पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

चॅट बॉट – मनोरंजक पण तितकच उपयोगी

इमेज
चॅट बॉट एक नव कोर तंत्रज्ञान जे तुम्हाला इंटरनेट च्या सहाय्याने संवाद साधण्यासाठी तयार केलेले आहे. हा संगणक प्रोग्राम आहे. एका सर्व्हे द्वारे अस समोर आल आहे कि इंटरनेट युजर्स हे सोशल मेडिया साईटस् पेक्षा मेसेंजर चा वापर जास्त करतात. अगदी हाच धागा पकडून चॅट  बॉट  ची निर्मिती केली जात आहे. काही नियम व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून चॅट  बॉट  ची निर्मिती होत आहे. हि सेवा कोणत्याही सेवेशी जोडता येवू शकते जसे कि काही ठराविक टास्क पासून गमतीसाठी चॅट  बॉट  वापरता येवू शकतो. चॅट बॉट हे तंत्रज्ञान आता इंटरनेट वरील जवळपास सर्वच ठिकाणी वापरलं जातं.  युजर्स सध्या विविध खरेदी ऑनलाईन करीत आहेत हि खरेदी करताना शक्यतो खरेदी करायची बाब ऑनलाईन सर्च केली जाते, त्या वेबसाईटवर ब्राउज केली जाते. साधारण पणे ती गोष्ट सापडत नाही तोपर्यंत ती सर्च केली जाते, इथेच चॅट  बॉट  चा वापर करता येतो, एखाद्या ऑनलाईन स्टोअर ने जर चॅट  बॉट  तयार केली तर दुकानामध्ये ज्याप्रकारे सेल्समन सोबत बोलणे होते अगदी त्याचप्रमाणे चॅट  बॉट  वर संवाद होवू शकतो यामुळे खरेदी करण अधिक सोप होवू शकत. चॅट  बॉट  ची काही उदाहरणे पाहूय

बीट कॉईन्स काय आहे ?

इमेज
बीट कॉईन्स, इंटरनेटवर  चर्चेत असलेल चलन, असं चलन जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि ते सोबत बाळगायचं देखील नाही कारण हे एक आभासी चलन आहे. थोडस आश्चर्य वाटल असेल, पण हे खर आहे. २००९ साली बीट कॉईन्स अस्तित्वात आले आणि २०१७ मध्ये त्यास प्रसिद्धीची झळाली मिळाली.   बीट कॉईन्स मध्ये कोणतीही बँक सहभाग नोंदवीत नाही, कोणताही एजंट या मध्ये सहभागी नसतो, तुम्ही थेट ज्यास पैसे देणे लागता त्यास ते ट्रान्सफर करू शकता यासाठी आभासी पाकीट तुम्हाला पुरविण्यात येते. हे आभासी चलन वापरण्यासाठी देशाची बंधने आडवी येत नाहीत, हे चलन देशाच्या सीमांनाही सहज ओलांडताना दिसून येत आहे. याचे पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येत नाहीत हि बाब विशेष आहे. काही मंडळी बीट कॉईन्स ची खरेदी गुंतवणूक म्हणून करताना आढळत आहेत, काय सांगावे भविष्यात त्याचा त्यांना योग्य परतावा मिळेल !!!           बीट कॉईन्स एक्सचेंज च्या माध्यमातून लोक बीट कॉईन्स खरेदी करीत आहेत हि खरेदी करताना देशाचे चलन महत्वाचे रहात नाही हि बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे. नुकतेच भारतामध्ये बीट कॉईन्स ज्यांच्या कडे आहेत असा संशय असणाऱ्यावर आ

मेल मर्ज काय आहे ?

रेखा आणि सुरेखा दोघी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत आता सर्वंकष मूल्यमापन पद्धती आल्यामुळे शिक्षकांना संगणकाचा वापर करणे अनिवार्य होत चालल आहे. अर्थात शिक्षण संगणकाचा वापर देखील करत आहेत. रेखा व सुरेखा दोघी मैत्रिणी एकाच वेळी शाळेत रुजू झाल्या आणि आपली सेवा बजावू लागल्या. शाळेतील मुलांच्या सर्वात जास्त आवडत्या शिक्षिका बनल्या आहेत. यामध्ये त्यांचे शैक्षणिक योगदान मोलाचे आहेच पण दोघीही प्रात्यक्षिक केंद्रित प्रशिक्षण देण्यामध्ये विश्वास ठेवतात त्यामुळे सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. शाळेत पुढील महिन्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालक दोघांसाठी आहे.                 नुकतीच मुख्याध्यापकानी सर्व शिक्षकांना माहिती दिली व कामास सुरुवात करा, जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक कार्यक्रमास कसे उपस्थित राहतील याकडे जातीने लक्ष द्या अशा सूचना केल्या. त्याचवेळी सुरेखा ने पुढे होत, आपण सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आमंत्रण पत्र पाठवावीत असे सुचविले. “पण एकाच वेळी एवढी पत्र लिहून आणि पोस्ट करून होतील?” , मुख्याध्यापकांनी सुरेखाला विचारल. य