पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

स्फूर्तीदायक “रायगड”

इमेज
  कर्तव्य, निष्ठा, समर्पण, स्फुरण, चेतना, स्थिरता, दृढता, अखंडता, अभेद्य (आजही रायगडावर अस्तित्व टिकवून असणारे, इतिहासाची साक्ष देणारे विविध भाग) अशी अनेक बिरुदं जो सार्थ ठरवितो तो “रायगड” “बा रायगड”, छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड ( शिवतीर्थ रायगड ) , छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड, छत्रपती राजाराम महाराज यांचा रायगड, महाराणी ताराराणी यांचा रायगड, असंख्य मावळ्यांचा रायगड, मराठ्यांचा रायगड, सदैव अखंड प्रेरणा स्त्रोत ठरणारा रायगड, अशा या रायगडास जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं तेंव्हा त्यांनी उद्गार काढले,   “हा किल्ला बलाढ्य आहे, जणू काही एखाद्या खडकाच्या डोंगरावरून छन्नी घेऊन काम केले आहे, अगदी उंच खडकावर गवतही उगवू शकत नाही, सिंहासनासाठी हा एक दृष्टान्त आहे.” ते खरही आहे. रायगडाच्या मातीत अशी काही ऊर्जा आहे की जी लाखों मावळे आजही घेण्यासाठी दुरून येतात. आम्हीही (मी आणि माझी सौ) त्यापैकीच एक, मुलांना (आदित्य, आरोहि) जाज्वल्य इतिहास समजावा, आणि त्यातून प्रेरणा घेऊन आयुष्यात कार्यरत रहावं , हाच रायगड भेटीचा उद्देश. ११ व्या शतकात यादवकाल पासून २५ एप्रिल १८१८ ब्रिटिश रायगड