस्कृती आहे. याचे उगमस्थान सांगणे कठीण आहे