ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ?
ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ? सगळं खूप उथळ झालं आहे, समाजात , आता ऑनलाइन, आभासी समाजात असा उल्लेख करणं जास्त संयुक्तिक होईल, काही अपवाद वगळता, एखादी गोष्ट अचानक एवढी ट्रेंड होते की तुम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. अरे, काल, नाही काही क्षणा पूर्वी ज्या व्यक्तीस / गोष्ट ओळखत नव्हतो, त्याचे नाव, काम, तो कोणत्या जातीचा, कसल्या विचारांचा आणि कोणत्या पक्षाचा याची पूर्ण कुंडलीच तयार झालेली असते. काही फायदे दिसतील याचे कदाचित, पण मला तर तोटेच जास्त दिसतात. पूर्वी दूरदर्शन सुरू होणेपूर्वी जी एक उत्सुकता असायची, बातम्यां साठी लक्ष दिले जायचे ते सारे आता इतिहास जमा झाले. कोणत्याही गोष्टी साठी थांबणे, वाट पाहणे हा पर्यायच आता उपलब्ध नाही. सगळं कस एकदम “तेज!, सबसे तेज !!”. या साऱ्या गर्दीत जे चांगलं, पोषक आहे , उत्तम आहे त्याचा विसर पडतो आहे काय? असा प्रश्न मनात येतो. “जो जे वांछिल तो ते लाहो”, ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकातच सांगून ठेवलं आहे. पण जेंव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेंव्हा चुकीच्या म...