पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

२०१८ मधील डिजिटल नेतृत्व

इमेज
२०१८ हे वर्ष डिजिटल युगाशी जोडलेले वर्ष ठरणार आहे अस विविध सर्वेक्षणामधून वर्तविण्यात येत आहे. आणि हे खर देखील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) याने तर तंत्रज्ञानामध्ये खूप बदल होणार आहे. अर्थात हे बदल मानवास पूरक असेच असणार आहेत. त्यामुळे जीवनशैली मध्ये अमुलाग्र बदल देखील अनुभवता येणार आहेत, हे नक्की ! पण हे बदल घडत असताना एक नव नेतृत्व तयार होण्याची नितांत गरज असते अस तज्ञाच मत आहे. मग त्या नेतृत्वामध्ये कोणती वैशिष्टये असावीत याच्या बद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत. मागील दशक हे इंटरनेट क्रांतीचे दशक म्हणून ओळखले गेले ज्यामुळे बऱ्याच बाबी आता सहज करता येतात जसे, मोबाईल रिचार्ज असेल अथवा मोबाईल पेमेंट असेल अथवा ऑफिसला पाठवायचा मेल असेल, सगळ अगदी चुटकी सरशी पाठविता येतं. प्रत्येक व्यक्ती आभासी एकमेकास जोडला गेलेला आहे, नाही का? या क्रांतिकारी परिस्थितीचा सामना करताना, आपल्याकडे दोन पर्याय आहेत, एक- हा बदल स्विकारायचा आणि या बदलाच्या लाटेवर स्वार व्हायचं नाहीतर जगाच्या मागे रहायचं !! या दोन पर्याय शिवाय तिसरा पर्याय उपलब्ध नाहीच. या सर्वा मध्ये डिजिटल नेतृत्वाल