पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

ए भाई जरा देख के !!

इमेज
वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हेच मुळी आपल्याला रुचत नाही. काय होतं? हा जो फाजील आत्मविश्वास आहे तो बऱ्याच वेळा घातक ठरतो. मग अनुज्ञाप्ती (लायसन्स) नसतानाही वाहन चालविणाऱ्या छोटे सरकार ते घरातील कर्तबगार व्यक्ती अशा अनेकांमध्ये असाच आविर्भाव पहायला मिळतो. थांबा असा सिग्नल लागलेला असताना देखील जायची प्रचंड घाई असणारे असोत कि सिग्नल सुटायच्या आधीच वाहन दामटणारी प्रचंड व्यस्त (बरोबर ओळखलतं, मोबाईल वर व्यस्त असणारी) मंडळी असोत या सगळ्यांसाठी श्री.यमराज विश्रांती घेत असतात त्यामुळेच आत्मविश्वासाचे रुपांतर फाजील आत्मविश्वासात होते. हे सगळं खूप भयंकर आहे असं नाही का वाटतं? आपण किती जरी व्यवस्थित वाहन चालवीत असलो तरी समोरून येणारे वाहन चालविणारा कसा वाहन चालवितो यावर देखील बरेच अवलंबून असते म्हणूनच सर्वांनीच नियमांची पायमल्ली थांबवावी.               सोलापूर जिल्ह्याशी जोडले जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन रुपडं घेवून सेवेत तयार होत आहेत, हे आपण जाणतोच, त्याचप्रमाणे हे महामार्ग विविध आव्हानं देखील सोबत आणत आहेत कि काय? अस वाटतं. तस पाहिलं तर अपघातांची मालिका कमी होण्यास मदत नक्की ह