पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

सुजाण पालकत्व : II

इमेज
शुभम श्रीकांत घाणेकर, एक गोंडस मुलगा, अभ्यासात हुशार, विविध खेळात निपुण. शुभमच्या घरी आई वडील आणि लहान बहीण, शुभम लहानपणा पासून लाडात वाढलेला, शुभम चे वडील सरकारी नोकरीस होते आणि आई गृहिणी, शुभम साधारण चवथी मध्ये असेल, घरा शेजारी मित्र मंडळी कांही त्याच्या वयाची, काही त्याच्या पेक्षा वयाने मोठी, पण सगळी संध्याकाळी शाळेतून आली की धमाल मस्ती करायचे. शुभमची जी मित्र मंडळी वयाने मोठी होती त्यांच्या कडे खिशात कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे असतं, एके दिवशी गिरीश, शुभम चा मित्र त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, “शुभम, माझ्याकडे बघ किती पैसे आहेत?” , याचं शुभम ला खूप अप्रूप वाटलं, गिरीश कडे पैसे आहेत आणि आपल्याकडे नाहीत यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला, काय करावे त्यास कळेना, थोडा वेळाने स्वत:ची समजून घालून शुभम खेळण्यात गुंग झाला. त्या दिवशी रात्री झोपताना शुभम ला सारखा गिरीश डोळ्या समोर येत होता त्यास झोप काही येईना, पण त्यादिवशी कसा बसा शुभम झोपला. दुसरे दिवशी सगळ्या मित्रांचे दुपारीच भेटायचे ठरले होते त्याप्रमाणे सगळे मित्र गोळा झाले आणि खेळ सुरु झाला. त्यादिवशी शनिवार होता, शुभमच्य

सोशल मीडिया आणि सुजाण पालकत्व

इमेज
     शीर्षक वाचल्यावर तुम्हाला वाटलं असावं कि हि आजची गरज आहे. खूप वेळा अस होत कि   पालक जाणते-अजाणतेपणी लहान मुलांच्या हातात स्मार्ट फोन देवून टाकतात आणि गेम्स खेळ असा सल्ला देखील त्यास देतात, मग या गेम्स जरी शैक्षणिक असल्या तरी त्या खेळण्यासाठी स्मार्ट फोनचाच वापर केला जातोय हे आपण विसरतो. पण यामुळे मुलं स्मार्ट फोन च्या आहारी जात आहेत अस एकूण चित्र तयार होताना दिसतं आहे.  कोरोना या वैश्विक महामारी मुळे ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आणि पालकांनी मुलांच्या हातात स्मार्ट फोन स्वत:च दिले आहेत.        सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे पण योग्य वापर केल्यास यासारखे उत्तम टूल मिळणे कठीण ! असे माझे मत आहे. हा वापर सगळ्या वयोगटातील मंडळी करताना आढळतात पण एका सर्वेक्षणानुसार २२ टक्के किशोरवयीन मुले सोशल मीडिया वर दिवसातून किमान दहा वेळा लॉग इन करतात आणि यातूनच सुरु होते सायबर गुंडगिरी, एखाद्या विषयातून निराशा येणे, जाणते-अजाणतेपणी अश्लील व्हिडीओ, फोटो पाहिले जाणे आणि त्याची आवड निर्माण होणे हे सगळं न संपणार आहे. मग हे थांबेल कसं? यावर काही पर्याय आहे का?              खालील बाबींकडे आपण जाणीवपूर्व