पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

सॉफ्ट स्किल्सचे महत्व

इमेज
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. ही कौशल्यं   अचानक महत्वाची झाली का? पूर्वी ही कौशल्यं   लागत नव्हती आणि अचानक यांची मागणी वाढली ? असं काही नाही, तर याची गरज पूर्वीही होतीच फक्त त्याचे महत्व मागील पाच-दहा वर्षात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. करिअरची निवड करताना यास अनन्य साधारण असे महत्व आहे आणि ते यापुढेही राहील. विद्यार्थ्यानी या गोष्टीस प्राधान्याने आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे सॉफ्ट स्किलची गरज तुम्हास भासणार नाही. शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी सॉफ्ट स्किल्स महत्वाची भूमिका पार पाडतात. सॉफ्ट स्किल्स तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हास उत्कृष्ट मदत करतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे असे जग असते, या जगात त्यास सांभाळून घेणारी मंडळी आजूबाजूस असतात पण जेंव्हा करिअरचा प्रश्न येतो अथवा जॉबला जाण्याचा प्रश्न येतो तेंव्हा सॉफ्ट स्किल्स बाहेरील जगास सामोरे जाण्यासाठी आणि सहकारी मंडळीं सोबत सहयोगी पद्धतीने कार्य करण्यासाठी आवश्यक ठरतात.           सॉफ्ट स्किल्स ज्यास आपण सामाजिक कौशल्य असेही म्हणूयात, खरे तर ही गैर-तांत्रिक कौशल्ये

स्टार्टअप- उत्पादनाची व्यवहार्यता- समजण्यासाठी एम. व्ही. पी.

इमेज
  मला आशा आहे की आपण मागील दोन भाग वाचलेले असावेत. या भागात मी आपणास किमान व्यवहार्य उत्पादन विषयी मार्गदर्शन करणार आहे. Minimum Viable Product ( MVP ) ही तुमच्या उत्पादनाची अगदी मूलभूत आवृत्ती आहे जी त्वरित आणि स्वस्तात तयार करता येऊ शकते. याचा मूळ उद्देश लोकांचं उत्पादनात स्वारस्य आहे का? हे तपासणे आणि सत्यापित करणे हा आहे. कृपया “प्रोटो टाइप” आणि “ MVP ” मध्ये गोंधळ करून घेऊ नका. प्रोटोटाइप हा तुमच्या कल्पनेचा मसुदा आहे आणि MVP हे ग्राहक / परीक्षक यांच्या द्वारे वापरले जाणारे उत्पादन आहे. जो परीक्षक आहे तोच नंतर ग्राहक बनू शकतो. MVP चे खालील प्रकारचे फायदे मला दिसतात: १.       वेळ आणि पैसा वाचतो- MVP विकसित करणे सोपे आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी भांडवली गुंतवणूक गरजेची आहे. उत्पादन तयार झाल्यावर जर तुम्हास आढळले की उत्पादनास बाजारातून उत्तम प्रतिसाद येत नाहीये तर तुम्ही त्वरित ते बंद करू शकता आणि दुसऱ्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करू शकता. वेळ आणि पैसा वाचण्यास उत्तम मदत होते. २.       ग्राहक अभिप्राय: MVP विकसित करण्याचा फायदा, ग्राहकास तुमच्या उत्पादना विषयी का

स्टार्टअप- संकल्पनेची उपयोगिता प्रमाणित करून घ्यावी

इमेज
  मागील भागात (ब्लॉग:-स्टार्टअपची कल्पना)आपण कल्पना कशी शोधावी याविषयी माहिती घेतली आणि स्वत:च स्टार्टअप कसे सुरू होईल या दिशेने पहिले पाऊल टाकले. एखादी कल्पना सुचणे म्हणजे झालं असे नाही होत, त्यास प्रमाणित करावं लागतं, तुमचे उत्पादन बाजारात कसे परफॉर्म करेल हे तुम्हाला निश्चित करणे क्रमप्राप्त आहे. विविध कसौटयांवर तुमची कल्पना कितपत यशस्वी होऊ शकते हे पाहणं देखील तितकच महत्वाचं वाटतं मला. हे करायचं कसं हे जाणून घेण्या अगोदर स्वत:स विचारा की जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात काय? बाजारात तुमच्या सेवा घेणारा / उत्पादन खरेदी करणारा ग्राहक वर्ग आहे का? तुमची कुणाशी स्पर्धा होऊ शकते त्याच्याकडे कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. तुम्ही एखादे व्हिडिओ डावूनलोड करणारं अॅ प इनस्टाग्राम साठि तयार करीत आहात पण लक्षात घ्या तेच अॅप तुम्ही फेसबुक, यू-ट्यूब, यांच्यासाठी देखील वापरू शकता. बाजारात या प्रकारचे अनेक अॅप आहेत त्या अॅप पेक्षा तुमच्या अॅपमध्ये तुम्ही काही खास वैशिष्ट्ये देऊ केली तर सामान्य ग्राहक वर्ग देखील तुमच्या अॅप कडे आकर्षित होऊ शकतो. १.