पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

मेल मर्ज काय आहे ?

रेखा आणि सुरेखा दोघी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत आता सर्वंकष मूल्यमापन पद्धती आल्यामुळे शिक्षकांना संगणकाचा वापर करणे अनिवार्य होत चालल आहे. अर्थात शिक्षण संगणकाचा वापर देखील करत आहेत. रेखा व सुरेखा दोघी मैत्रिणी एकाच वेळी शाळेत रुजू झाल्या आणि आपली सेवा बजावू लागल्या. शाळेतील मुलांच्या सर्वात जास्त आवडत्या शिक्षिका बनल्या आहेत. यामध्ये त्यांचे शैक्षणिक योगदान मोलाचे आहेच पण दोघीही प्रात्यक्षिक केंद्रित प्रशिक्षण देण्यामध्ये विश्वास ठेवतात त्यामुळे सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. शाळेत पुढील महिन्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालक दोघांसाठी आहे.                 नुकतीच मुख्याध्यापकानी सर्व शिक्षकांना माहिती दिली व कामास सुरुवात करा, जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक कार्यक्रमास कसे उपस्थित राहतील याकडे जातीने लक्ष द्या अशा सूचना केल्या. त्याचवेळी सुरेखा ने पुढे होत, आपण सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आमंत्रण पत्र पाठवावीत असे सुचविले. “पण एकाच वेळी एवढी पत्र लिहून आणि पोस्ट करून होतील?” , मुख्याध्यापकांनी सुरेखाला विचारल. य

Whatsapp स्वभाव !!

इमेज
           शीर्षक वाचून थोड आश्चर्य वाटल असेल, हो ना? पण हे खर आहे, ह्या एका नव्या स्वभावाच वरदान मनुष्याला तंत्रज्ञानाने दिले आहे. आपण रोज विविध व्यक्तीना भेटतो त्यांचे स्वभाव पाहतो अनुभवतो आणि आपसूकच पु.लं. ची आठवण होते, त्यांच्या “व्यक्ती आणि वल्ली” ची ! मनुष्य प्राणी हा असाच आहे कधी एखाद्याला एकमेकाशी बोलायला कसलीच ओळख लागत नाही तर कधी एखाद्याला ओळख असतानाही बोलणे जमत नाही. ओळख नसतानाही बोलणारे आणि आपलस करून घेणारे लोक खरच स्वत:च एक अस्तित्व तयार करतात. स्वत:ची एक स्पेस तयार करतात, तुम्हालाही असा अनुभव आला असेलच कि !! पण आता जमाना whatsapp आणि फेसबुक चा आलाय मग त्यात विविध समूह (ग्रुप) आले, समुहातील गप्पा आल्या ! महत्वाच म्हणजे माणस आली....            माझ निरीक्षण अस सांगत कि समूह तयार करणारा एक प्रमुख व्यक्ती असतो कि जो त्याच्या सम्पर्कातील विविध मंडळीना एका समुहात बांधण्याच काम करतो. कधी समूह एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून तयार केलेले असतात काहीवेळा सहजच केलेले असतात. प्रत्येक समूह सदस्याची एकमेकांची ओळख असतेच अस नाही आणि इथेच मनुष्य स्वभाव दिसून यायला लागतो, समुहातील सदस

व्यावसायिक आमंत्रण पत्र - कौशल्य - स्किल सेट २

इमेज
          “किरण, आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र दोन दिवसात तयार कर आणि मला दाखव.” किरण च्या साहेबांनी किरण ला फर्मावले. साहेबांच्या या नव्या फर्मावलेल्या ऑर्डर ने किरण पुरता गोंधळून गेला, किरणला लक्षात येईना कि कोणता प्रोग्राम / सॉफ्टवेअर वापराव आणि साहेबांना खुश कराव. याच विचारात तो संगणकावर कंपनी चे रोजचे काम करू लागला. किरण च तोडक ज्ञान आत मात्र त्याला आडव येत होत. त्याने कधीच ऑफिस कामा व्यतिरिक्त संगणक वापरला नव्हता त्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली होती. तेवढ्यात त्याचा मित्र राहुल त्याच्या जवळ आला व त्याला म्हणाला, “किरण, काय करतो आहेस? काही अडचण ? , यावर किरण ने काही नाही अशी नकारार्थी मान हलवली आणि परत काम करू लागला. राहुल ला कळून चुकले कि काही तरी गडबड आहे तो परत म्हणाला चेहरा का असा झालाय ?, मी काही मदत करू का? यावर किरण म्हणाला, “नेकी और पुछ पुछ.” दोघे हि हसले पुढे किरण म्हणाला, “अरे राहुल, आज साहेबांनी वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र तयार करायला सांगितले आहे, मला !! कस तयार करावे काहीच कळेना, “मी एवढा संगणक कधी वापरला नाही रे !!. यावर राहुल म्हणाला , “अरे म