पोस्ट्स

Sulekhan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सोलापूर की पुणे? पूर्वग्रहांचा सुस्कारा आणि वास्तवाचा आवाज

इमेज
  नुकताच एका पुणे स्थित कंपनीतील अधिकारी वर्गाशी मार्गदर्शन सेशन विषयी संवाद झाला. त्यांनी मला तुम्ही कोठे असता ? पुणे की सोलापूर - मी उत्तर दिलं सोलापूर – एक दोन दिवसांत संपर्क करू / ऑनलाइन कॉल घेऊ हे सांगायच्या अगोदर त्यांनी सोडलेल्या सुस्काराने (श्वासाने) मला उत्तर मिळालं, घडलही अगदी तसेच, ना फोन आला ना ऑनलाइन कॉल विषयी डिटेल्स ! असा अनुभव काही मला एकट्यालाच आला असेल असे नाही, अनेकांना आला असावा पण असे वाटते की प्रतिभा, ज्ञान, अनुभव फक्त मेट्रो सिटी मध्येच असतो का? सोलापूर सारख्या शहरात हे सारं नाही का? सोलापूर विषयी एवढी नकरात्मकता का ? उपहास का ? अनुभवातून उमटलेला प्रश्न हा केवळ एका संवादापुरता मर्यादित नाही , तर तो आपल्या समाजात शहरांबद्दल निर्माण झालेल्या प्रतिमा , पूर्वग्रह आणि “स्टेटस सिम्बॉल” मानसिकतेशी जोडलेला आहे. “पुणे की सोलापूर ?” या साध्या प्रश्नाला मिळालेला सुस्कारा आणि त्यामागची सूक्ष्म प्रतिक्रिया ही अनेकदा शब्दांपेक्षा जास्त काही सांगून जाते. सोलापूरबद्दल दिसणारी नकारात्मकता ही प्रत्यक्ष वास्तवापेक्षा लोकांच्या मनात तयार झालेल्या प्रतिमांवर आधारित असते , असे म...

घुटमळलेलं मन

इमेज
            सकाळीच आठवणं झाली , तशी या साठी काही विशेष दिवस असे काही लागत नाही. साऱ्या गोष्टी डोळ्या समोर सहज तरळून जातात. सिनेमाच्या पडद्यावर जशा फ्लॅशबॅक स्वरूपात दाखवल्या जातात ना अगदी तशाच ! सारं काही कालच घडलं असं वाटतं, आपण हतबल होऊन फक्त वाट पाहत होतो पण नियतीला तिचा डाव साध्य करायचा होता तो तिने केला. मेंदूतील रक्तस्त्राव पूर्ण क्लिअर करणं खूप जटिल प्रक्रिया, त्यात झालेला रक्तस्त्राव क्लीन करे पर्यन्त नुकसान झालेल्या पेशी , त्यामुळे होणारे इतर परिणाम हे सारं खूप गुंतागुंतीच आहे. तरी सकाळी ऑपेरिटीव पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “खूप सहन केलं त्यांनी”, एक डॉक्टर हे म्हणतो याचा अर्थ त्या ऑपेरेटीवने होणाऱ्या वेदनांचा अंदाज त्यांना असतोच. एवढ्या वेदना सहन केल्या पण शुद्ध काही आली नाही.             तो निर्जीव पांढराशुभ्र हॉस्पिटलचा कॉरिडॉर , औषधांचा उग्र वास , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर शांतत्व आणि आतून सतत धडधडणारं मन — आजही सगळं तितकंच जिवंत वाटतं. आपण बाहेर उभे , पूर्ण हतबल. हातात काहीच...

पण, परंतु .. आणि निर्णय

इमेज
  अनेकदा आयुष्यात काही निर्णय आपण त्या क्षणाच्या उपलब्ध साधनांवर , परिस्थितीवर आणि आपल्या समजुतींवर घेतो. त्या वेळी ते निर्णय अगदी योग्य वाटतात. पण काळ पुढे सरकतो , अनुभव वाढतात , आणि मग मागे वळून पाहताना काही प्रश्न मनात ठाण मांडून बसतात—“तो निर्णय योग्य होता का ?”, “ मी वेगळी वाट निवडली असती तर काय झालं असतं ?” अशा प्रश्नांचं ओझं हळूहळू मनावर साचतं आणि एक प्रकारचं ‘शल्य’ मनात निर्माण होतं. खरं तर निर्णय घेताना आपण त्या काळात ‘प्राप्त’ आणि ‘पर्याप्त’ अशा गोष्टींचा विचार करतो. जे मिळालं आहे आणि जे पुरेसं वाटतंय , त्याच्या आधारे आपण पुढे जाण्याचा मार्ग ठरवतो. त्या क्षणी तो निर्णय पूर्णपणे तर्कसंगत आणि योग्य वाटतो. पण आयुष्य ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. परिस्थिती बदलते , माणसं बदलतात , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली विचारसरणी बदलते. त्यामुळेच कालांतराने घेतलेले निर्णय नव्याने तपासून पाहावेसे वाटतात. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—विचारांचं पीक. एकदा का मनात एखादा विचार रुजला की तो वाढत जातो. त्याला खतपाणी मिळतं अनुभवांचं , तुलना करण्याचं , आणि ‘जर-तर’च्य...

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास का महत्त्वाचा?

इमेज
  व्यवसाय आणि आपण स्वत: एक वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो , तर तो आपल्या अस्तित्वाचा , आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची मनापासून निवड करतो , जिच्यावर प्रेम करतो , त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्...

दु:खाची नवी ओळख

इमेज
  जीवन म्हणजे सुख-दुःखांची अखंड चालणारी साखळी. एका क्षणी आनंदाचा झरा वाहतो , तर दुसऱ्याच क्षणी दुःखाचे ढग दाटून येतात. मनुष्यस्वभाव असा आहे की , तो स्वतःच्या दुःखांमध्ये इतका गुंतून जातो की त्याला जगातील  वास्तव दिसेनासे होते. अशा वेळी “दुनिया में कितना ग़म है , मेरा ग़म कितना कम है” ही ओळ आपल्याला एक वेगळीच दृष्टी देऊन जाते. ही केवळ एक काव्यपंक्ती नाही , तर जीवन समजून घेण्याचा एक गूढ आणि गहन दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा आपल्या अडचणी , समस्या , अपयश , तणाव यांवर इतके लक्ष केंद्रित करतो की त्या आपल्याला असह्य वाटू लागतात. एखादी छोटीशी अडचण देखील पर्वताएवढी भासते. पण जर आपण थोडा वेळ थांबून आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिले , तर लक्षात येईल की अनेक लोक आपल्या पेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. कुणी दारिद्र्याशी झुंज देत आहे , कुणी आजाराशी लढत आहे , तर कुणी आपले प्रियजन गमावून जगण्याचा प्रयत्न करत आहे. या तुलनेत आपले दुःख खूपच लहान वाटू लागते. हीच गोष्ट आपल्याला अधिक संयमी आणि कृतज्ञ बनवते. कारण जेव्हा आपण इतरांच्या दुःखांकडे पाहतो , तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातील चां...

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

समांतर

इमेज
               शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण या लेखाचा आणि वेब सिरीजचा काहीही संबंध नाही, पार दूरवर संबंध नाही. विचारांची दिशा, इतिहासाची पुनरावृत्ती म्हणू फार तर आपल्याच सोबत होताना आपण पाहू शकतो त्यास कोणताही कुमार महाजन किंवा सुदर्शन चक्रपाणी व्हायची गरज नाही. संगीत आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक, फक्त काळानुरूप ते बदलत गेलं तसं ते उपलब्ध होण्याची सिस्टम देखील बदलत गेली आणि अजून खूप प्रकारची स्थित्यंतर घडतील आणि नवीनच चांगल काहीतरी पहायला, ऐकायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्याक्षिक करण्याचे कसब संगीतकारांकडे आपण पाहतो. पंचमदा अशा संगीतकारांपैकी एक, मग ते कंगवा फिरवून निर्माण होणारं संगीत, काचेचे ग्लास वाजवून तयार होणारं संगीत असेल अथवा आणखी कोणता प्रकार , सगळी जादूच !! रमेश सिप्पींच्या शोले या चित्रपटाचा रिमेक “आग” या नावाने राम गोपाल वर्मा ने तयार केला (जो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त आपटला) त्यास गणेश हेगडे, प्रसन्न शेखर या जोडीने संगीत दिले होते आणि बॅकग्राउंड स्कोर अमर मोहिले याच होतं, त्यांना जुन्या शोले ...

स्पर्श

इमेज
शब्द उच्चारताच अनुभूती होते, नाही का ? काहींच्या गोड आठवणी जाग्या झाल्या असतील. मला तर हा शब्द च चमत्कारिक आहे अस वाटतं कारण आपण आपसूकच विचारून जातो ,”कुणाचा ?” पण “स्पर्श” ची व्याख्या करायची ठरवल तर कुणा एका पुरती ती करता येणार नाही, कारण प्रत्येकास ती वेगळी असेल, परिभाषा वेगळी असेल, अनुभूती वेगळी असेल, भाव- भावना वेगळ्या असतील... नाही का ?  आता हेच पहा ना, छोट्या बाळाचा स्पर्श अनुभविण्यासाठी आसुसलेली आई, बाळ हातात घेण्यासाठी वाट पाहणारे ताई, दादा, यांची स्पर्शाची व्याख्या शब्दात व्यक्त होवू शकेल? मला नाही वाटत शक्य आहे, पण हा स्पर्श च एक अजब रसायन आहे प्रेम विरांसाठी स्पर्श म्हणजे एक “दिव्य” अनुभूती, ज्याची वाट प्रत्येक जण आयुष्यात बघत असतो, हे एक गोड गुपित असतं पण तुमचं आमचं सेम असतं !!   दोन एक दिवसा पूर्वी सकाळी फिरताना (morning walk) एक आजी- आजोबा दिसले, आजोबांच बहुधा मोती-बिंदू च ऑपरेशन झाल असाव, कारण त्यांनी काळा चष्मा घातला होता. आजी-आजोबांच्या छान गप्पा रंगल्या होत्या त्यांना आजू-बाजूच्या लोकांशी काहीच घेण-देण नव्हतं, माझ त्या दोघांकडे लक्ष गेलं आजीनी आजोबांचा ह...

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

इमेज
  ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहाँपनाह उसे न तोह आप बदल सकते हैं न मैं , हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों में बंधी हैं , कब , कौन , कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है !             “आनंद” चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेला हा प्रसिद्ध डायलॉग, खूप वाह वाही मिळवली, चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून असेल हा डायलॉग, पण मागील वर्षी कोरोना नामक विषाणू आला आणि काहींच्या आयुष्यात सगळं होत्याच नव्हतं करू लागला. आता चालता बोलता पाहिलेला माणूस आप्त स्वकीयांना सोडून देवाघरी जाऊ लागला. मृत्यूवर कोणालाच विजय मिळविता आला नाही हे खरं आहे, मागील काही महिन्यात हे आपण सर्वजण पाहत आलो आहोत. जीव वाचावा म्हणून देवाकडे केलेल्या प्रार्थना, घातलेले साकडे याचा काहीच उपयोग होत नाही, मित्र-मंडळी, परिचित चेहरे काळाच्या पडद्याआड गेले, मृत्यू येतो म्हणजे काय तर तो त्याची वेळ पाळतो असचं म्हणावं लागेल, त्यामध्ये तो कोणतीही कसूर करत नाही, कोणत्याच प्रकारच्या भावनांचा, व्यक्तीच्या   भूतकाळ आणि भविष्यक...

श्रद्धा आणि देव

इमेज
  आपण आयुष्यभर कोठे न कोठे श्रद्धा ठेवून असतो मग ती गुरूंवर असेल , देवा वर असेल, जन्मदात्या आई- वडिलांवर असेल, श्रद्धा हि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटते, काही ना काही अनुभूती देते म्हणूनच ती प्रत्येकाच्या आयुष्यात टिकून असते. मला वाटत तसे अनुभव तुम्हालाही आलेले असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे , तो ज्याला कळाला त्याला ती तारक वाटते, सुखावह वाटते पण श्रद्धा हि अंधश्रद्धा होवू नये कारण मग ती मारक ठरू शकते. “देव” हा एक श्रद्धेचा भाग आहे, आस्थेचा भाग आहे, ज्याची जशी श्रद्धा तसा त्यास अनुभव !!! कोणास कधी देव माणसात भेटतो, कधी तो फक्त अनुभवता येतो तर कधी दगडात देखील देव दिसतो, तो आहे अस आपण मानतो. पण ज्या दगडास घडवून मूर्ती तयार होते त्या मूर्तीत देव मावतो ? हा श्रद्धेचा भाग आहे. भारतात तरी याच उत्तर होकारार्थीच आहे. श्रद्धा ठेवली तर दगडाच्या मूर्तीत देव वसतो व मावतो देखील. जो मूर्तिकार मूर्ती घडवितो त्यास देवाची अनुभूती मिळते का? याच उत्तर एखादा मूर्तिकारचं देवू शकेल. जेंव्हा दगडाला एखाद्या मूर्तीच मूर्त रूप येते तेंव्हा त्यात आपल्याला कल्पनेप्रमाणे (मनात असणाऱ्या चित्रा ...

मोबाईल हरवला तर ?

इमेज
  शीर्षक वाचून गोधळलात का ? गोंधळून जावू नका पण आज मोबाईल या संवाद (?) साधना बद्दल काही सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे करीत असताना एक विचार सुद्धा मांडत आहे कि तुमचा मोबाईल गहाळ झाला तर ? काय होवू शकेल? हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही, हो ना ?  याचही एक कारण आहे ते अस, एवढे दिवस अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असं आपणं मानतं होतो पण २१ व्या शतकात या सोबत मोबाईल हि एक गरज बनली आहे. शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत या मोबाईल ने सगळ्यांशी गट्टी जमविली आहे आणि गट्टी साधी सुधी नाही अगदी “जिगर” दोस्ती, मेड फॉर इच अदर म्हणाना ! थोडं आश्चर्य वाटेल पण वास्तव तर असच आहे. मागील वर्षी कोरोना मुळे चालू झालेल्या लॉकडाऊन मध्ये सच्चा साथी म्हणून मोबाईलने प्रमुख भूमिका बजावली आहे. तीच भूमिका आताच्या लॉकडाऊन मध्येही बजावतो आहे, नाही का? या  मोबाईल ची फोन करणे, संवाद साधणे हि प्राथमिकता पण काही ठिकाणी तर हि प्राथमिकता सोडूनच इतर कारणांसाठी हा मोबाईल वापरला जातो. एक सर्वेक्षण असं सांगत कि हा मोबाईल एक वेळ आलेला फोन रिसीव्ह कर...

व्हिजिटिंग कार्ड

इमेज
  वेळ संध्याकाळची, बाहेर अगदी मन हर्षून जाण्यासारख वातावरण पडल होत. मी असाच फिरायला म्हणून बाहेर पडलेलो. रुटीन मुळे तसा थोडा वैतागलेलाच होतो मी पण आज बॉस ने अगदी केबिन मध्ये बोलावून सांगितले, “रमेश उद्या तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर केलेली आहे, तुमच्या कामावर साहेब (आमचे डायरेक्टर साहेब) खूपच खुश आहेत, म्हणून तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. “सुट्टी म्हणजे काय?” तर मागितलेली रजाच मंजूर झाली होती ती ! मी घरी पोहोचलो, घरात आई नेहमीप्रमाणे देवळात गेलेली , बाबा अजून ऑफिस मधून यायचे होते आणि बहीण “अश्विनी” ती काय घरात असून नसल्या सारखीच कारण इयत्ता बारावीच वर्ष !!           दुसरे दिवशी रजा असल्याने संध्याकाळ मिळाली होती आणि तीही निवांत होती . त्यामुळे फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. आम्हाला फक्त सूर्य उगविताना कसा दिसतो हेच माहिती तो मावळतो सुद्धा याची कल्पना नाहीच मुळी पण आज तो मावळताना पहिल्यांदाच पाहिलं, निसर्गाच खर रूप जे शब्दात वर्णन करता येणार नाही असं. पाखर आपल्या घरी परतत होती. प्रत्येकाच एकच लक्ष होत , घर !! प्रत्येकजण द...