पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

“आदर्श” बनण्याचा क्यु-आर कोड

इमेज
  आजच्या लेखांमध्ये वापरण्यात आलेला क्यु-आर कोड, आदर्श असा अर्थबोध देतो, तो फक्त स्कॅन करून “आदर्श” होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं, नाही का? ज्यास आदर्श व्यक्ति व्हायचं आहे त्याने क्यु-आर कोड स्कॅन करावा, पण असे होत नाही, असे करता येत नाही, मग आदर्श बनण्याचा क्यु-आर कोड नक्की काय आहे? हे आजच्या लेखात पाहुयात..   आयुष्यात आपण कुणाचा आदर्श होऊ म्हणून कुणी त्यासाठी परिश्रम करीत नाहीत, आदर्श बनतात ते त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यां मुळे, केलेल्या सामाजिक योगदान आणि दूरदृष्टि मुळे , त्यांचा नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सर्वात महत्वाचं म्हणजे गरुडझेप घेण्याची जिद्द या सर्व बाबी मुळे एक आदर्श व्यक्तिमत्व घडतं , लोक आजकाल फक्त लाईम लाइटच्या झगमगाटास भुलतात आणि त्यासच आदर्श मानू लागतात. जे सर्वस्वी चुकीचे आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांती साठी प्रार्थना १३ व्या शतकात लिहून ठेवली होती जी आजही प्रेरणा देते. अवघ्या हिंदुस्थानाचे अखंड प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज- आजही त्यांची शिकवण , त्यांचे विचार धीरोदात्त मानून चालणारे अनेक