पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

इमेज
  ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.   ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? कोणत्या वि