पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

गुरुपौर्णिमा

इमेज
  अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥ ज्ञानरूपी किरणाने जे अज्ञानरूपी अंधकाराने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडतात त्या गुरूंना नमस्कार | आज गुरुपौर्णिमा गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि आभार मानायचा दिवस , गुरुपौर्णिमेस एक आध्यात्मिक परंपरा आहे , गुरु - ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते , आई व वडील हे आपले प्रथम गुरु , ज्यांनी आपल्याला घडवलं , आपल्या पायावर ताठ मानेने उभं कसं रहावे हे शिकवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन्ही गुरु असतात. आई हि सदैव मुलांची लाडकी असते , काही झाल तरी मुलांना आई लागते , त्या माऊलीच हि सर्वस्व असतात तिची मुलं. आई चं मुलां शिवाय विश्वच नाही अस म्हणालो तरी वावगं होणार नाही , अर्थात मुलांसाठी सुद्धा आईच विश्व आहे. या गुरूचे मार्गदर्शन माझ्या नशिबाने मला आजही मिळते आहे आणि मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! पण माझे बाबा आज या जगात नाहीत. ते फक्त आठवणींच्या रुपात माझ्या सोबत आहेत. बाबांनी कृतीतून बऱ्याच गोष्टी शिकविल्या , त्या जेंव्हा पाहिल्या तेंव्हा त्याचे महत्व समजून घेता आलं नाही पण आज जेंव्हा ते नाही

स्टार्टअप सक्सेस मंत्र- टेक २

इमेज
  मला आशा आहे, की तुम्ही स्टार्टअप सक्सेस मंत्र भाग १ वाचला असावा. त्यामध्ये मी पंच सूत्री दिल्या आहेत आणि या भागात देखील पुढील पंच सूत्री विषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हा “दस का दम”, दशसूत्री म्हणा फार तर तुम्हास तुमच्या स्टार्टअपला यशस्वी करण्यात मदतगार ठरतील हे नक्की. याचा अंमल करणं कठीण आहे मलाही माहिती आहे, मागील २१ वर्षांपासून मी ही व्यवसाय करीत आहे. त्यामुळे या सूत्रींच्या कसोटीची पारख मी केलेली आहे. त्याचा जवळून अनुभव घेतला आहे. अनुभवांचे बोल म्हणा फार तर पण ही उद्योग संस्कृती स्विकारायचं एकदा नक्की केलं की त्यावर ठाम रहा, चालत रहा. आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पहावं आणि शिकावं, स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला अगदी तसचं स्वत:चा स्टार्टअप एक यशस्वी उद्योग म्हणून नावारुपास आणायचा असल्यास परिश्रम आलेच. निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी , तुमच्या स्टार्टअप प्रवासात हा मंत्र लक्षात ठेवावा असे मी सुचवेन. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाज

समांतर

इमेज
               शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण या लेखाचा आणि वेब सिरीजचा काहीही संबंध नाही, पार दूरवर संबंध नाही. विचारांची दिशा, इतिहासाची पुनरावृत्ती म्हणू फार तर आपल्याच सोबत होताना आपण पाहू शकतो त्यास कोणताही कुमार महाजन किंवा सुदर्शन चक्रपाणी व्हायची गरज नाही. संगीत आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक, फक्त काळानुरूप ते बदलत गेलं तसं ते उपलब्ध होण्याची सिस्टम देखील बदलत गेली आणि अजून खूप प्रकारची स्थित्यंतर घडतील आणि नवीनच चांगल काहीतरी पहायला, ऐकायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्याक्षिक करण्याचे कसब संगीतकारांकडे आपण पाहतो. पंचमदा अशा संगीतकारांपैकी एक, मग ते कंगवा फिरवून निर्माण होणारं संगीत, काचेचे ग्लास वाजवून तयार होणारं संगीत असेल अथवा आणखी कोणता प्रकार , सगळी जादूच !! रमेश सिप्पींच्या शोले या चित्रपटाचा रिमेक “आग” या नावाने राम गोपाल वर्मा ने तयार केला (जो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त आपटला) त्यास गणेश हेगडे, प्रसन्न शेखर या जोडीने संगीत दिले होते आणि बॅकग्राउंड स्कोर अमर मोहिले याच होतं, त्यांना जुन्या शोले मध्ये जे काही बॅकग्राउंड स्कोर पंचम दा ने दिलेला होता त्याच