पोस्ट्स

Informative लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ?

इमेज
  ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ? सगळं खूप उथळ झालं आहे, समाजात , आता ऑनलाइन, आभासी समाजात असा उल्लेख करणं जास्त संयुक्तिक होईल, काही अपवाद वगळता, एखादी गोष्ट अचानक एवढी ट्रेंड होते की तुम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. अरे, काल,   नाही काही क्षणा पूर्वी ज्या व्यक्तीस / गोष्ट ओळखत नव्हतो, त्याचे नाव, काम, तो कोणत्या जातीचा, कसल्या विचारांचा आणि कोणत्या पक्षाचा याची पूर्ण कुंडलीच तयार झालेली असते. काही फायदे दिसतील याचे कदाचित, पण मला तर तोटेच जास्त दिसतात. पूर्वी दूरदर्शन सुरू होणेपूर्वी जी एक उत्सुकता असायची, बातम्यां साठी लक्ष दिले जायचे ते सारे आता इतिहास जमा झाले. कोणत्याही गोष्टी साठी थांबणे, वाट पाहणे हा पर्यायच आता उपलब्ध नाही. सगळं कस एकदम “तेज!, सबसे तेज !!”.           या साऱ्या गर्दीत जे चांगलं, पोषक आहे , उत्तम आहे त्याचा विसर पडतो आहे काय? असा प्रश्न मनात येतो. “जो जे वांछिल तो ते लाहो”, ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकातच सांगून ठेवलं आहे. पण जेंव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेंव्हा चुकीच्या म...

सावरकरांविषयी बोलण्याआधी सावरकर वाचा

इमेज
  सावरकर या नावाचे भारतीय इतिहासात एक वेगळे स्थान आहे. भारताचा इतिहास सावरकरां शिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही. सावरकरांविषयी अनेकांना कुतूहल असतं, कुणी ते मान्य करतं कुणी ते नाही स्वीकारत, ज्याचा त्याचा प्रश्न पण सोशल मीडिया, इलेक्ट्रोनिक मीडिया वर सावरकरां विषयी निरर्थक कमेन्ट केली की ट्रेंड होतं हे नक्की ! प्रसिद्धी मिळते असे काही बालबुद्धी मानतात आणि तसे वागतात सुद्धा. देव त्यांचे भले करो. पण हे नक्की असतं की या सर्व बालबुद्धींनी सावरकर वाचलेले नसतात. सावरकर कोण आहेत याचा थोडाही अभ्यास या लोकांनी केलेला नसतो. फक्त कानोपकानी गोष्टी पसरविणे आणि चिखलफेक करणे एवढाच काय तो यांचा अजेंडा असतो.             सावरकर कुण्या सोम्या- गोम्याला समजत नाही एवढं मात्र नक्की. कारण या सोम्या- गोम्यांच्या बुद्धीची तेवढी क्षमताच नसते. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते, विज्ञानवादी सावरकर, साहित्य प्रभू सावरकर, महाकवी सावरकर, समाजसुधारक सावरकर, क्रांतिवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, पत्रकार, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाषा शुद्...

सावरकर - राष्ट्र तपस्वी

इमेज
  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की , त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद , दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष , त्याग , राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही.   सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते , तर ते क्रांतिकारक , साहित्यिक - ( भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा ), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी ...

भारत विरुद्ध इंडिया: शिक्षण, AI आणि डिजिटल दरी

इमेज
  शहर आणि गांव / खेड यांच्यातील संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये एक मोठी दरी दिसतेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण ! यात देखील एक मोठी दरी पहायला मिळते. भारत आणि इंडिया यातील दरी सतत वाढणारी राहील असे चित्र आजतरी दिसतं आहे. डिजिटल क्रांती भारतात (गावात) आली नाही असे नाही पण अद्याप भारत इंडियाशी जोडलेला नाही हे त्रिवार सत्य आहे.  आता हेच पहा, शिक्षणांवर सर्वांचाच सारखाच अधिकार आहे, पण या भावी पिढीस आपण शिक्षित करीत आहोत की साक्षर ? की दोन्हीही नाही. शिक्षण क्षेत्रात वावरत असताना अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे मुलांना धड वाचताही येत नाही. लिहिणं तर खूप दूरची गोष्ट ! तुम्ही म्हणाल, काहीतरी सांगताय पण ही वस्तुस्थिती आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणारे आहेत हे नमूद करणे अनिवार्य आहे. ही मित्र मंडळी उत्तीर्ण कशी झाली? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कितीही कॉपी मुक्त अभियान चालविले तरी नैतिकता कशाशी खातात हे जो पर्यन्त समजणार, शिकणार नाही तो पर्यन्त काहीही फरक पडणार नाही. असे विद्यार्थी त्यांचं शालेय शिक्षण संपवून जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा या स्पर्धेच्या युगात ही मित...

संत श्री ज्ञानेश्वर – मुक्ताई

इमेज
  सध्याच युग हे आर्टिफिशियल इंटेलिजंसच युग, जिथे ड्रायवरलेस कार आल्या आहेत, अशा जमान्यात दिग्दर्शकाने “भिंत” चाललेली दाखवणं कितपत रुचेल हा खरा प्रश्नच ! पण तरीही दीगपाल लांजेकर आणि टीम ने हे धाडस केलं आणि १४०० वर्षे वयोमान !! असणाऱ्या योगींच्या स्वागताला सामोरं जाण्यासाठी संत श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. हे सारं दिव्यच ! या दिव्यत्वाची महती आणि माहिती नव्या पिढीस होणे नितांत आवश्यक आहे. वाचन आणि संयम कमी होत चाललेल्या युवा पिढीस हा विषय पडद्यावर दाखवणं आणि चित्रपट गृहात आणणं हे एक आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक वारसा जपणं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं मला कौतुकास्पद वाटतं.   हे एक दिग्दर्शक निर्माते म्हणून आपण जाणलं आणि कशाचीही पर्वा न करता हे आपण पडद्यावर साकारलं. यासाठी प्रथम आपले मन:पूर्वक आभार ! श्रद्धा ,भक्ति आणि नम्रता या जोरावर अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात याचे दर्शन या चित्रपटात होते. अहंकारामुळे होणारे नुकसान सामान्य जनास दिसत नाही, पण भक्ति मार्गावर असणाऱ्या मंडळीना हे सारं ज्ञात असतं. बदलत्या काळा नुसार बदलणे क्रमप्राप्त असतं तसं बदलाव...

सोशल मीडिया एटीकेट्स !

इमेज
  हा एक नवा माहिती देण्याचा , जागो रे ! म्हणण्याचा विषय होवू शकतो, असं वाटलं नव्हतं. पण सोशल मीडियाचा वापर करीत असताना आज ज्या प्रकारे कमेन्टस् वाचण्यात येतात, त्या वाचल्यावर नक्की वाटतं की याचं शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. काही मंडळी त्वेषाने द्वेष पसरविण्यात एवढी मग्न असतात की खरचं यांची शैक्षणिक पात्रता, विषयातील अभ्यास या विषयी कुतूहल निर्माण होतं. अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेलगाम घोडा दवडणे होऊ शकत नाही. ताळतम्य हवच, एखाद्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा, ज्ञानाचा आदर होताना दिसतं नाही. ही आपली संस्कृती नाही. सोशल मिडियावरील मंडळी शिक्षित आहेत पण साक्षर नाहीत हे नक्की. या विषयावर माझा ब्लॉग आहेच, तुम्ही तो वाचला असेल अशी आशा व्यक्त करतो. नसेल वाचला तर या लिंकवर क्लिक ( https://amitkamatkar.blogspot.com/ 2025/03/ educate-literate.html ) करून  नक्की वाचावा. सोशल मिडियाचा वापर तसा अनेक वर्षे झाली करतो आहे. हा वापर करीत असताना शिष्टाचारांच (इंग्लिश मध्ये एटीकेट्स) पालन करणं यां विषयी कधी फारसं कुणी बोलेललं पाहिलं नाही अथवा कुणी यावर मार्गदर्शन केलं आहे असेही पाहिलं नाही. माझ...

दुसरं महायुद्ध, “चले जाव” आणि स्वातंत्र्य

इमेज
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना , अनेक विचार मनात घोळत राहतात, आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले का? आपण त्याचा योग्य वापर करीत आहोत का? खरी लोकशाही रुजविण्यात आपण भारतीय नागरिक म्हणून यशस्वी झालेलो आहोत काय? नैतिक मूल्य जोपासली जातात का? संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकवेळी सांगितले जातात पण कर्तव्यांची जाणीव झालेली आहे का? नसेल झालेली तर ती कधी होणार? अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण याची उत्तरं एक भारतीय म्हणून आपल्यालाच शोधावी लागतील, “मी भला आणि माझं घरं भलं” असे म्हणून चालणार नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो पर्यायाने देशाप्रती आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवायची जास्त गरज वाटते मला. देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर आहेत, देशावर होणारा कोणत्याही प्रकारचा आघात ते परतवून लावू शकतात. पण देशांतर्गत उद्भविणाऱ्या संकटांना एक भारतीय म्हणून आपल्यालाच सामोरे जावे लागेल. २१ व्या शतकात डिजिटल युद्धास आपण नकळत सामोरे जात आहोत, वेळीच जागे होणे क्रमप्राप्त आहे. या युद्धात देशाची संपत्ती असलेल्या युवक वर्गास लक्ष्य केलं जात आहे. ...

इकिगाई- १०० वर्ष जगण्याचा मंत्र !!

इमेज
  Ikigai- इकिगाई –हा शुद्ध मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न आहे , या शब्दाचे उच्चारण “अ-की-गे-आय” या प्रकारे चार भागात करता येते. डॅन ब्युएटनर या लेखकाने मनुष्याचे जगातील सर्वात जास्त आयुष्मान असणाऱ्या देशाचं भ्रमण केले आणि तेथील मंडळी एवढी वर्ष कशी जगू शकतात? त्याचा त्यांच्याकडे काही फॉर्म्युला आहे काय? या विषयी त्यास कुतूहल निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास केला. त्याने त्याच्या पुस्तकात याचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. पुस्तकाचे नाव आहे “ब्ल्यू झोन्स किचन्स”, १०० रेसिपीज १०० वर्ष जगण्यासाठी !!! मागील वर्षी जपान मध्ये एकूण लोकसंख्ये पैकी आयुष्याची शंभरी पार केलेले ७९,००० माणसं आहेत.  जपान फक्त यासाठी प्रसिद्ध आहे असे नाही तर “करोशी” या संज्ञे  साठी देखील ओळखला जातो. या संज्ञेचे उगम स्थान १९७० मध्ये दडलं आहे, त्यावेळी जपान मध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याचे मुख्य कारण जास्त काम आणि प्रचंड ताण-तणाव असे संशोधनात आढळले होते.  आयुष्य खूप सुंदर आहे ते जगताना ही रेसिपी अंमलात आणल्यास यशस्वी जीवन जगता येऊ शकतं. अर्थात हीच रेसिपी व्यवसाय आणि मनुष्याची ध्येयपूर्ती यांच्यासोबत जोड...