पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी

इमेज
तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून पण आता आय.टी. च्या जमान्यात तुम्हास वाचता येते का आणि स्पष्ट उच्चार आहेत का ? हे दोन प्रश्न महत्वाचे असणार आहेत. तसे पहिले तर  संगणक युजरला टाईप करण्याचे कौशल्य आत्मसात असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तो संगणकाचा वापरच करू शकत नाही मग हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी युजर टाईपिंग वर प्रभुत्व मिळवितो. एखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याची लेखणी त्यास मदत करते. मला वाटतं लेखकास महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याचे विचार आणि ते कागदावर उतरविण्यासाठी आवश्यक असणारी त्याची लेखणी.. मग हि लेखणी नव्या जमान्यातील का असेना, कारण नव्या जमान्यात लेखणी ने देखील बरेच बदल स्वीकारले आहेत अस म्हणालो तर वावगं होणार नाही. हे बदल भौतिक असतील, त्याच्या स्वरूपात झालेले असतील वा तंत्रज्ञाना मुळे झालेले असतील. आता पहा ना, सुरुवातीला टाईप रायटर होते, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टाईप रायटर आले मग संगणक कि-बोर्ड आला आणि जसा स्मार्ट फोन चा वापर वाढला तसा आपण सर्वजण स्मार्ट फोन चा कि-बोर्ड वापरू लागलो, आता हा कि-बोर्ड म्हणजे “लेखणीच” म्हणावी लागेल, नव्या जमा