पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

प्रेरणादायी मुखपृष्ठ कसे तयार करावे ?

इमेज
नीला आणि निलेश दोघे सच्चे दोस्त, शाळे पासून एकत्र वाढलेले, एकत्र शिकलेले आणि एकत्रच पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला. फक्त प्रवेश घेताना निलेश ला उशीर झाल्याने निलेश ची आणि नीला ची प्रात्यक्षिक बॅच वेगळी असायची आणि मागील सुट्टीत निलेश मामाच्या गावाला गेलेला असल्याने त्याचा एम.एस.सी.आय.टी. हा कोर्स करायचा राहिला आहे. कॉलेज मध्ये एव्हाना विविध स्पर्धे संदर्भात सूचना येवू लागल्या आहेत आणि प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना या स्पर्धामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करत आहेत. नीला एक एम.एस.सी.आय.टी.यन असल्याने संगणकाच्या विविध प्रोग्राम्स चा वापर शैक्षणिक कामात अगदी योग्य प्रकारे करते. आंतर विद्यापीठ एका स्पर्धे मध्ये नीला आणि निलेश ने भाग घेतला आहे, दोघांचे वेग वेगळे ग्रुप्स आहेत.            सेमिनार रिपोर्ट तयार करणे त्यासाठी विविध सर्च टूल्स चा वापर करणे या सर्व बाबी नीला ला माहिती असल्याने त्यानुसार तिने त्यांच्या ग्रुप चा रिपोर्ट चुटकीसरशी तयार देखील केला व त्यास आकर्षक मुखपृष्ठ सुद्धा दिले यामुळे तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी निलाचे कौतुक केले. त्या दिवशी घरी जाताना निलेश नी

मिटिंग चे मिनिट्स काढणे- एक कौशल्य

इमेज
          “अभय, उद्या होणाऱ्या आपल्या कंपनी मिटिंग चे मिनिट्स तुला काढायचे आहेत, तयारीत रहा !” अभय च्या बॉस ने अभयला फर्मावले. त्यावर अभय थोडा घाबरला कारण त्याने या अगोदर कधीही मिटिंग चे मिनिट्स काढले नव्हते. त्याने बॉस ला होकारार्थी मान हलवली आणि केबिनच्या बाहेर येताच टीम लीड ची भेट घेतली व मिनिट्स बद्दल त्याच्याकडे विचारणा केली पण टीम लीड कडे अगोदरच बॉस ने इतर कामे दिली होती त्यामुळे त्याला अभय शी बोलायला देखील वेळ नव्हता. आता मात्र अभयच्या डोळ्यासमोर तारे चमकू लागले, त्याला काय करावे कळेना, तो त्याच्या डेस्कवर विचारात बसलेला असताना त्याचा कंपनी मधील मित्र सत्यजित तिथे आला आणि त्याने अभयला विचारले, का रे अभय, काय झाल ? कशाचा विचार करतो आहेस?, अभय लागलीच म्हणाला, बॉस ने मिटिंग मिनिट्स काढायला सांगितले आहेत उद्या !! यावर सत्यजित म्हणाला , “मग त्यात काय एवढा विचार करण्यासारख?”, “अरे खुप सोप आहे हे काम !”, चल मी तुला शिकवितो. यावर अभय म्हणाला, “थँक्स यार !!” , सत्यजित म्हणाला तुला एम.एस.ऑफिस माहिती आहे का?”, अभय म्हणाला, “थोड फार येत पण पूर्ण माहिती नाही,” सत्यजित पुढे म्हणाला, एम

शोले

इमेज
          काही चित्रपट अप्रतिम असतात काळाच्या पुढे असणारे आणि आजही मनाला भुरळ घालणारे असतात असाच एक चित्रपट ज्याने इतिहास रचला आणि आजही तो कोणत्याही वाहिनीवर लागला तर आपण पाहतोच पाहतो... असा “शोले” रमेश सिप्पिंचा अदभूत, एकमेवाद्वितीया अविष्कार !! आजही नव्या पिढीला शोले चे गारुड आहे, हि पिढी देखील प्रत्येक भूमिका तेवढ्याच आनंदाने पाहते जेवढा आनंद आपण घेवून पहात होतो. ४५ वर्षे झाली या चित्रपटास प्रदर्शित होऊन मग तो जेलर चा सीन असेल, कालिया चा “कितने आदमी थे?”, अथवा गब्बर च्या क्रूर पणाचा कळस दाखविण्यासाठी हात तोडलेला पण तितकाच स्वत:च्या निर्णयावर ठाम असलेला निडर ठाकूर असेल, प्रेमात वेडा असलेला पण गोष्टी ऐकायला मित्रा कडे पाठविणारा विरू असेल वा संयमी जय असेल, प्रत्येक भूमिका प्रत्येक कलाकाराने जिवंत केली आहे. मग बसंती, विधवा राधा, ठाकूरचा प्रामाणिक सेवक- रामलाल, रहीम चाचा, त्याचा मुलगा अहमद वा खूपच सुरेख संगम रमेश सिप्पी यांनी केला . चित्रपट शुटींग सुरु करायच्या वेळी अख्ख गाव वसविण्यात आले होते असा प्रोजेक्ट करणारे सिप्पी बहुधा पहिलेच असावेत. वडिलांनी (चित्रपटाचे निर्माते) मुलावर टा