पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

यश म्हणजे साध्य, सिद्धी अन् प्रगती- भाग -२

इमेज
  मागील भागात यश म्हणजे काय? या विषयी मार्गदर्शन केले त्याचाच भाग म्हणून पुढे मार्गदर्शन करीत असताना हे यश कसे साध्य करावं यां विषयी अधिक माहिती यां लेखात देत आहे. तसे पाहिले तर यशाची व्याख्या व्यक्ति परत्वे बदलते पण तरी देखील विविध तज्ञ मंडळींनी केलेली यशाची व्याख्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते. यश म्हणजे मन:शांती अशीही व्याख्या करता येऊ शकते, जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही केलेले सर्वोत्तम प्रयत्न म्हणजे यश !! अमेरिकन तत्वज्ञानी इमर्सन याने केलेली यशाची व्याख्या आपल्याला सांगते- आनंदात राहणे, हसणे, हुशार लोकांचा आदर करणे, इतरामध्ये सर्वोत्तम शोधणे, जगाला तुमच्याकडील उत्तम देणे, जीवन सुलभ आहे , जे तुम्ही जगला आहात ते म्हणजे यश आहे. हे कसे साध्य होऊ शकेल यां विषयी मागील भागात मार्गदर्शन केलेले आहे आज याच विषयी अधिक जाणून घेऊया: १.       भावनिक बुद्धिमत्ता: एकूणच बुद्धिमत्ता हे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी योगदान देणारा एक घटक असल्याचे मानले जात आहे. परंतु काही तज्ञानी असे सुचविले आहे की भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणखी महत्वाची असू शकते. भाव