पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

क्रोम ओ.एस.- गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम

इमेज
आपण कॉम्प्युटर वापरतो, स्मार्ट फोन वापरतो पण तो चालतो कसा याचा विचार कधी केला आहे? तो कॉम्प्युटर / स्मार्ट फोन ऑपरेटिंग सिस्टीम मुळे सुरु होतो व चालतो. ऑपरेटिंग सिस्टीम असते म्हणून आपण त्यावर विविध प्रोग्राम्स,अॅप्स वापरू शकतो, जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपणांस काहीच करता येत नाही, सर्वात महत्वाच म्हणजे सुलभ युजर इंटरफेस देण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टीम करते, ज्यामुळे युजरला कॉम्प्युटर / स्मार्ट फोन वापरणे सोईचे होते. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड या काही आपणांस माहिती असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. यांचा वापर तुम्ही कॉम्प्युटर व स्मार्ट फोन वर करीत असाल. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड चा सर्वात मोठा आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांचा ग्राफिकल युजर इंटरफेस, ज्यास GUI असे देखील म्हणतात. या दोन ऑपरेटिंग सिस्टीम व्यतिरिक्त लिनक्स हि एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात उपलब्ध आहे. हि ऑपरेटिंग सिस्टीम देखील GUI ची सुविधा उपलब्ध करून देते.           गुगल या टेक्नोलॉजी कंपनीने जुलै २००९ मध्ये सर्व प्रथम ऑपरेटिंग सिस्टीम देण्याबाबत जाहीर प्रसिद्धी केली होती परंतु सर्व तयारी पूर्ण

Industrial Internet Of Things (IIOT)

इमेज
आय.आय.ओ.टी (IIOT) म्हणजे काय ?           IIOT म्हणजे इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज. आय ओ टी मध्ये संगणक, इतर साधने/ वस्तू या एकमेकाशी इंटरनेट द्वारे जोडलेल्या असतील व त्या एकमेकांमध्ये देटा शेयर करतील हे क्लाऊड तंत्रज्ञानाने साध्य करता येवू शकेल, अस म्हणण्यापेक्षा शेयर होते आहे अस म्हणणे योग्य होईल कारण तसा वापर वाढत चालला आहे. (महानगरा मध्ये वापर होत आहे.) हळूहळू आय ओ टी ची व्याप्ती घरामध्ये, शाळामध्ये, दुकानांमध्ये अनुभवता येवू शकेल, डेटा शेयरिंग करीत उत्पादन क्षमता वाढविणे हेतू आय आय ओ टी ची संकल्पना वापरात आणली असता पूर्वी पेक्षा उत्पादन क्षमता वाढू शकते असे तज्ञांचे मत आहे. काही नाविण्य जपणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याकडील साधनांना एकमेकाशी जोडून यावर काम देखील सुरु केले आहे.           आय आय ओ टी (IIOT) च्या सहाय्याने कंपन्या त्यांच्याकडील साधनं एकमेकाशी जोडून तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत त्यामुळे साधनांची सूचक देखभाल करणे या कंपन्यांना सहज शक्य होते आहे. IIOT मुळे कंपन्यांना फॅक्टरी फ्लोअर ते कार्यालय पर्यंत उपलब्ध विविध साधनांना एकमेकाशी जोडणे शक्य होत आहे. उत्पादन क्षमता

ऑनलाईन जाहिरातीचे विश्व

इमेज
जाहिरात आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे, यात शंका कोणाच्याही मनात नसावी, माझ्यातर अजिबात नाहीच !! वृत्तपत्रापासून, टीव्ही अगदी अवती भवती सुद्धा जाहिरातींचा मारा आपल्यावर अखंड सुरु असतो. वेब साईट तयार करताना देखील आजकाल जाहिराती याठिकाणी पोस्ट केल्या जातात. तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वर जेंव्हा एखादे अॅप इंस्टॉल करता त्यावेळी देखील तुम्हाला जाहिराती पहावयास मिळतात, मग आता प्रश्न पडला असेल कि मी आज जाहिराती बद्दल एवढ का तुम्हाला सांगतोय ? तर त्याच कारण हि तसेच आहे तुम्ही देखील तुमच्या व्यवसायाच्या जाहिराती विविध वेब साईटवर पोस्ट करू शकता आणि ते देखील योग्य भावा मध्ये !!           ऑनलाईन जाहिरात करणे हेतू तुम्ही गुगल अॅडवर्ड, बिंग, अॅङरोल, 7सर्च, अॅडलॅडमार्क ई. नेटवर्कचा वापर करू शकता. गुगल अॅडवर्ड मध्ये जाहिरात करायची असल्यास ती गुगल सर्च इंजिनला उघडल्यास सेक्शन 1 व सेक्शन 2 या स्वरूपात दोन ठिकाणी आपणांस दिसेल. इथे युजर ने सर्च केलेल्या कि-वर्ड प्रमाणे डेटा सर्च होतो व रिझल्ट दाखविताना गुगल तुमच्या जाहिरातीची लिंक सेक्शन 1 / सेक्शन 2 मध्ये युजरला दाखवितो. गुगल हे लोकप्रि