पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

श्रद्धा आणि देव

इमेज
  आपण आयुष्यभर कोठे न कोठे श्रद्धा ठेवून असतो मग ती गुरूंवर असेल , देवा वर असेल, जन्मदात्या आई- वडिलांवर असेल, श्रद्धा हि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटते, काही ना काही अनुभूती देते म्हणूनच ती प्रत्येकाच्या आयुष्यात टिकून असते. मला वाटत तसे अनुभव तुम्हालाही आलेले असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे , तो ज्याला कळाला त्याला ती तारक वाटते, सुखावह वाटते पण श्रद्धा हि अंधश्रद्धा होवू नये कारण मग ती मारक ठरू शकते. “देव” हा एक श्रद्धेचा भाग आहे, आस्थेचा भाग आहे, ज्याची जशी श्रद्धा तसा त्यास अनुभव !!! कोणास कधी देव माणसात भेटतो, कधी तो फक्त अनुभवता येतो तर कधी दगडात देखील देव दिसतो, तो आहे अस आपण मानतो. पण ज्या दगडास घडवून मूर्ती तयार होते त्या मूर्तीत देव मावतो ? हा श्रद्धेचा भाग आहे. भारतात तरी याच उत्तर होकारार्थीच आहे. श्रद्धा ठेवली तर दगडाच्या मूर्तीत देव वसतो व मावतो देखील. जो मूर्तिकार मूर्ती घडवितो त्यास देवाची अनुभूती मिळते का? याच उत्तर एखादा मूर्तिकारचं देवू शकेल. जेंव्हा दगडाला एखाद्या मूर्तीच मूर्त रूप येते तेंव्हा त्यात आपल्याला कल्पनेप्रमाणे (मनात असणाऱ्या चित्रा प्रम

टम्बलर काय आहे ?

इमेज
    टम्बलर हि एक मायक्रोब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साईट आहे. मायक्रोब्लॉग हा ब्लॉग पेक्षा थोडा वेगळा असतो,या मध्ये इमेजेस,व्हिडीओ लिंक्स, युजर शेयर करू शकतो किंबहुना मायक्रोब्लॉग लोकप्रिय होण्याचे हेच मुख्य कारण मानले जाते. ब्लॉगर पेक्षा मायक्रोब्लॉगर्स एखाद्या विषय सबंधीची माहिती विविध चित्राद्वारे किंवा व्यवसायिक दृष्टीकोनातून वेबसाईटस, सेवा, उत्पादन यांचे मार्केटिंग करणे हेतू देखील वापर करता येऊ शकते. टम्बलर ची स्थापना २००७ मध्ये डेव्हिड कार्प ने केली पुढे जावून २०१३ मध्ये याहू ने ती विकत घेतली. हि सेवा युजरला ब्लॉगवर मल्टी-मेडिया वापरण्याची मुभा देते आणि या मध्ये युजरला मिळणारा डॅश बोर्ड खुप महत्वाचा आहे. युजरला फोटो, मजकूर, कोट, संगीत आणि व्हिडीओ आपल्या ब्राऊजर च्या सहाय्याने पोस्ट करता येते. आज मितीस ३३७ दशलक्ष एवढे ब्लॉग्ज व १४६ अब्ज पोस्ट १७ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.           टम्बलर मध्ये मिळणारा डॅश बोर्ड आणि लॉग देखील उपलब्ध होतो. टम्बलर ची अजून एक खासियत अशी सांगता येईल कि मोठ्या पोस्ट म्हणजे ब्लॉग,भरपूर लिखाण म्हणजे ब्लॉग अस इथे नाही, अगदी साधी पोस्ट, साधा मेसेज, ऑडीओ किंवा

मोबाईल हरवला तर ?

इमेज
  शीर्षक वाचून गोधळलात का ? गोंधळून जावू नका पण आज मोबाईल या संवाद (?) साधना बद्दल काही सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे करीत असताना एक विचार सुद्धा मांडत आहे कि तुमचा मोबाईल गहाळ झाला तर ? काय होवू शकेल? हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही, हो ना ?  याचही एक कारण आहे ते अस, एवढे दिवस अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असं आपणं मानतं होतो पण २१ व्या शतकात या सोबत मोबाईल हि एक गरज बनली आहे. शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत या मोबाईल ने सगळ्यांशी गट्टी जमविली आहे आणि गट्टी साधी सुधी नाही अगदी “जिगर” दोस्ती, मेड फॉर इच अदर म्हणाना ! थोडं आश्चर्य वाटेल पण वास्तव तर असच आहे. मागील वर्षी कोरोना मुळे चालू झालेल्या लॉकडाऊन मध्ये सच्चा साथी म्हणून मोबाईलने प्रमुख भूमिका बजावली आहे. तीच भूमिका आताच्या लॉकडाऊन मध्येही बजावतो आहे, नाही का? या  मोबाईल ची फोन करणे, संवाद साधणे हि प्राथमिकता पण काही ठिकाणी तर हि प्राथमिकता सोडूनच इतर कारणांसाठी हा मोबाईल वापरला जातो. एक सर्वेक्षण असं सांगत कि हा मोबाईल एक वेळ आलेला फोन रिसीव्ह करायाला कमी वापर

गुगल मॅप आहे तरी काय ?

इमेज
  सरिता आणि जुईली इ. ११ वीच्या एकाच वर्गात शिकत आहेत. नुकतीच कॉलेजमध्ये ‘कोण बनेल आय टी जिनिअस?’ ची नोटीस नोटीसबोर्डवर लावलेली दोघींनी पहिली आहे. ती पाहून सरिता जुईलीला म्हणाली “ जुई, आपण स्पर्धेत भाग घ्यायचा? ” यावर जुईली म्हणाली “ अगं, तुला आय टी बद्दल काय माहिती आहे? मला तर काहीच माहिती नाही.” यावर सरिता म्हणाली, ‘अग मी व्हेकेशन मध्ये संगणक कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, मी कोण बनेल आय टी जिनिअस स्पर्धेत प्रवेश घेऊ शकते. तू ही तुझं आय टी ज्ञान तपास,” सरिता म्हणाली. यावर जुईली म्हणाली “ते तर मी करणारच आहे, पण ......पण काय? सरिता म्हणाली, जुईली म्हणाली अग पत्ता बघ ना काय लिहिलाय? मला नाही माहित ती जागा कुठेय? सरिता म्हणाली “हत् तेरी, एवढचं ना, मी शोधून देते तुला पत्ता,” जुईली म्हणाली. कसं काय?” सरिता म्हणाली अग गुगल मॅप्स आहे ना! हे काय नवीन ? जुईली म्हणाली. सरिता पुढे बोलू लागली गुगल मॅप्स ही सेवा गुगल ने तयार केलेली आहे ही सेवा सॅटेलाईट इमेज सुविधेचा वापर करते व कोणताही रस्ता, ठिकाण शोधण्यात आपल्याला मदत करते. या सुविधेसोबत एखाद्या रोडवर ट

ऑनलाईन स्टोअरेज

इमेज
  वेदांत आणि समर्थ पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. समर्थ ला संगणका मध्ये रुची असल्याने व करिअर च्या दृष्टीने उपयुक्त असा एम.एस.सी.आय.टी. हा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. दोन दिवसापूर्वी वेदांत आणि समर्थ यांनी “विद्यापीठस्तरीय पेपर प्रेझेन्टेशनची सूचना” सूचना फलकावर वाचली आणि दोघांनीही ठरवल कि या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा.पण वेदांत ला संगणकाचे ज्ञान नसल्याने तो सर्वस्वी समर्थ वर अवलंबून आहे, त्या दोघांनी ठरवल कि प्रथम प्रेझेन्टेशन विषयाचा अभ्यास पूर्ण करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या आणि मग त्याचे संगणकीय प्रेझेन्टेशन तयार करायचे, या प्रेझेन्टेशन तयार करण्याच्या कामात समर्थ वेदांत ला मदत करणार त्यानुसार त्यांनी अभ्यास सुरु केला.           पेपर प्रेझेन्टेशन साठी यु.एस.बी ड्राईव्ह (अर्थात पेन ड्राईव्ह), गुगल ड्राईव्ह ची सुविधा वापरता येणार अशी सूचना दोघांना अगोदरच प्राप्त झालेली होती, त्यानुसार वेदांत ने समर्थ ला विचारले, “समर्थ, पेन ड्राईव्ह मला माहिती आहे, तो मी तुझ्याकडे पाहिला आहे पण गुगल ड्राईव्ह काय प्रकार आहे? पहिल्यांदाच ऐकत आहे, मला या बद्दल सांग ना, समर्थ म्हणाला

व्हिजिटिंग कार्ड

इमेज
  वेळ संध्याकाळची, बाहेर अगदी मन हर्षून जाण्यासारख वातावरण पडल होत. मी असाच फिरायला म्हणून बाहेर पडलेलो. रुटीन मुळे तसा थोडा वैतागलेलाच होतो मी पण आज बॉस ने अगदी केबिन मध्ये बोलावून सांगितले, “रमेश उद्या तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर केलेली आहे, तुमच्या कामावर साहेब (आमचे डायरेक्टर साहेब) खूपच खुश आहेत, म्हणून तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. “सुट्टी म्हणजे काय?” तर मागितलेली रजाच मंजूर झाली होती ती ! मी घरी पोहोचलो, घरात आई नेहमीप्रमाणे देवळात गेलेली , बाबा अजून ऑफिस मधून यायचे होते आणि बहीण “अश्विनी” ती काय घरात असून नसल्या सारखीच कारण इयत्ता बारावीच वर्ष !!           दुसरे दिवशी रजा असल्याने संध्याकाळ मिळाली होती आणि तीही निवांत होती . त्यामुळे फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. आम्हाला फक्त सूर्य उगविताना कसा दिसतो हेच माहिती तो मावळतो सुद्धा याची कल्पना नाहीच मुळी पण आज तो मावळताना पहिल्यांदाच पाहिलं, निसर्गाच खर रूप जे शब्दात वर्णन करता येणार नाही असं. पाखर आपल्या घरी परतत होती. प्रत्येकाच एकच लक्ष होत , घर !! प्रत्येकजण दिवसभराच्या कामामुळे वैतागलेला, कंटाळलेला हे

स्लाईड शेयर – शेअरिंग टूल

इमेज
  इंटरनेटच्या वापरामुळे जग खूप जवळ आले आहे म्हणतात, खरचं आहे म्हणा त्यात काही चुकीच अस नाहीच. एखाद्या व्यक्तीस काही माहिती शेयर करायची असल्यास चुटकीसरशी शेयर करता येते. यात काही नाविण्य आता राहिले नाही पण हि छोटीसी बाब खूप महत्वाच काम करून जाते कधी कधी. इंटरनेट चा वापर फक्त करमणुकी साठी न करता तो सर्वव्यापी होणे आपल्याला जास्त फायदेशीर ठरत. नाहीतर बऱ्याच वेळा फक्त करमणूक एवढाच इंटरनेट चा वापर पहायला मिळतो, तसे होवू नये हि आपणा सर्वांची जबाबदारी आहे आणि ती आपण घ्यायला हवी, हो ना ? आज अशाच इंटरनेट च्या एका वापरा विषयी आपण जाणून घेणार आहोत.             मिलिंद आणि श्रीकांत दोघे एका कंपनीत काम करीत आहेत. श्रीकांत ने या कंपनीत जॉईन व्हायच्या अगोदर संगणक कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यास संगणक हाताळण्याची तांत्रिक पद्धत चांगली अवगत झालेली आहे. एके दिवशी साहेबांनी मिलिंद ला एक प्रेझेन्टेशन तयार करायला सांगितले आणि ते प्रेझेन्टेशन सर्व कर्मचाऱ्यासोबत शेयर करायला सांगितले. मिलिंद ला हा विषय नवीन होता, त्यास काही कळेना काय करावे? कस करावे? तो साहेबांच्या केबिन मधून बाहेर पडला आणि थेट श्रीकांत

वेब पेज तयार करणे- एक कौशल्य

इमेज
  कॉलेज चा नोटीस बोर्ड ज्यावर, कोण बनेल आय टी जिनिअस ? ह्या स्पर्धे विषयी नोटीस लागली आहे. दिनेश आणी रितेश दोघे एकाच वर्गात शिकत आहेत. दोघांनी स्पर्धे विषयी अटी आणि विषय समजून घेतले, विषया मध्ये वर्ड चा वापर करून वेब पेज तयार करणे असा एक विषय देण्यात आला आहे. दिनेश ला संगणकाचे ज्ञान असल्याने तो लागलीच रितेश ला म्हणाला, अरे, मी हे करू शकतो आपण हाच विषय निवडूया !! रितेश म्हणाला , मला या बद्दल काहीच माहिती नाही आणि तू तोच विषय घ्यायचा म्हणतोस,” “दिनेश म्हणाला, मित्रा, काळजी करू नकोस कारण मला संगणक हाताळता येतो.”           मायक्रोसॉफ्ट वर्ड चा वापर करून वेब पेज तयार करता येते हे एक नवीन कौशल्य आज रितेश ला समजणार आहे, त्यामुळे तो  खूपच खुश झाला आहे. वर्ड मध्ये ज्या प्रकारे आपल्याला वेब पेज हवे आहे, ज्या प्रकारचे ले-आउट हवे आहे त्याप्रकारचे ले-आउट वापरता येते.कारण वर्ड मध्ये न्यूज लेटर स्टाईल फॉरमेट वापरता येतो. साधे डॉक्युमेंट तयार करता येते, सोबतच फोटो अलायनमेंट करून उत्कृष्ट ले-आउट तयार करता येते. युजरला ज्या प्रकारचे डॉक्युमेंट टायटल हवे आहे आहे त्याप्रकारे फॉरमेट करता येते, त्याचा फोन

वाचाल तर कमेंट कराल

इमेज
  आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून ! पण आजच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात कमेंट आणि लाईक्स मिळणं खूप महत्वाचं झाल आहे. जर कमेंट आणि लाईक्स नसतील तर ती पोस्ट वाया गेली अस मानण्यात येतं. सोशल नेटवर्किंग करीत असताना तुमची मित्र संख्या मर्यादित आहे अथवा तुमच्या मित्रांना (अर्थात सोशल मेडिया वरील) तुमच्या पोस्ट मध्ये रस नाही.... असे एक ना अनेक निष्कर्ष काढता येवू शकतात, तुम्ही कधी पाहिलं आहे का, सोशल नेटवर्किंग करीत असताना एखादा फोटो पोस्ट केला तर मिळणाऱ्या कमेंट अथवा लाईक्स आणि फक्त मजकूर पोस्ट केल्यावर मिळणाऱ्या लाईक्स खूप तफावत असते, कारण काय असू शकेल यावर काही सर्व्हेक्षणं झाली त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे कि नेटीझन्स ना (युजर्स ना) वाचायला नको असते (अर्थात त्यातही मोजमापं आहेत, थोडा मजकूर असेल तर वाचावा, जास्त असल्यास नको), कमेंट आणि लाईक करायचे म्हंटले कि तो वाचावा लागेल मग  वाचावे कुणी ? एक म्हण माहिती असेल, “वाचाल तर वाचाल”, हे किती जरी खरे असले तरी वाचावे कुणी?           आता हाच मजुकर कुणी वाचेल का? हा प्रश्न मला लिहिताना पडला आहे, पण मला वाटत सोशल मेडिया, ई-बुक्स या माध

कल्याणजी-आनंदजी- सांगितिक शिल्पकार

इमेज
  कल्याणजी-आनंदजी हिंदी चित्रपट सृष्टीतील एके काळचे आघाडीचे संगीतकार. एक एक गाणी म्हणजे जणू मोतीच ! जे गुंफले गेले एका माळे मध्ये आणि ती माळ म्हणजे कल्याणजी-आनंदजी. हे दोघे भाऊ, कल्याणजी मोठे आणि आनंदजी धाकटे, कल्याणजी वीरजी शहा यांचे वडील मुंबईत किराणा दुकान चालवायचे, याच दुकानातून केलेल्या खरेदीच्या रकमेपोटी एक गृहस्थ त्यांना संगीत शिकवू लागले आणि त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. कल्याणजी यांचा जन्म ३० जून १९२८ चा, आणि आनंदजी यांचा २ मार्च १९३३, त्यांची   सांगीतिक जडण घडण हि मुंबई तील गिरगांव येथे मराठी आणि गुजराती कुटुंबांच्या सानिध्यात झाली. कल्याणजी यांना खरा ब्रेक मिळाला हा त्यांच्या आवडत्या वाद्यामुळे, क्लाविओलिन प्रचलित शब्द ( सिंथेसायझर) या वाद्याच्या आधारे कल्याणजी “बीन” चा जादुई आवाज वाजवायचे, आणि त्यांच हेच कौशल्य त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत ब्रेक द्यायला उपयोगी पडलं, वर्ष होतं १९५४, या साली प्रदर्शित झालेला “नागिन” यामध्ये जी बीन वाजली ती कल्याणजी यांची, आणि मग सुरु झाला ऐतिहासिक सांगीतिक प्रवास. त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लाईव्ह ऑर्क

मेरा गम – तेरा गम

इमेज
  दुनिया में कितना गम है , मेरा गम कितना कम है , उस्ताद आनंद बक्षी लिखित “अमृत (१९८६)” या चित्रपटातील हे गीत , जीवना कडे पाहण्याची नवी दृष्टी देत असे मी मानतो. स्वत:च्या अडचणी, दू:ख कुरवाळत बसलो की ती मोठी वाटतात, पण जरा इतर व्यक्तींकडे पाहिलं, आजू-बाजूला पाहिलं की लक्षात येईल आपल्याकडे असलेल्या दू:खा पेक्षा किती तरी मोठं दू:ख इतरांकडे आहे. सोलापूरचं साहित्य वैभव कविश्री स्व. दत्ता हलसगीकर यांनी कवितेतून दू:खाच स्वागत करावं असेच सांगितले, तुम्ही त्याला आपलसं   केलं , नाही तर त्याने जायचे कुठे? असा सवाल केला आहे. खरं ही आहे ते, दू:ख तो अपना साठी है !! प्रत्येक मनुष्याच्या जीवनात दू:खास अनन्य साधारण असे महत्व आहे, किंबहुना दू:ख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, नाही का?               शशी म्हणजे एक स्वाभिमानी मुलगा, स्वत:च्या कष्टावर मोठा झालेला, लहानपणापासून तो कधीच दुसऱ्या कुणावर अबलंबून राहिला नाही, लहानपणीच शशिला एका पायास पोलिओ झाला, शशी असो वा कुणीही दिव्यांग व्यक्ती कधीच कुणावर अवलंबून राहत नाही, किंबहुना तसा त्यांचा स्वभावच नसतो. ही मंडळी स्वाभिमानी, आत्मनिर्भर राहण्यात सामान्य माणसाच्