पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

माऊली

इमेज
  पंढरीचा पांडुरंग , विठ्ठल भाविकांचे श्रद्धास्थान , संतांचे प्रेरणास्थान , भक्ती भावनेचा अतूट धागा विठ्ठला भोवती गुंफला गेला आहे , “ श्री विठ्ठल महाराष्ट्राचे परमदैवत आहे.” वर्षातून चार वेळा अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून वारकरी वारी करतात आणि पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेतात , डोळाभेटच म्हणायची ती ! दर्शन होताच जन्म धन्य झाल्याचे समाधान मिळते. हे समाधान खूप मोठं असतं ते फक्त अनुभवता येतं आणि शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूर कडे निघतात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने विठ्ठलाचे स्मरण करीत असतो , भक्तीत तल्लीन असतो , वारी अनुभवता आली पाहिजे , वारीची शिस्त , वारीत केली जाणारी सेवा आणि दिंडीत दिसणारी , अनुभवास येणारी माणुसकी ! या दिंडीत सहभागी सगळे वारकरी सारखेच भासतात कारण प्रत्येकाचा भाव एकच असतो “विठ्ठल” , त्याच्याशी ते सगळे एकरूप झालेले असतात. शेकडो वर्षापासून संतांच्या आणि सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यामध्ये दिंड्या सहभागी असतात , वारी एक साधना असून दिंडी हे साधन आहे असं मानणारा हा संप्रदाय , भागवत संप्रदा