पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

ओव्हर द टॉप (OTT)- जरा सांभाळून

इमेज
  साधारण ऑगस्ट १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला आणि तेथून मोबाईल क्रांती म्हणू आपण फारतर, ती सुरू झाली. मोबाईल पूर्वी पेजर सारखी सुविधा काही शहरात सुरू होती पण मोबाईल वापर करणारी मंडळी व्यावसायिक होती, ज्यात इनकमिंग कॉलला देखील चार्जेस होते. त्यानंतर जवळपास सतरा वर्षा नंतर २०१२ मध्ये कोलकाता येथे 4 G तंत्रज्ञानाचा श्रीगणेशा झाला. २६ वर्षांचा कालावधी झाला आहे आणि या कालावधीत “भारत” स्मार्ट फोन मार्केट साठी जगात दुसऱ्या स्थानी आहे. खूप गोष्टी बदलल्या, खूप गोष्टी सोप्या झाल्या, फक्त कॉल करण्यासाठी फोन अशी त्याची व्याख्या न राहता इंटरनेटच्या सहाय्याने करमणूक, बँकिंग, गप्पा-टप्पा,  ई-कॉमर्स, गेमिंग, ई-लर्निंग या कारणांसाठी वापरला जाऊ लागला. यात सगळ्यात जास्त “करमणूक” या प्रकारात स्मार्ट फोनचा वापर होत आहे आणि तो होत राहील.           ओव्हर द टॉप ( OTT ) प्लॅटफॉर्म ने इंटरनेट सहाय्याने स्मार्ट फोन वर टेलिव्हिजन आणि चित्रपट सेवा देण्याचे सुरू केले आणि त्यास प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली, मिळत आहे आणि रा

ट्रेंडस् – लाख मोलाची गोष्ट

इमेज
  टेलिव्हिजन पाहताना टी. आर.पी. ला महत्व असतं आणि त्याची पूर्ण काळजी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील मंडळी घेत असतात, तो कसा वाढेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन असतात. आजकाल विविध न्यूज / करमणूक वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात , पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार  ( त्यांच्या लेखी )  कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल , असो आजचा हा विषय नाही, तसाच काहीतरी “ट्रेन्डीग” हा प्रकार इंटरनेट वर सापडतो, आज काय ट्रेन्डीग आहे अथवा काय होऊ शकेल याकडे काही मंडळी जाणीवपूर्वक कामात असतात, “ट्रोल” करणं हा सोशल मीडिया मधील एक भाग, पण “ट्रेंडस्” तुम्हाला विविध सर्च इंजिनवर काय हुडकलं गेल आहे ते दाखवितं.            जसे की “गुगल” या सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या सर्च इंजिनवर (इतरही सर्च इंजिन आहेत जसे की, बिंग, अल्टा विस्टा ( आता याहू ) ,   askjeeves.com इ.) काय सर्वात जास्त हुडकलं गेल आहे याचा लेखाजोखा तुम्हाला देतं.

अर्थ करी समर्थ – समर्थ सहकारी बँक

इमेज
  समर्थांनी आत्मज्ञानास प्रगट करण्याचा सर्वोत्तम मार्ग निवडून ज्ञान भांडार सर्व सामान्यास उपलब्ध करून दिले आहे. मानवात ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगांचा विलास स्पष्ट होतो. यातील ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात व कर्तुत्व अंगाला शारदा म्हणतात. दिसायला दोन वाटणारी अंगे मुळात एकच असतात. म्हणूनच ज्ञान व कर्म, सिद्धांत व व्यवहार, विचार आणि आचार यांचा अविरोध असणारे हे उत्तम लक्षण समजले जाते. समर्थ म्हणतात , “कुबेरापासूनी अर्थ | वेदांपासूनी परमार्थ | लक्ष्मीपासून   समर्थ | भाग्यासी आले ||” अर्थात कुबेर संपत्तीचे, वेद परमार्थाचे, लक्ष्मी ही भाग्य आणि सामर्थ्याचे मूळ होय. हेच ब्रीद आणि आचरण घेऊन समर्थ सहकारी बँकेची 3000 कोटी पेक्षा जास्त मिश्र व्यवसाय साध्य करीत वाटचाल सुरू आहे.                  " अर्थ करी समर्थ" हे ब्रीद घेवून सोलापुरच्या जड़ण-घडणीत मोलाचे योगदान देणारी बैंक म्हणजे "समर्थ सहकारी बैंक". समर्थांची शिस्तच जणू प्रत्येक कर्मचाऱ्यात पहायला मिळते. दासबोधात सांगितल्याप्रमाणे , " आधी कर्माचा प्रसंग , कर्म केले पाहिजे सांग , या समर्थानी केलेल्या उपदेश निरूपणाचा प्

कर्मचारी संबंध- चार मुलभूत आधारस्तंभ

इमेज
  कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं, हे ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी, त्या सिस्टमनी  तुमची कंपनी चालली पाहिजे, हे ध्यानात घ्यायला हवे, बऱ्याच वेळा काय होतं, कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते, असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.           कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट, भावनिक, व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात, यातील प्रत्येक पैलूस महत्व द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित करते की सर्व कर्मचार्‍यांना नीट वागणूक मिळते आहे , कर्

नो युवर कस्टमर – ग्राहक ओळखा

इमेज
  व्यवसायात यशस्वी व्हायचं असल्यास, ग्राहक ओळखणे हि कला आत्मसात करणे आवश्यक आहे. यास कला म्हणणेच योग्य होईल कारण जर ग्राहक आहे तर व्यवसाय आहे, हे साध सोप गणित आपल्या लक्षात यायला हवं, नाही का? एखाद्या व्यवसायाचं यश, अपयश हे फक्त ग्राहक ओळखता न येणं एवढ्यावर अवलंबून असू शकतं. ग्राहकास काय हवं हे जर आपण जाणलं (यासाठी स्वत: ग्राहक होण फायदेशीर होवू शकतं) तर आपण त्याचे उपाय तयार करू शकतो, विविध सेवा उपलब्ध करून देवू शकतो. व्यवसाय जिथे सुरु करायचा आहे तेथील लोकसंख्या शास्त्र आपल्याला बरीच मदत करू शकतं, तेच आपले ग्राहक होणार आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या गरजा, विविध सेवांप्रती त्यांचे वर्तन आणि उत्पादनाच्या किमती विषयी असणारी संवेदनशीलता याचा अभ्यास व्यवसायाचे विपणन (मार्केटिंग) करण्याकामी मदतगार ठरू शकतो. ग्राहकास समजून घेणं यामध्ये त्याच्या मुलभूत, सामाजिक, भावनिक, विशिष्ट कार्यासबंधी असणाऱ्या गरजा लक्षात घेणं आवश्यक असतं. आपल्या ग्राहकांसाठी आपण जितके अधिक मूल्य तयार करू शकता तेवढे आपण व्यवसायात यशस्वी व्हाल.        ग्राहकास काय हवं याचा अभ्यास झाला कि त्याची टॅब्युलर स्वरूपात रचना करा,