पोस्ट्स

Bollywood लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

राजेश खन्ना – बॉलीवुडस् फर्स्ट सुपरस्टार

इमेज
  “पुष्पा”, आय हेट टिअर्स”, “अमर प्रेम” चित्रपटातील फेसम डायलॉग ! जितक्या सहजतेने राजेश खन्ना यांना हे साध्य झालं आहे ती क्वचितच कुणास जमलं असतं, ती एक राजेश यांची स्टाइलच होती. मी एक डाय-हार्ट अमिताभ बच्चन फॅन आहे पण आज राजेश खन्ना यांच्या विषयी लिहितो आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे काही अप्रतिम चित्रपट ! अनेक फॅन्सच्या काळजाचा ठेका चुकवेल अशाच स्टाइल राजेश मिरवीत असतं. स्टारडम काय असतं आणि ते कॅरि करणं हे सारं बॉलीवुडने प्रथम अनुभवलं ते राजेश खन्ना यांच्या मुळेच ! सलग १५ चित्रपट सुपरहिट ! असा रेकॉर्ड देखील राजेश यांचेच नावे आहे. आणि अद्याप त्याची बरोबरी करण्यात कोणत्याच कलाकारास यश मिळालेलं नाही. राजेश यांच्या पूर्वी देखील स्टार होते, पण राजेश यांनी तो काळ गाजवला ! युवतींनी रक्तरंजित पत्रं प्रथम याच कलाकारास लिहिली गेली असं वाचण्यात आहे. चित्रपटास उत्तम संगीत, किशोरचा सदाबहार आवाज साथीला, नव कथानक आणि सहज अभिनयाच्या जोरावर राजेश यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. राजेश यांच सुरुवातीच्या काळातील अनेक चित्रपट एका पेक्षा एक आहेत पण सदैव लक्षात राहिलेले सदाबहार अभिनयाने नटलेले म्हणाल त...

अँग्री यंग मेन

इमेज
  “आज ! खुश तो बहोत होगे तुम” हा डायलॉगच एवढा दमदार आहे, की तो चित्रपटगृहांत ज्याने कोणी पाहिला तो त्या शॉट वर फिदा झाला नाही, तर नवलचं !! ही संवाद लेखकाची जादू तर आहेच पण तो ज्या ताकदीने अमितजींनी सादर केला आहे त्यास आजतागायत तोड नाही. ७० च्या दशका पासून ते अगदी ९० च्या दशका पर्यन्त कथा, पटकथा आणि संवाद यावर मजबूत पकड असणारे दोन मित्र ! ज्यानी बॉलीवूडला अनेक हिट्स, सुपर डुपर हिट्स चित्रपट दिले,  अनेकांचे संसार या जोडीमुळे उभे राहिले, हो संसार ! आजही ही मंडळीनी “शो” ची तिकटे सांभाळून ठेवलेली आहेत. ज्यावर त्यांची पहिली कमाई झाली , ती तिकिटे !! थोड आश्चर्य नक्कीच वाटेल पण खरं आहे. तर, दमदार संवाद, कथा आणि पटकथा याचे धनी सलीम-जावेद, यांनी चित्रपटात अनेक प्रयोग केले. “ अँग्री यंग  मॅन ” हे बिरुद अमितजीना यांच्या मुळेच मिळालं ! प्रकाश मेहरा यांना “जंजीर”च कथानक आवडलं पण या कथेत चित्रपटाच्या नायकास एकही गाणं नव्हतं, (संगीत प्रधान चित्रपटांचा काळ) त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी “जंजीर” नाकरला होता. त्यातच एके दिवशी महमुद यांचा “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना स...

पंचम

इमेज
  “ याद आ रही है , तेरी याद आ रही है” , २७ जून पंचम ‘दा’ चा ८ ३ वा वाढदिवस , कालच एका FM वर वाढदिवसाच सेलिब्रेशन सुरु झालं होतं आणि मनात पंचम च्या संगीताची लहर उमटली आणि त्यांची विविध सदाबहार गाणी भाव-विश्वात तरळू लागली. संगीताची जाण आणि विविध रागांवर असणारी पकड पंचमदा ं ची जमेची बाजू होती. पंचमदा बाबतीत एक किस्सा ऐकिवात आहे , जेंव्हा युवा पंचम ने संगीत देण्यास सुरुवात केली तेंव्हा ते फारसे कोणास परिचित नव्हते , पण त्यांचा एक परिचय सर्वश्रुत होता तो म्हणजे महान संगीतकार एस.डी.बर्मन यांचे सुपुत्र !! जेंव्हा पंचम कुठे बाहेर जात तेंव्हा लोक म्हणत , “ वो देखो एस.डी.बर्मन का बेटा जा रहा है |” काही कालावधी नंतर जेंव्हा पंचम दा ना पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांचे संगीत लोकप्रिय झाले तेंव्हा एस.डी. बर्मन  यांना पाहताच लोक म्हणू लागले , “ वो देखो पंचम के पिताजी जा रहे है |” एका बापाला याच्या पेक्षा कोणते मोठे सुख असेल कि त्याला त्याच्या मुलाच्या कर्तृत्वा मुळे लोक ओळखू लागतात. हिंदी चित्रपट सृष्टीत एस.डी.बर्मन म्हणजे वटवृक्ष , या वटवृक्षाच्या छायेत वाढायचं आणि स्वत:च वेगळ अस्तित्व निर्म...

शतकातील महानायक – अमिताभ बच्चन

इमेज
  शतकातील महानायक – अमिताभ बच्चन शतकातील महानायक , शहेनशहा , अँग्री यंग मॅन अशी अनेक बिरूद श्री अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड ने दिली. त्यांची लोकप्रियता एवढी आहे कि ते प्रत्येक भारतीयाच्या मनावर आजही (वय वर्ष ८४ ) राज्य करतात. एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून त्यांच जीवन हे एक प्रेरणास्त्रोतच वाटत मला. २०१५ साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देण्यात आला. बॉलीवूड मधील त्यांच योगदान अमुल्य आहे. ७० च्या दशकात जेंव्हा राजेश खन्ना हे नाव प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करीत होत , बॉलीवूड चा सुपरस्टार बिरूद ज्याने कमी काळात मिळवलं अशा काकाजींचा तो काळ , त्याकाळात अमितजी यांची एन्ट्री आणि ती सुद्धा अँग्री यंग मॅन !! आनंद (आनंद मरा नही आनंद मरते नही) आणि नमकहराम (किसने सोनू पे हात उठाया , कौन है जो अपनी माँ का दुध आजमाना चाहता है ?) या दोन चित्रपटात हि जोडी दिसली. यामध्ये अमित जी नी आनंद मध्ये अभिनयाची झलक दाखविली आणि नमकहराम मध्ये तर पूर्ण चित्रपटात फक्त अमितजी आणि अमितजी ! असं ऐकिवात आहे कि हृषीकेश मुख...

पंडित हृदयनाथ मंगेशकर- अलौकिक बुद्धिमत्ता

इमेज
  लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में ज़िन्दगी आ रहा हूँ मैं......           १९८४ मध्ये प्रदर्शित झालेला “मशाल” हा यश चोप्रा यांचा चित्रपट,या चित्रपटात अनिल कपूर यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर गीत, जावेद अख्तर यांचे बोल, गायलं होतं किशोरदा नी आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी..... एका नवीन आयुष्यास भेटायला निघालेला युवक ज्याने पुढील आयुष्य चांगल्या मार्गाने जगण्याचा संकल्प केलेला असतो, चित्रपट सुपरहिट होता आणि चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. मग ते “मुझे तुम याद करना और”, असेल अथवा “होली आयी रे”, असेल सगळी गाणी अगदी मिडास टच !! म्हणूनच “ओल्ड इज गोल्ड” !! हिंदी चित्रपट सृष्टीत पंडितजीनी इतरही काही चित्रपट केले ज्यामध्ये लेकीन, माया मेमसाब, लाल सलाम, धनवान यांचा उल्लेख करता येईल.       शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या घरात २६ ऑक्टोबर १९३७ मध्ये पंडितजींचा जन्म झाला, त्यांच्या वडीलांचं निधन झाल तेंव्हा पंडितजी अवघ्या चार वर्षाचे होते. घरात कानावर पडणारा रियाज त्यातूनच संगीत शिकण्या...

किशोर कुमार- अगर तुम ना होते

इमेज
  किशोर म्हंटल कि आवाजाची जादू, किशोर म्हणजे वेडेपणा, बालीशपणा, किशोर म्हणजे प्रेमवीराचा आवाज, किशोर म्हणजे दु:ख, करुणा, हास्याचा फवारा अशी एक ना अनेक रूपे किशोरदा  जगले आणि आजही आपल्या स्मृती मध्ये जिवंत आहे !! ‘किशोर दा’ अस म्हणालो कि किशोर जवळचा वाटतो, अगदी घरातला एक सदस्य हो ना ? आपले लाडके किशोरदा यांचा आज वाढदिवस, मी वाढदिवसच म्हणेन कारण दादा आपल्या प्रत्येकाच्या स्मृतीत आजही आपली सुरेल सोबत करत आहेत.  त्यांच्या आवाजामुळे आजही दादा आपल्या आजू-बाजूस आहेत असेच वाटते. कारण त्यांच्या आवाजाची जादू न्यारीच होती, कुणीही अगदी सहज प्रेमात पडेल, कोणालाही सहज मोहून टाकेल (अनेक उदाहरणे देता येतील, पण शराबी चित्रपटातील “लोग कहते है मै शराबी हुं”,या गीताचा शेवट असाच मोहून टाकणारा आहे). संगीत न शिकलेले पण सुरात कधीच कमी न पडलेले किशोर दा म्हणजे बॉलीवूड ला देवाने दिलेली एक देणगीच !!!           करिअर ची सुरुवात अभिनेते म्हणून केली हे आपण सर्वजण जाणतो, ते एक उत्कृष्ट कलाकार होते त्यांनी कित्येक चित्रपटात प्रमुख भूमिका देखील निभावल्या आहे...

कल्याणजी-आनंदजी- सांगितिक शिल्पकार

इमेज
  कल्याणजी-आनंदजी हिंदी चित्रपट सृष्टीतील एके काळचे आघाडीचे संगीतकार. एक एक गाणी म्हणजे जणू मोतीच ! जे गुंफले गेले एका माळे मध्ये आणि ती माळ म्हणजे कल्याणजी-आनंदजी. हे दोघे भाऊ, कल्याणजी मोठे आणि आनंदजी धाकटे, कल्याणजी वीरजी शहा यांचे वडील मुंबईत किराणा दुकान चालवायचे, याच दुकानातून केलेल्या खरेदीच्या रकमेपोटी एक गृहस्थ त्यांना संगीत शिकवू लागले आणि त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. कल्याणजी यांचा जन्म ३० जून १९२८ चा, आणि आनंदजी यांचा २ मार्च १९३३, त्यांची   सांगीतिक जडण घडण हि मुंबई तील गिरगांव येथे मराठी आणि गुजराती कुटुंबांच्या सानिध्यात झाली. कल्याणजी यांना खरा ब्रेक मिळाला हा त्यांच्या आवडत्या वाद्यामुळे, क्लाविओलिन प्रचलित शब्द ( सिंथेसायझर) या वाद्याच्या आधारे कल्याणजी “बीन” चा जादुई आवाज वाजवायचे, आणि त्यांच हेच कौशल्य त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत ब्रेक द्यायला उपयोगी पडलं, वर्ष होतं १९५४, या साली प्रदर्शित झालेला “नागिन” यामध्ये जी बीन वाजली ती कल्याणजी यांची, आणि मग सुरु झाला ऐतिहासिक सांगीतिक प्रवास. त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ला...

अतुलनीय “आनंद”

इमेज
  फिल्मफेअर मध्ये बेस्ट डायलॉग, बेस्ट स्टोरी, बेस्ट अॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट एडिटिंग हे पुरस्कार आणि सोबतच एक राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा चित्रपट म्हणजे “आनंद”, हो, हृषीकेश मुखर्जी यांचा आनंद, १९७१ साली प्रदर्शित हा चित्रपट तसे पाहिलं तर जीवनाची मूल्यं अगदी हसत, हसत सांगून जातो. “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही”, चित्रपटातील संवाद अप्रतिमच, एका पेक्षा एक सरस, जणू काही संवाद लिहिणाऱ्या “गुलजार” यांची स्पर्धा स्वत:शीच होती, “मुझसे एक कविता का वादा   है, मिलेगी मुझको”, एन.सी. सिप्पी आणि हृषिदा या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शन हृषिदा यांच, संगीत सलील चौधरी, हि सगळी भट्टीच माइंड ब्लोइंग ! जबरदस्त !! मग स्टारकास्ट हि तेवढीच दमदार, आनंद सहगल – जयचंद (राजेश खन्ना ), डॉक्टर भास्कर बॅनर्जी- बाबू मोशाय (अमिताभ बच्चन), रेणू (सुमिता सन्याल), डॉ. प्रकाश व सौ. सुमन   कुलकर्णी (रमेश व सीमा देव), इसाभाई (जॉनी वॉकर), सिस्टर डी सा (ललिता पवार) आणि इतर हि मंडळींनी या चित्रपटात योगदान दिलं. या चित्रपटास ५० वर्ष झाली म्हणून वाचण्यात आलं आणि वाटलं आपणही काही लिहायला...

पद्मश्री मो.रफी

इमेज
“ना फन्कार तुझसा तेरे बाद आया, मो.रफी तू बहोत याद आया”, १९९० साली प्रदर्शित झालेल्या क्रोध या चित्रपटातील हे गीत जे गायलं होत मो.अझीझ यांनी, या गीतातून रफी साहेबां विषयी एक प्रकरची कृतज्ञताच व्यक्त केली अस म्हणावे लागेल. आणि हे खरही आहे रफी साहेबां सारखा दुसरा गायक ना परत जन्माला आला ना परत येईल. रफींच्या आवजाशी साधर्म्य असणाऱ्या मध्ये शब्बीर कुमार, अन्वर, मो.अझीझ पासून थेट सोनू निगम पर्यंत हा प्रवास आहे, अजूनही काही गायक असतील हि..... पण या गायकांना प्रसिद्धी मिळाली. या गायक कलाकारांनी रफी साहेबांचा आवाज म्हणून बरेच ऑर्केस्ट्रा केले, चित्रपट केले. रफी यांना आपल्यातून जावून ४० वर्षे झाली. पण अजूनही “तेरे आने कि आस है दोस्त, तू कही आस पास है दोस्त” या त्यांनीच गायलेल्या गीता प्रमाणे ते आपल्या अवतीभवती आहेत असच वाटतं. तेरे आने कि.... हे रफी यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गीत..... एका कार्यक्रमात अपघाती संधी मिळाली आणि तो रफी यांचा पहिला कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात के.एन.सेहगल येणार होते पण ऐनवेळी लाईट गेली आणि आयोजकांना काय करावे सुचेना इतक्यात कुणीतरी रफी यांना गायला सुचविले, त...

पल पल दिल के पास – एक मास्टरपीस

इमेज
  संगीतकार कल्याणजी-आनंदजी , गीतकार राजेंद्रकृष्ण आणि किशोरदांच ऑल टाईम हिट गाणं , सगळ्यांच फेव्हरीट गाणं अशी ज्या गाण्याची ओळख सांगता असं गाणं म्हणजे “पल पल दिल के पास” , प्रत्येकाच्या ओठावर असणारं गाणं आणि तितकच “दिल के पास” सुद्धा असणारं , गाण्याची सुरुवात ज्याप्रकारे चित्रित केली आहे , त्यास त्याकाळी (मला वाटत सध्या देखील) तोडच नाही , राखी जी पत्र हातात धरून वाचत आहेत आणि धरमपाजी पत्रातून गाणं (नायिकेची कल्पना) म्हणत आहेत. जणू काही पत्रात तोच मजकूर लिहिला आहे. या गाण्याची खासियत मला आणखी एक वाटते , गाण पाहताना दोन स्क्रीन दिसतात , एकावर राखी जी दिसतात तर दुसऱ्या स्क्रीन मध्ये पाठीमागे धरमपाजी दिसतात. हा कल्पनाविष्कार खूपच उत्तमरित्या चित्रित केला आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेला ब्लॅकमेल हा विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट. भलेही चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही पण संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचं एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचं संगीत नक्कीच उजवं ठरतं. गाणं कसं चित्रित करावं यावर आनंदजी यांची चांगली पकड असायची त्यानुसार त्यांनी अनेक चित्रपटातून याची झलक दाखविली आहे पण य...