पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

काश्मीर फाइल्स - मार्दव रक्तलांछन

इमेज
            “काश्मीर फाइल्स” सोशल , इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सध्या   ट्रेंडिंग आहे,   हा चित्रपट पाहून अनेक मंडळींनी त्यांची मते व्यक्त केली. चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला , हे सल्ले कुणी कुणी दिले त्याच्या बातम्या रोज येऊन धडकतात, त्यावर प्रतिक्रिया देखील देऊन काही मंडळी मोकळी झाली पण ही प्रतिक्रिया म्हणजे काय तर कुणी अंधभक्त, तर कुणी ह्या पक्षाचा, कुणी ह्या समाजाचा म्हणून त्याच्या कॅटेगरी ठरविण्यात आल्या. व्यक्त होणं सोडून देणं घातक वाटतं पण ‘व्यक्त’ झाल की लागलीच शिक्का मारला जातो हे कुठेतरी टोचतं तरी आज लिहितो आहे. इतिहास पाहायचा तर आता चित्रपट गृहात पाहायचा काय? त्यासाठीच सिनेमा आहे की काय? खरेतर समाजाचा आरसा म्हणजे सिनेमा, ठरवलं तर जे चांगल आहे ते घ्यायला काहीच हरकत नाही पण ..   असो एक ना अनेक प्रतिक्रिया उमटत असताना डोक्यात विचार येतो की “राजकारणाची फोडणी” दिल्याशिवाय आता देशात काही करता येत नाही काय? अभिव्यक्ति स्वातंत्र्य हा “फक्त गुळगुळीत शब्द” बनून राहू पहात आहे की काय? आपण व्यक्त होताना ते अभ्यासपूर्ण असाव एवढच आपण पाहिल तर मला वाटतं योग्य होऊ शकेलं. ब्रिटिश भारत देशातून