पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

स्टार्टअपची कल्पना

इमेज
  स्टार्टअप हा शब्द आपल्या चांगला परिचयाचा झाला आहे. त्यास वेगळ्या ओळखीची गरज नाही असं वाटतं मला पण ज्या शिक्षण पद्धतीत आपण वाढलो, शिकलो ती शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम जॉबची संधी देऊ करते, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे आपण जाणलं, समजलं पाहिजे. मग जर स्वत:चा स्टार्टअप करायचा असेल तर तुमच्याकडील कल्पनांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. कल्पना ही अद्वितीय हवी, ती नवीनच असावी असे नाही एखाद्या प्रचलित गोष्टीमध्ये बदल करून नवीन सुरुवात देखील स्वागतार्ह आहे. मी माझ्या व्याख्यानात सांगतो तेच पुन्हा सांगेन “कल्पनांचा नवोन्मेष” फार महत्वाचा. आपल्या युवक वर्गाकडे असे कौशल्य आहे त्यास गरज आहे आत्मविश्वास देण्याची आणि “हो पुढे मी तुझ्या सोबत आहे” असा विश्वास देण्याची.           जमशेठजी टाटा यांना कोणती कल्पना सुचली की त्यांनी भव्य मोटर्स कंपनी बनविण्याचे ठरविले? धीरूभाई अंबानी यांना कोणती कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी सुरू केली जी आज सर्वात मोठी कंपनी आणि भारताची शान म्हणून आपण पाहतो. या दोघांमध्ये आणि इतर यशस्वी उद्योजकां मध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्यांनी त्यांच्य

“स्टार्ट अप” इंडिया

इमेज
  स्टार्टअप लेखमाला सुरू झाली आणि त्याचे चार भाग प्रकाशित देखील झाले. स्वत :चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे. तुमच्याकडील कल्पनांची पारायणं तज्ञ व्यक्तीं सोबत करावी लागतील, त्यास प्रमाणित करून घ्यावे लागेल , तुमची कल्पना समाजातील कोणत्या प्रकारची अडचण सोडवू शकते आहे का , हे तप

फेसबुकचे मेटावर्स – रिब्रॅंडिंग

इमेज
  मार्क झुकरबर्ग याने गुरुवारी फेसबुकचे नाव बदलण्याविषयी जाहिर माहिती दिली. ज्या प्रमाणे कंपनी विविध क्षेत्रात काम करीत आहे त्याप्रमाणे फेसबुक हे नाव पुरेसं नाही, अस त्यास वाटते, त्यानुसार इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या विविध सेवा कंपनी देऊ करते आहे तर मग त्यास साजेस असं नाव हवं, मार्क आता कंपनीचे नाव “मेटा” असे ठेवणार आहे, डिसेंबर महिन्यापासून व्यापार एम्. व्ही. आर. एस.   या नावाने सुरू होईल.           फेसबुकच्या माध्यमातून लोक आभासी एकत्रित येतात, मैत्री करतात, गप्पा आणखी भरूपूर काही करता येऊ शकतं पण हे सगळं ज्या प्लॅटफॉर्मवर होतं त्याचं नाव साजेस नाही असे मार्कला वाटल्याने त्याने कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय जाहिर केला, पण आता काय होईल तर याच आभासी प्लॅटफॉर्म वर लोक एकत्र तर येतीलच पण सोबत व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस (संवर्धित वास्तविकता चश्मा), ऑनलाइन गेम्स याचा वापर शक्य होईल. मेटावर्स काय आहे?                         मेटावर्स हे संगणकावर तयार करण्यात आलेली आभासी जागा आहे जिथे लोक एकत्रित येतील आणि विविध हार्डवेअर [( oculus , h

रिअर व्हीव मिरर – व्हेरी रेअर

इमेज
  केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८८ मधील सेक्शन ५ आणि ७ प्रमाणे प्रत्येक दुचाकी वाहनास दोन रिअर व्हीव मिरर (साईड मिरर (आरसे)) आवश्यक आहेत. नसल्यास रुपये २०० इतका दंड घेण्याचा नियम हा कायदा सांगतो. फॅशनच्या नावाखाली हे आरसे काढून टाकले जातात आणि वाहन चालक स्वत:हून आपघातास आमंत्रण देतं आहेत. मनुष्यास दोन डोळे आणि दोन कान, पाहणे आणि ऐकणे यासाठी दिले आहेत, मला वाटतं काळजी हे कारण असाव त्यामागे कारण ऐकू न आल्यास किमान डोळ्यास जे दिसतं आहे त्याचा उपयोग व्हावा आणि अडचणी दूर व्हाव्यात असे त्या परमेश्वरास वाटलं असावं पण दुचाकी वाहन चालक मागील वाहनांचा कानोसा घेतात   आणि त्याप्रमाणे अचानक वळण घेण्याचे अनेक प्रकार तुम्हीही पाहिले, अनुभवले असतील. तज्ञ मंडळी म्हणतात नियमांची पायमल्ली होणं   अथवा जाणीवपूर्वक करणं यात मानवी वर्तनाचे स्वरूप तपासण्याची गरज वाटते, रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम शालेय स्तरापासून राबविली पाहिजे. दुचाकी वाहनास असणारे आरसे हे वाहन चालकाची रस्त्याची दृश्यमानता आणि वाहनचालकांचा निर्णयात सुधारणा करण्यास मदतगार ठरतात. आरशांचा योग्य कोन राखणं देखील आवश्यक असतं. लेनची शिस्त पाळण्यात

शतकातील महानायक – अमिताभ बच्चन

इमेज
  शतकातील महानायक – अमिताभ बच्चन शतकातील महानायक , शहेनशहा , अँग्री यंग मॅन अशी अनेक बिरूद श्री अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड ने दिली. त्यांची लोकप्रियता एवढी आहे कि ते प्रत्येक भारतीयाच्या मनावर आजही (वय वर्ष ८१ ) राज्य करतात. एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून त्यांच जीवन हे एक प्रेरणास्त्रोतच वाटत मला. २०१५ साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देण्यात आला. बॉलीवूड मधील त्यांच योगदान अमुल्य आहे. ७० च्या दशकात जेंव्हा राजेश खन्ना हे नाव प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करीत होत , बॉलीवूड चा सुपरस्टार बिरूद ज्याने कमी काळात मिळवलं अशा काकाजींचा तो काळ , त्याकाळात अमितजी यांची एन्ट्री आणि ती सुद्धा अँग्री यंग मॅन !! आनंद (आनंद मरा नही आनंद मरते नही) आणि नमकहराम (किसने सोनू पे हात उठाया , कौन है जो अपनी माँ का दुध आजमाना चाहता है ?) या दोन चित्रपटात हि जोडी दिसली. यामध्ये अमित जी नी आनंद मध्ये अभिनयाची झलक दाखविली आणि नमकहराम मध्ये तर पूर्ण चित्रपटात फक्त अमितजी आणि अमितजी ! असं ऐकिवात आहे कि हृषीकेश मुखर्जी

इकिगाई- १०० वर्ष जगण्याचा मंत्र !!

इमेज
  Ikigai- इकिगाई –हा शुद्ध मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न आहे , या शब्दाचे उच्चारण “अ-की-गे-आय” या प्रकारे चार भागात करता येते. डॅन ब्युएटनर या लेखकाने मनुष्याचे जगातील सर्वात जास्त आयुष्मान असणाऱ्या देशाचं भ्रमण केले आणि तेथील मंडळी एवढी वर्ष कशी जगू शकतात? त्याचा त्यांच्याकडे काही फॉर्म्युला आहे काय? या विषयी त्यास कुतूहल निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास केला. त्याने त्याच्या पुस्तकात याचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. पुस्तकाचे नाव आहे “ब्ल्यू झोन्स किचन्स”, १०० रेसिपीज १०० वर्ष जगण्यासाठी !!! मागील वर्षी जपान मध्ये एकूण लोकसंख्ये पैकी आयुष्याची शंभरी पार केलेले ७९,००० माणसं आहेत.  जपान फक्त यासाठी प्रसिद्ध आहे असे नाही तर “करोशी” या संज्ञे  साठी देखील ओळखला जातो. या संज्ञेचे उगम स्थान १९७० मध्ये दडलं आहे, त्यावेळी जपान मध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याचे मुख्य कारण जास्त काम आणि प्रचंड ताण-तणाव असे संशोधनात आढळले होते.  आयुष्य खूप सुंदर आहे ते जगताना ही रेसिपी अंमलात आणल्यास यशस्वी जीवन जगता येऊ शकतं. अर्थात हीच रेसिपी व्यवसाय आणि मनुष्याची ध्येयपूर्ती यांच्यासोबत जोडल्यास योग्य मार्गक्

तुझ्या दर्शने उजळो जीवन

इमेज
  श्री गणेश , आराध्य दैवत , बुद्धीची देवता , या वर्षीचा गणेशोत्सव आज सुरु होतो आहे. या १० दिवसात एक वेगळीच उर्जा आणि वेगळाच उत्साह पहायला मिळतो. गणेश प्रेमी कार्यकर्त्यांच्या तर उत्साहाला भरती आलेली पहायला मिळते. मग कुण्या गावाचा राजा , गल्लीचा राजा अशी अनेक बिरुदं सांभाळत श्री गणेश पृथ्वीतलावर येतात. परमतत्व ओंकार चे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो , तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपणं दरवर्षी “आतुरता आगमनाची” म्हणत असू बहुतेक..... मी ही दरवर्षी गणरायाच्या आगमनाची वाट पहात असतो याही वर्षी त्याच्या आगमनाची वाट पहात आहे. गणेश पूजन आणि चतुर्थीचे व्रत याचे उल्लेख महाभारतात देखील आढळतात असे जाणकार सांगतात. श्रीकृष्णाने देखील गणेश व्रत केल्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो. अशा या गणरायाची मूर्ती  मूर्तिकार  घडवितो आणि शास्त्राप्रमाणे त्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली कि त्यात देव-तत्व येतं अशी आपली श्रद्धा आहे. यात कुणाचं दु-मत असण्याचं कारण नाही. काही दिवसांपूर्वी मी मूर्

ओव्हर द टॉप (OTT)- जरा सांभाळून

इमेज
  साधारण ऑगस्ट १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला आणि तेथून मोबाईल क्रांती म्हणू आपण फारतर, ती सुरू झाली. मोबाईल पूर्वी पेजर सारखी सुविधा काही शहरात सुरू होती पण मोबाईल वापर करणारी मंडळी व्यावसायिक होती, ज्यात इनकमिंग कॉलला देखील चार्जेस होते. त्यानंतर जवळपास सतरा वर्षा नंतर २०१२ मध्ये कोलकाता येथे 4 G तंत्रज्ञानाचा श्रीगणेशा झाला. २६ वर्षांचा कालावधी झाला आहे आणि या कालावधीत “भारत” स्मार्ट फोन मार्केट साठी जगात दुसऱ्या स्थानी आहे. खूप गोष्टी बदलल्या, खूप गोष्टी सोप्या झाल्या, फक्त कॉल करण्यासाठी फोन अशी त्याची व्याख्या न राहता इंटरनेटच्या सहाय्याने करमणूक, बँकिंग, गप्पा-टप्पा,  ई-कॉमर्स, गेमिंग, ई-लर्निंग या कारणांसाठी वापरला जाऊ लागला. यात सगळ्यात जास्त “करमणूक” या प्रकारात स्मार्ट फोनचा वापर होत आहे आणि तो होत राहील.           ओव्हर द टॉप ( OTT ) प्लॅटफॉर्म ने इंटरनेट सहाय्याने स्मार्ट फोन वर टेलिव्हिजन आणि चित्रपट सेवा देण्याचे सुरू केले आणि त्यास प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली, मिळत आहे आणि रा