पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

इमेज
  ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहाँपनाह उसे न तोह आप बदल सकते हैं न मैं , हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों में बंधी हैं , कब , कौन , कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है !             “आनंद” चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेला हा प्रसिद्ध डायलॉग, खूप वाह वाही मिळवली, चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून असेल हा डायलॉग, पण मागील वर्षी कोरोना नामक विषाणू आला आणि काहींच्या आयुष्यात सगळं होत्याच नव्हतं करू लागला. आता चालता बोलता पाहिलेला माणूस आप्त स्वकीयांना सोडून देवाघरी जाऊ लागला. मृत्यूवर कोणालाच विजय मिळविता आला नाही हे खरं आहे, मागील काही महिन्यात हे आपण सर्वजण पाहत आलो आहोत. जीव वाचावा म्हणून देवाकडे केलेल्या प्रार्थना, घातलेले साकडे याचा काहीच उपयोग होत नाही, मित्र-मंडळी, परिचित चेहरे काळाच्या पडद्याआड गेले, मृत्यू येतो म्हणजे काय तर तो त्याची वेळ पाळतो असचं म्हणावं लागेल, त्यामध्ये तो कोणतीही कसूर करत नाही, कोणत्याच प्रकारच्या भावनांचा, व्यक्तीच्या   भूतकाळ आणि भविष्यकाळाशी त्याचा काही संबंध नसतो , तो पाहतो फक्त वर्तमानकाळ.  

पंडित हृदयनाथ मंगेशकर- अलौकिक बुद्धिमत्ता

इमेज
  लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में ज़िन्दगी आ रहा हूँ मैं......           १९८४ मध्ये प्रदर्शित झालेला “मशाल” हा यश चोप्रा यांचा चित्रपट,या चित्रपटात अनिल कपूर यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर गीत, जावेद अख्तर यांचे बोल, गायलं होतं किशोरदा नी आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी..... एका नवीन आयुष्यास भेटायला निघालेला युवक ज्याने पुढील आयुष्य चांगल्या मार्गाने जगण्याचा संकल्प केलेला असतो, चित्रपट सुपरहिट होता आणि चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. मग ते “मुझे तुम याद करना और”, असेल अथवा “होली आयी रे”, असेल सगळी गाणी अगदी मिडास टच !! म्हणूनच “ओल्ड इज गोल्ड” !! हिंदी चित्रपट सृष्टीत पंडितजीनी इतरही काही चित्रपट केले ज्यामध्ये लेकीन, माया मेमसाब, लाल सलाम, धनवान यांचा उल्लेख करता येईल.       शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या घरात २६ ऑक्टोबर १९३७ मध्ये पंडितजींचा जन्म झाला, त्यांच्या वडीलांचं निधन झाल तेंव्हा पंडितजी अवघ्या चार वर्षाचे होते. घरात कानावर पडणारा रियाज त्यातूनच संगीत शिकण्याची आणि त्यात मास्टरकी मिळविण्याची इच्छा न होण हे होवूच शकत नाही. तो काळ हि

उबंटू – ओपनसोर्स ऑपरेटिंग सिस्टीम

इमेज
उबंटू (दक्षिण आफ्रिकेतील एका तत्वज्ञानावर आधारित शब्द आहे-ज्याचा अर्थ मानवाच्या कल्याणासाठी / माणुसकीच्या दृष्टीने केलेले काम) हि एक डेबियन या प्रकारातील मोफत उपलब्ध होणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेबियन हि एक मोफत ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यास योगदान देणाऱ्या डेव्हलपर्सची असोसिएशन आहे त्यांनी तयार केलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला डेबियन असे म्हणतात. उबंटू वापरकर्ते पर्सनल कॉम्प्युटर, स्मार्ट फोन वर वापरू शकतात. या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत इतरही कांही प्रोग्राम्स उपलब्ध होतात, ज्यामध्ये लिबर ऑफिस रायटर, कॅल्क, इम्प्रेस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे प्रोग्राम्स मोफत उपलब्ध होतात. या सर्वांसोबत मॉझिला फायरफॉक्स, सुडोकू, बुद्धिबळ सारखे गेम्स देण्यात आलेले आहेत.उबंटू वापरीत असताना आपण काहीतरी वेगळेच वापरत आहोत असा अनुभव येत नाही उलट ग्राफिकल युजर इंटरफेस हुबेहूब विंडोज सारखाच देण्यात आलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर छान करता येवू शकतो कारण शैक्षणिक संस्थांना सॉफ्टवेअर / ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यासाठी लायसेन्सची आवश्यकता नाही. त्याचा वापर लागलीच त्यांच्या गरजेप्रमाणे संस्था करू शकतात

किशोर कुमार- अगर तुम ना होते

इमेज
  किशोर म्हंटल कि आवाजाची जादू, किशोर म्हणजे वेडेपणा, बालीशपणा, किशोर म्हणजे प्रेमवीराचा आवाज, किशोर म्हणजे दु:ख, करुणा, हास्याचा फवारा अशी एक ना अनेक रूपे किशोरदा  जगले आणि आजही आपल्या स्मृती मध्ये जिवंत आहे !! ‘किशोर दा’ अस म्हणालो कि किशोर जवळचा वाटतो, अगदी घरातला एक सदस्य हो ना ? आपले लाडके किशोरदा यांचा आज वाढदिवस, मी वाढदिवसच म्हणेन कारण दादा आपल्या प्रत्येकाच्या स्मृतीत आजही आपली सुरेल सोबत करत आहेत.  त्यांच्या आवाजामुळे आजही दादा आपल्या आजू-बाजूस आहेत असेच वाटते. कारण त्यांच्या आवाजाची जादू न्यारीच होती, कुणीही अगदी सहज प्रेमात पडेल, कोणालाही सहज मोहून टाकेल (अनेक उदाहरणे देता येतील, पण शराबी चित्रपटातील “लोग कहते है मै शराबी हुं”,या गीताचा शेवट असाच मोहून टाकणारा आहे). संगीत न शिकलेले पण सुरात कधीच कमी न पडलेले किशोर दा म्हणजे बॉलीवूड ला देवाने दिलेली एक देणगीच !!!           करिअर ची सुरुवात अभिनेते म्हणून केली हे आपण सर्वजण जाणतो, ते एक उत्कृष्ट कलाकार होते त्यांनी कित्येक चित्रपटात प्रमुख भूमिका देखील निभावल्या आहेत आणि त्या जिवंत हि केल्या आहेत. पण “ये बॉलीवूड है, यहा कुछ