पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हायरस पासून संरक्षण

इमेज
          नीलिमा शहरातील एका फायनान्शियल कंपनीत नोकरीस आहे, तिने तिच्या कॉम्प्युटरवर ऑफिसचा सर्व डेटा स्टोअर केला आहे आणि रोजच्या रोज ती त्याचा बॅकअप देखील घेते. एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस आल्यावर ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि तिचे ऑफिसच्या विविध फाईल्स चे संगणकीकरण करणे सुरु होते तेवढ्यात तिचे लक्ष शेजारील डेस्क वरील प्रणाली कडे गेले, तिच्या अस लक्षात आल कि प्रणाली बराच वेळ झाला काहीच काम करत नाहीये, तिने लागलीच प्रणालीला विचारल, “का गं प्रणाली, काय झाल?”, आज काय मूड नाही का काम करायचा? यावर प्रणाली म्हणाली, “नाही गं, नीलिमा, अस काही नाही पण माझ्या कॉम्प्युटरवरील फाईल्स ओपन होत नाहीत त्यामुळे टेन्शन आल आहे.”            नीलिमा ने प्रणालीला तिच्या कॉम्प्युटर चा पासवर्ड मागितला आणि तिच्या कॉम्प्युटरवर ती फाईल्स ओपन होतात का ते पाहू लागली. तिच्या लक्षात आले कि ज्या प्रोग्राम मध्ये फाईल्स तयार केलेल्या आहेत तोच प्रोग्राम ओपन होत नाहीये!! ती लागलीच प्रणाली ला म्हणाली, अग तुझ्या कॉम्प्युटर वर व्हायरस आहे, त्यामुळेच हा असा प्रॉब्लेम येत आहे”, नीलिमा ने कॉम्प्युटर कोर्स केलेला असल्याने

WhatsApp बंद होणार

इमेज
  घाबरू नका .... पण हे खरे आहे. कांही स्मार्ट फोन साठी ०१ जानेवारी २०२१ पासून   WhatsApp आपली सेवा बंद करणार आहे. WhatsApp हा मोबाईल (स्मार्ट फोन) वापरणाऱ्या मंडळींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्याशिवाय मोबाईलचा वापर हि संकल्पनाच पचनी पडत नाही. अर्थात तंत्रज्ञाचा वापर करणे कुठे थांबावे हे देखील आपल्याला कळायला हवे.. या पूर्वी ३१ डिसेंबर २०१६ ला काही स्मार्ट फोन वरील WhatsApp बंद झाले तशीच घोषणा WhatsApp ने आता पुन्हा केली आहे.           WhatsApp हा इन्स्टंट    मेसेंजर वापरला जातो विविध प्रकारचे मेसेजेस पाठविण्यासाठी , त्यात टेक्स्ट , ग्राफिक , मल्टी-मेडिया मेसेज देखील आले. या मेसेंजर च्या सहाय्याने आपण आपल्या भावना आपल्या मित्र-मैत्रिणी , नातेवाईकांपर्यंत पोहोचवितो. पूर्वी अर्थात २०१६ मध्ये जर तुमचा स्मार्ट फोन एन्ड्रॅाईड   2.१   किंवा 2.2 व्हर्जन चा होता , अथवा ब्लॅक-बेरी 10 ,  Nokia S40, Nokia Symbian S60 ,  iOS6 Windows Phone 7.1  तर तुम्हाला दुसरा पर्याय पहावा लागेल असे सांगण्यात आले होते. त्याच प्रमाणे आता आयफोन 4 आणि इतर मॉडेल्स वरून WhatsApp सेवा बंद करणार आहे. जर तुमच्याक

पद्मश्री मो.रफी

इमेज
“ना फन्कार तुझसा तेरे बाद आया, मो.रफी तू बहोत याद आया”, १९९० साली प्रदर्शित झालेल्या क्रोध या चित्रपटातील हे गीत जे गायलं होत मो.अझीझ यांनी, या गीतातून रफी साहेबां विषयी एक प्रकरची कृतज्ञताच व्यक्त केली अस म्हणावे लागेल. आणि हे खरही आहे रफी साहेबां सारखा दुसरा गायक ना परत जन्माला आला ना परत येईल. रफींच्या आवजाशी साधर्म्य असणाऱ्या मध्ये शब्बीर कुमार, अन्वर, मो.अझीझ पासून थेट सोनू निगम पर्यंत हा प्रवास आहे, अजूनही काही गायक असतील हि..... पण या गायकांना प्रसिद्धी मिळाली. या गायक कलाकारांनी रफी साहेबांचा आवाज म्हणून बरेच ऑर्केस्ट्रा केले, चित्रपट केले. रफी यांना आपल्यातून जावून ४० वर्षे झाली. पण अजूनही “तेरे आने कि आस है दोस्त, तू कही आस पास है दोस्त” या त्यांनीच गायलेल्या गीता प्रमाणे ते आपल्या अवतीभवती आहेत असच वाटतं. तेरे आने कि.... हे रफी यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गीत..... एका कार्यक्रमात अपघाती संधी मिळाली आणि तो रफी यांचा पहिला कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात के.एन.सेहगल येणार होते पण ऐनवेळी लाईट गेली आणि आयोजकांना काय करावे सुचेना इतक्यात कुणीतरी रफी यांना गायला सुचविले, त

ज्ञानवर्धन

इमेज
            रमेश या वर्षी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, त्याला पदवीधर झाल्यावर नोकरी लागणे हेतू ज्ञान मिळवायचे आहे पण ते कसे मिळवावे हे त्याच्या लक्षात येत नव्हते, त्याला वाटे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा हि पदवी संपादन करताना मिळाले ते नोकरी लागताना अथवा बाहेरच्या जगात वावरताना कमी पडू नये ! त्यासाठी तो नेहमी विविध माध्यमातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करायचा, असेच एक दिवस, याच प्रयत्नात असताना त्याची भेट महेश शी झाली. महेश मागील वर्षी पदवीधर झाला होता आणि आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करीत होता. हे रमेशला माहिती होते, त्याने लागलीच महेश शी हस्तांदोलन केले आणि त्यास म्हणाला, “अरे महेश, पदवी सोबत अजून ज्ञान वाढविण्यासाठी तू काय केले होते, मलाही थोड मार्गदर्शन कर ना ! यावर महेश उत्तरला, “रमेश, तुला नक्की कशाप्रकारचे ज्ञान वाढवायचे आहे, म्हणजे सॉफ्टस्कील हवेत कि तुझ्या पदवी शिक्षणातील अत्याधुनिक बदल तुला जाणून, शिकून घ्यायचे आहेत ? हे आधी मला सांग यावर रमेश म्हणाला , “मला माझ्या पदवी अभ्यास क्रमाशी सबंधित बदल जाणून घ्यायचे आहेत, जग ज्या प्रमाणे बदलत आहे, इंडस्ट्र

सोशल मीडिया- उघडा डोळे समजून घ्या नीट !

इमेज
  आज कॉम्प्युटर चे ज्ञान नसणारा अशिक्षित समजला जातो अस आपण ऐकतो आणि मानतो देखील, त्यामुळेच असावं कदाचित, माणूस जसं जमेल तसं कॉम्प्युटर आणि त्या अनुषंगाने येणारे तंत्रज्ञान वापरत असावा बहुतेक ! कदाचित तुम्ही सहमत नसाल पण सर्व्हेक्षण तर असचं सांगतं कि “मला वापरता येत नाही”, अस सांगणारे फारच कमी !! आता हेच पहा ना, तुम्ही फेसबुक वर आहात कां? याचं उत्तर १० पैकी ७ लोकांनी होकारार्थी दिल पण हि ७ मंडळी फेसबुक कसं वापरतात हा अभ्यासाचा विषय आहे, त्यांना एवढचं माहिती असतं ,”फक्त लाईक” ठोकायचा, पोस्ट काय आहे हे पहायचं नाही, विनोदाचा भाग म्हणून सांगतो एखाद्या दु:खत बातमीला हि काही मंडळी लाईक ठोकतात!! तो लाईक का दिलेला असतो हा मात्र संशोधनाचा विषय !       पोस्ट लाईक कशी करायची हे शिकवावं लागत नाही पण चित्रास मिळणारी पसंती हि मजकुरास मिळणाऱ्या पसंती पेक्षा जास्त असते, कारण “वाचाल तर वाचाल” हे शाळेत होत, शाळा संपली पाटी खरोखरच फुटली ! अशी काहीशी परिस्थिती आजकाल पहायला मिळते, खर तर सोशल मीडिया साईटस्, ब्लॉग हि सर्व वाचनीय होवू शकतात (नव्हे आहेतच, फक्त आपल लक्ष नसतं) असा वाचक वर्ग देखील तयार होतो आहे

लेट हिम गो पीसफुली...

इमेज
रुग्णालयात डॉक्टर म्हणतात, लेट हिम गो पीसफुली ......म्हंटल तर चार शब्द पण काळजाचा ठोका नक्की चुकवू शकतील असे आहेत, खरं तर अनंताचा प्रवास सुरु करण्याची परवानगी देणारे आपण कोण? पण डॉक्टर जेंव्हा हे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात तेंव्हा मेडिकली सर्व प्रयत्न करून झालेले असतात आणि कोणत्याही चमत्काराची आशा उरलेली नसते असे आपण समजावे, अशीच स्वत:ची समजूत काढलेली योग्य ! रुग्णालयातील भिंतीनी हे शब्द अनेकदा ऐकलेले असतात, बदलतात ते फक्त ऐकणारे चेहरे. शब्द कानावर पडता क्षणी रुग्णालयातील सर्वच बाबी या दिखाव्याच्या आहेत असे भासू लागते, त्याच्या मर्यादा दिसू लागतात, रुग्णालयात भरती झाल्यापासून ओळखीचे झालेले चेहरे (डॉक्टर, सिस्टर, ब्रदर यांचे) अचानक अनोळखी भासू लागतात,   खरंतर रुग्णाची सेवा या मंडळींनी केलेली असते, भलेही तो त्यांच्या नोकरीचा एक भाग का असेना पण त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं असतं. रुग्णास लावलेली उपकरणं ज्याचा आता काहीच उपयोग नाही हे स्पष्ट झालेलं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस किती पराधीन आहे याची झालेली जाणीव, हि जाणीव खूप यातना देणारी असते. रुग्णालयातील लोक आणि नातेवा

होप यु अंडरस्टँन्ड

इमेज
  मुलं हि एक संपत्ती असतात अस म्हणालो तर वावगं होणार नाही, अर्थात इथे संपत्ती चा अर्थ आर्थिक असा न घेता तो “निसर्गाने दिलेली देणगी (बिनव्याजी)” असा घेतला तर योग्य होईल. मुलांचही एक वेगळं अस्तित्व असतं, त्यांनाही त्यांची मत असतात हे पालकांनी समजून घेतलं तर खूप गोष्टी सहज होतात, पालकांच्या म्हातारपणात ज्यास आपण दुसरे बालपण म्हणतो त्यावेळी मुलांची जबाबदारी वाढते आणि मुलांना आई-बाबा चा रोल करावा लागतो आणि त्यांनी तो त्यावेळी करावा (अपेक्षा नाही फक्त एक सूचना). तिथे कुठेही तराजू घेवून बसू नये. कारण मुलास लहानपणी घोडा-घोडा करताना बापानी ‘मुलगा मला सांभाळेल का’ असा विचार केला नव्हता, त्यात प्रेम होतं, माया होती आणि सर्वात महत्वाचं आपले पणा होता, माझ लेकरू !! हा भाव होता, आजकाल च्या धावपळीच्या जगात हा “आपलेपणा” कुठे तरी हरवतो आहे अस वाटतं. कुठेतरी वाचलं होत कि “मी, माझ” हा भाव खूप धोकादायक असतो यातून बाहेर पडण खूप कठीण पण प्रत्येक बाबतीत असणारी आशा हि “वेडीच” असते आणि इच्छांना मर्यादा नसते, एक झाली एक हे चक्र सुरूच राहतं त्यास अटकाव जर कुणी घालत असेल तर तो साक्षात यम ! तो हे करू शकतो कारण कर्म

तंत्रज्ञानाची कमाल – टेक २

इमेज
  तंत्रज्ञान जसं विकसित होतं आहे त्याप्रमाणे मानवजातीस याचा फायदाच होईल, अर्थात त्यासाठीच ते वापरलं गेलं पाहिजे. याच दरम्यान विविध संज्ञा पुढे येताना आपण पाहतो आहोत, जसं कि क्लाऊड कॉम्प्युटिंग, आय.ओ.टी.(इंटरनेट ऑफ थिंग्ज), आय.आय.ओ.टी. (इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज), ए.आय. (आर्टीफीशिएल इंटेलीजंस), या सर्व विषयांवर मी यापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते ब्लॉग व माझ्या फेसबुक वॉल वर प्रकाशित देखील केलं आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा कोणतेही क्षेत्र ! विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा मुळी हा डेटाच असणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. हा डेटा युजर विविध कारणांनी शेयर करतो, आणि याचा वापर सॉफ्टवेअर विकासक विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करतात.            लॉक डाऊन सुरु झालं आणि त्याचप्रमाणे

मोह

इमेज
  शून्य अवस्था काय असते ? कधी अनुभवली आहे का? माणूस काहीच निर्णय घेऊ शकत नाही अथवा काहीच सुचत नाही (अंधकार पसरतो) अशा अवस्थेस मी शून्यावस्था म्हणतो. माणूस देवळात जातो आणि काही ना काही तरी त्या देवाकडे मागतो, प्रत्येकवेळी तो काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो कधीच देवाला भेटायला जात नाही, अर्थात ज्याच्याकडे श्रद्धा, भक्ति आहे तोच हा खटाटोप करतो- कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. भगवद् गीते मध्ये सांगितले आहे, आत्मिक संपत्ती हीच स्थिर, शाश्वत संपत्ती आहे, तिच्यात जो दोष निर्माण करतो तो “मोह”. “मोह” हा कुणाला चुकलाय ? सगळे ‘या’ मोह पाषात अडकून राहतातच, फक्त जेंव्हा आत्मा नश्वर शरीराचा त्याग करतो तेंव्हाच हा मोह सुटतो , मोह असतो तो पर्यन्त प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. अनंताच्या प्रवासाला जाणारी मंडळी देखील यापासून परावृत्त असतात म्हणूनच त्यांना मोहत्याग करता येतो अस काहीतरी असावं, मी काही यातील तज्ञ नाही त्यामुळे ठोस मत व्यक्त करू शकत नाही, पण अनुभवा आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे,एवढचं. गीते मध्ये व्याधींचे मूळ म्हणजे ‘मोह’ ,असे सांगितले आहे. मनुष्य प्र

पल पल दिल के पास – एक मास्टरपीस

इमेज
  संगीतकार कल्याणजी-आनंदजी , गीतकार राजेंद्रकृष्ण आणि किशोरदांच ऑल टाईम हिट गाणं , सगळ्यांच फेव्हरीट गाणं अशी ज्या गाण्याची ओळख सांगता असं गाणं म्हणजे “पल पल दिल के पास” , प्रत्येकाच्या ओठावर असणारं गाणं आणि तितकच “दिल के पास” सुद्धा असणारं , गाण्याची सुरुवात ज्याप्रकारे चित्रित केली आहे , त्यास त्याकाळी (मला वाटत सध्या देखील) तोडच नाही , राखी जी पत्र हातात धरून वाचत आहेत आणि धरमपाजी पत्रातून गाणं (नायिकेची कल्पना) म्हणत आहेत. जणू काही पत्रात तोच मजकूर लिहिला आहे. या गाण्याची खासियत मला आणखी एक वाटते , गाण पाहताना दोन स्क्रीन दिसतात , एकावर राखी जी दिसतात तर दुसऱ्या स्क्रीन मध्ये पाठीमागे धरमपाजी दिसतात. हा कल्पनाविष्कार खूपच उत्तमरित्या चित्रित केला आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेला ब्लॅकमेल हा विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट. भलेही चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही पण संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचं एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचं संगीत नक्कीच उजवं ठरतं. गाणं कसं चित्रित करावं यावर आनंदजी यांची चांगली पकड असायची त्यानुसार त्यांनी अनेक चित्रपटातून याची झलक दाखविली आहे पण या गा

साथीया, ये तूने क्या किया- एस.पी.बी.

इमेज
  एस. पी. बालासुब्रमण्यम अर्थात एस.पी.बी. या नावाने परिचित असलेले प्रसिद्ध गायक कलाकार आज अनंताच्या प्रवासास निघून गेले. एक दुजे के लिए मधील “आप्पडिया”, “मेरे जीवन साथी, प्यार किये जा”, “सच मेरे यार है बस वही प्यार है”,   म्हणून कमल हसन यांचा स्वर आपल्या सर्वांच्या परिचयाचा, अगदी त्याच प्रमाणे सलमान खान याचा स्क्रीन वरील आवाज म्हणून देखील आपण एस.पी.बी. ना ओळखतो , “ आजा शाम होने आयी”, “साथीया ये तूने क्या किया”, अशी एक ना अनेक गाणी आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, एस.पी.बी यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, अनंतपुर येथे इंजीनीअरिंग पदवी साठी प्रवेश घेतला होता पण संगीताची आवड आणि त्यातील रुची यामुळे इंजीनीअरिंग “ड्रॉप आउट” हा शिक्का भाळी घेऊन त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. याच काळात एस.पी.बी. यांनी चेन्नई इन्स्टिटयूशन ऑफ इंजीनियर येथे प्रवेश घेतला. तिथे विविध संगीत स्पर्धांमध्ये एस.पी.बी. भाग घेत, त्यांच्या गायकीचे सर्वच फॅन होते, क्षणास थांबविण्याचं कसब त्यांच्या कडे होतं, अशाच विविध स्पर्धांमध्ये प्रख्यात तेलुगू चित्रपट संगीतकार एस. पी. कोडानाडपानी (एस.पी.बी. यांच

फेसबुक अकाऊंट हॅकर्स पासून सावधान

इमेज
  ---फेसबुक मेसेंजरवरील संवाद---- संजना : हाय सुमित, कैसे हो? सुमित : मै एकदम मस्त, तुम कहो ? (सुमितला प्रश्न पडतो कि संजना अचानक हिंदी मध्ये का बोलते आहे? पण तो तिला उत्तर देतो) संजना: यार, थोडे पैसे कि जरुरत है, लॉक डाऊन कि वजह से हाल बेहाल है .... तुम मदत करोगे इसलिये तुमसे बात कर रही हुं..... 9******20** इस नंबर पर १०,०००/- भिजवा दो, प्लीज   वरील संवाद ओळखीचा / कुठेतरी वाचण्यात / ऐकण्यात आलेला असावा तुमच्या, या महामारीच्या काळात असे अनेक मेसेजेस फेसबुक मेसेंजर वर अथवा whatsapp वर आलेले आणि फसगत झालेले मित्र / परिचयातील व्यक्ती तुम्ही पाहिले असतील. हॅकर्स तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉग इन करतात आणि मित्र परिवारा कडून पैशाची मागणी करतात. आपला मित्र / मैत्रीण अडचणीत आहे समजून मदत केली जाते आणि इथेच फसगत होते. तुमच्या फेसबुक अकाऊंट ची काळजी तुम्हीच घेणे अपेक्षित आहे, आज काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही अमलात आणल्यास यास प्रतिबंध करणे शक्य होऊ शकेल. साधारण लॉक डाऊन सुरु होण्यापूर्वी भारतीय मंडळी दिवसभरातील १५० मिनिटं सोशल मीडिया साठी देत होती ती लॉक डाऊन काळा