पोस्ट्स

प्रासंगिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कचऱ्यातील देव आणि हरवलेले संस्कार

इमेज
  " गरज सरो आणि ------ मरो"   ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. गरज असेपर्यंत एखाद्याचा सन्मान करायचा आणि काम झालं की त्याला विसरून जायचं , असा तिचा साधा अर्थ. आतापर्यंत मला वाटायचं की ही म्हण फक्त माणसांच्या व्यवहारापुरती मर्यादित आहे. पण हल्ली आजूबाजूला दिसणारी काही दृश्यं पाहिली की जाणवतं—या म्हणीच्या कक्षेत आता देवही आला आहे. पहाटे देवासमोर हात जोडणारे , संकटात नवस करणारे , यश मिळाल्यावर प्रसाद वाटणारे आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवाच्या स्मरणाने करणारे आपणच. पण काही दिवसांनी तोच देवाचा फोटो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात , रस्त्याच्या कडेला , झाडाखाली किंवा नदी-तलावाच्या किनाऱ्यावर पडलेला दिसतो. श्रद्धेचा हा शेवट पाहिला की मन सुन्न होतं. घरात नवीन देव्हारा आला , नवीन फ्रेम आली , कॅलेंडर बदललं किंवा जुनी प्रतिमा फिकी झाली की जुन्या प्रतिमेचं काय ? अनेक जण "विसर्जन" या नावाखाली ती नदीत , तलावात किंवा एखाद्या ओसाड जागी ठेवून मोकळे होतात. काहीजण तर सरळ कचऱ्यात टाकतात. हेतू कदाचित अपमानाचा नसतो ; पण कृती मात्र अपमानास्पदच ठरते. देव प्रतिमेत नसतो , हे तत्त्वज...

“निष्ठा” म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
  “ पक्ष सोडू शकता , पण विचार कसा सोडणार ?” हा प्रश्न आता भूतकाळात जमा झाला आहे. आज सकाळी एका पक्षाच्या विचारसरणीवर जीव ओवाळून टाकणारा नेता संध्याकाळी थेट विरोधी विचारसरणीच्या मंचावर गळ्यात उपरणं टाकून बसलेला दिसतो. त्यामुळे ‘निष्ठा’ नेमकी कशाशी असावी , हा प्रश्न आजच्या मतदाराला पडला आहे. ती पक्षाच्या चिन्हाशी हवी , पक्षाच्या नेत्याशी हवी , की पक्षाच्या ध्येय-धोरणांशी ? सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं तर उत्तर स्पष्ट मिळतं—नेत्यांची निष्ठा पक्षाशीही नाही , चिन्हाशीही नाही आणि जनतेशी तर अजिबात नाही. त्यांची निष्ठा आहे ती फक्त आणि फक्त सत्ता , संपत्ती आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी! मतदार हा गृहितच धरला गेला आहे आज पर्यन्त ! पक्षाची नीतीमूल्ये आणि ध्येय-धोरणे या पुस्तकात लिहायच्या गोष्टी उरल्या आहेत . आजच्या राजकारणात ‘विचारसरणी’ ( Ideology) हा शब्द फक्त निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना खेळवण्यापुरता वापरला जातो. सत्तेची समीकरणं जुळवायची वेळ येते , तेव्हा सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी ठरतात. हा खेळ पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडतो, सामान्य जनता काय पाहून मतदान करते ?   पण विचार...

सोलापूर आणि आयटी पार्क : तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेचा अंत कधी?

इमेज
  सोलापूर आणि आय टी पार्क – एक हास्यास्पद समीकरण होईल की काय अशी भिती आता वाटते आहे. सरकार कुणाचंही असो सोलापूरकरांच्या पदरात फक्त निराशाच पडते. असा अनुभव याही वेळी येईल अशीच शक्यता दिसते आहे. वृत्तपत्रांतून रोज नव्या अडचणी समोर येतात पण त्यावर तोडगा काढणारा “धुरंधर” काही सोलापूरकरांच्या वाट्याला येत नाही, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. निवडणुकां पुरते आणि त्या नंतर काही दिवस चर्चेत राहणारे विषय अशा प्रकारे हाताळण्यात येतात की अवघं सोलापूर नवी स्वप्नं रंगवू लागतं, पण सामान्य सोलापूरकरांच्या हाती काहीच लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो हे काही सोलापूरकरांना नवीन नाही पण विमान सेवा, आय टी पार्क आणि नवे सुविधा युक्त एमआयडीसी, नवे उद्योग सुरू होणे कठीणच आहे. यासाठी आता सामान्य जनतेस रस्त्यावर उतरावं लागेल काय?  आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी अवश्य पहावी.           १९९० च्या दशकात शिक्षण घेत असलेली आमची पिढी ही संगणक आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या टप्प्याची साक्षीदार आहे. १९९७–९८ च्या सुमारास सोलापुरात आयटी पार्क सुरू होणार असल्या...

वाणीची जादू- संवादातून जिंकली मनं

इमेज
  माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे , असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु समाजात राहण्यासाठी केवळ ज्ञान , पदवी किंवा संपत्ती पुरेशी नसते ; माणसाला माणसांशी जोडून ठेवणारा जो अदृश्य धागा असतो , तो आहे – संवाद . विचार , भावना , अनुभव आणि अपेक्षा यांची देवाणघेवाण करण्याची कला म्हणजे संवाद. आणि ही कला जितकी प्रभावी , तितके व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि यशस्वी बनते. संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो. योग्य शब्दांची निवड , ऐकण्याची क्षमता , चेहऱ्यावरील भाव , शरीरभाषा (देहबोली) आणि समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर यांचा समन्वय म्हणजे प्रभावी संवाद. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे ज्ञान अफाट असते , पण ते योग्य पद्धतीने मांडता येत नसल्याने त्याला अपेक्षित यश मिळत नाही. उलट काही व्यक्ती आपल्या प्रभावी संवाद शैलीमुळे लोकांच्या मनात सहज स्थान निर्माण करतात.             व्यवसाय करीत असताना संवाद कौशल्य महत्वाचेच आहे. तुमचा व्यवसाय तुम्हाला घडवतो, शिकवतो, व्यवसायात तुमचे समर्पण असायला हवे ही एकच अट यामागे असते. ज्याच्याकडे हे समर्पण असतं...

195+ मराठी लेखांचा प्रवास: Amit Kamatkar Blog ची कहाणी

इमेज
  आज अनेक दिवसांनंतर ब्लॉगच्या Admin Console ला भेट दिली आणि लक्षात आलं की माझ्या ब्लॉगवर एकूण १९५ लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल म्हणतो खरे पण आपण आजवर या एवढ्या मोठ्या समूहास काय दिलं? तर अनुभव आणि ज्ञान याच्या जोरावर हे लेख ! जे कदाचित कुणासाठी प्रेरणा देऊ करतील, कुणासाठी माहितीचा खजिना म्हणून ज्ञान देऊ करतील. ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे, या देण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे. स्वत:चे कौतुक म्हणून नाही पण वाचन तुम्हाला विचाराने समृद्ध करतं, नवी दिशा देतं आणि प्रेरणाही देतं, ब्लॉगला भेट दिल्यास तुम्हास देखील याची प्रचिती येऊ शकेल. “ समृद्ध ” होणं या पेक्षा काही वेगळं असेल असे नाही वाटत. समृद्धता ही केवळ संपत्ती , वैभव किंवा भौतिक सुखसुविधांची बेरीज नसून , ती जीवनाच्या व्यापक आणि सूक्ष्म पैलूंना स्पर्श करणारी संकल्पना आहे, असे मी मानतो.   ब्लॉगवरील हे लेख कुण्या एकाच विषयावर नाहीत तर त्यात बॉलीवुड, सुलेखन, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, प्रासंगिक, माहितीपर, करिअर विषयक, व्यावसायिक मार्गदर्शन, स्टार्टअप, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान विषयक, मनोगत अ...

"बाबा" नावाचं आभाळ… आणि अपूर्ण राहिलेली एक प्रार्थना

इमेज
  ‘ तुज मागतो मी आता’ या प्रार्थनेतून उमटलेली वेदना २०११ च्या एप्रिल महिन्यापासून माझ्या मोबाईलचा रिंगटोन एकच होता — “तुज मागतो मी आता” हे भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं गणेशस्तवन, त्या सुरांमध्ये एक आर्तता आहे , एक शरणागत भाव आहे , आणि एक विश्वासही — की आपण जे काही मागू , ते बाप्पा ऐकेल. त्यावेळी जे काही मनोमन मागत होतो , ते गणरायाने दिलं नाही , ही भावना मात्र मनात घर करून बसली. पण खरी कसोटी तेव्हा लागली , जेव्हा बाबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूच्या बाहेर उभं राहून मशीनचे आवाज ऐकणं , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून अंदाज बांधणं , आणि प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या दोलायमान अवस्थेत काढणं — हे सगळं आयुष्य बदलून टाकणारं होतं. “बाबा” व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या छातीतून येणारा श्वास हा त्यांच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा नव्हता , तर एका मशीनच्या सहाय्याने चाललेला होता. त्या अवस्थेत मनात एकच मागणं होतं — “बाप्पा , बाबांना लवकर बरं कर. यातून बाहेर काढ.” ही प्रार्थना नव्हती , ही विनवणी होती ; किंबहुना आर्त हाक होती. १० मे २०११ रोजी मी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती येथे दर्शना...

विद्या कॉम्प्युटर्स: २६ वर्षांचा विश्वास, ज्ञानसाधना आणि Ai Ready Career Institute ची यशोगाथा

इमेज
आणखी एक वर्ष ! वर्षाचे ३६५ दिवस पूर्ण करून नवा दिवस ! नवी ऊर्जा, नवा उत्साह, नव्या कल्पनांसह , नव्या तंत्रज्ञानाचे दीप हाती घेऊन पुढील ज्ञानपर्वाच्या वाटेवर मार्गस्थ होणे, नक्कीच अभिमानास्पद आहे, वाढलेली जबाबदारी खूप मोठी आहे. अर्थात याचे भान आम्हाला आहे. जुळे सोलापूर परिसरात ८० चौ. फुटा पासून सुरू झालेला प्रवास आज २००० चौ फुटात दिमाखात सुरू आहे. विद्या कॉम्प्युटर्स २६ वर्षांचं झालं !  तसं पाहिलं तर खूप मोठा पल्ला, ९४९० दिवस, १ लाखा पेक्षा जास्त सोलापूरकरांच्या हृदयात स्थान मिळविणं हे आमचं सर्वात मोठं यश मानतो आम्ही.  सोलापूरकरांच्या मनो विश्वात आशा, विचार आणि नव चैतन्याचा प्रकाश पेरण्याचे पवित्र कार्य आम्ही केले , करीत आहोत. सोलापूरकरांचा आशीर्वाद असाच सोबत करेल याची काडीमात्र शंका आमच्या मनात नाही आणि त्याच बळावर आम्ही आमची वाटचाल अशीच सुरू ठेवू. आयुष्यातील महत्वाची वर्षं या वाटचालीत उपयोगात आणली गेली. पदव्युत्तर शिक्षण झालेले असताना देखील सोलापूर शहर न सोडता, येथेच राहून संगणक शिक्षण, स्किल प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान...

सोलापूरमध्ये Digital Leadership: शिक्षण, AI आणि रोजगाराच्या संधी

इमेज
  “ सोलापूर” हे नाव उच्चारताच मनात अनेक परिचयाच्या गोष्टी उजळून निघतात—टेक्सटाइल उद्योगाचे भक्कम केंद्र , हुतात्म्यांच्या त्यागाने पावन झालेली भूमी , श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाछायेत न्हालेली नगरी आणि महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात वेगाने पुढे येणारे शहर. या सर्व ओळखींसोबतच , मागील दोन दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात सोलापुरात घडलेले परिवर्तन विशेषत्वाने नोंद घ्यावे असे आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांतून आकारास आलेले स्वतंत्र विद्यापीठ , नव्याने उभारलेली तंत्रमहाविद्यालये , तसेच खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून विस्तारलेले उच्च शिक्षणाचे दालन—या सर्वांनी मिळून सोलापूरला शिक्षणसमृद्ध शहराची नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. साक्षरतेच्या आकडेवारीत सातत्याने दिसणारी वाढ आणि अनेक महाविद्यालयांना प्राप्त झालेला “स्वायत्त” दर्जा हा या प्रगतीचा ठोस पुरावा आहे. एक सोलापूरकर म्हणून हा प्रवास अभिमानाने उर भरून येईल असा आहे. याच शैक्षणिक प्रवासाला पूरक ठरत , शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त , मॉड्युलर स्वरूपातील अभ्या...

पहिली शस्त्रक्रिया : भीती, धाडस आणि शरीराशी झालेला नवा संवाद

इमेज
  हृदयाची वाढणारी धडधड, काळजी आणि पुढे काय आणि कसे होणार? हा अनुत्तरित प्रश्न ! अर्थात उत्तर लागलीच मिळणारच होतं पण मिळेपर्यंत सोबत करणारी एक अनामिक भिती ! हो भीतीच, कारण आयुष्यात प्रथमच एखाद्या ऑपरेशनला सामोरे जात होतो. हॉस्पिटल मध्ये सोबत करणे ठिक असतं,पण ऑपरेटीव प्रोसीजर स्वत:च पाहणे आणि त्यात सामील होणे हे प्रथमच ! त्यामुळे नाही म्हंटल तरी टेंशन आलेलच होतं. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर देखील थोडं वाढलं. ऑपरेशन हा शब्दच मुळी धाडस दर्शवितो, मग ते सैन्य दलात असेल, अथवा हॉस्पिटल ! फार काही नाही पण “धाडस” या शब्दाचा मला चांगला समजलेला अर्थ असा की भिती असतानाही धोक्याचा सामना करण्याची मानसिक ताकद. डॉक्टरांवर विश्वास ठेवला की फार काही धाडस करण्याची गरज नसते पण मनुष्य प्राणी सहजा सहजी असे काही करत नाही, तसा तुम्हालाही अनुभव असावाच !           सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की फार काही “सीरियस” असे घडले नाही, फक्त मी हे प्रथमच फेस केलं म्हणून त्याचं अप्रूप ! बाकी अशा अनेक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात आणि रुग्ण हसत हसतं घरी देखील जातात. मी देखील...