पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

इमेज
  नमस्कार सोलापूरकर, मी एम.आय.डी.सी. चिंचोळी येथील एक धूळ खात पडलेली इमारत ज्याचे माहिती तंत्रज्ञान संकुल म्हणून १० फेब्रुवारी २००१ रोजी तत्कालीन उद्योग मंत्री डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन केले होते. या कार्यक्रमास तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे साहेब, आर आर पाटील साहेब, आमदार उत्तमप्रकाश खंदारे साहेब हि दिग्गज मंडळी उपस्थित होती. सोहळा खूप दिमाखदार झाला, हे दाखविणारा फलक तुमच्या स्वागताला पहायला आणि वाचायला तुम्हाला मिळेल. आजकाल तुम्ही काय म्हणता ते, ट्रेन्डीग वगैरे तसचं काहीतरी तेंव्हा मीडिया ने यास खूप चांगली प्रसिद्धी दिली होती, महाविद्यालयातील युवक मोठ्या आशाने या सर्वांकडे पाहत होता, शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी तर स्वप्नं रंगू लागले होते, कि आता सोलापूर सोडायची गरज नाही, माहिती तंत्रज्ञान संकुल (आय टी पार्क) सोलापुरात झाल आहे म्हणजे “अपनी तो निकल पडी”, कारण जॉब साठी होम टाऊन सोडायची गरज आता राहणार नव्हती, सगळं इथेच सोलापुरी होईल असे वाटतं होते. २०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या रिपोर्ट नुसार पुण्यात खाजगी आय टी पार्क संख्या हि १७२ एवढी आहे, मुंबई १६१ , ठाणे १

नॉस्टलजीआ

इमेज
  आज काही कारणांनी कॉम्प्युटर मध्ये स्टोअर करून ठेवलेल्या जुन्या फाईल्स (जुनी कागदपत्र) उघडून पाहत होतो आणि पाहता पाहता तुम्ही काय म्हणता ते नॉस्टलजीआ का, काय तो प्रकार झाला. जवळपास १६ वर्षाचा फ्लॅशबॅक, साल २००५, त्यावेळी केलेल्या पत्र व्यवहारावरील तारखां मुळे अगदी सर्व बाबी डोळ्या समोर तरळू लागल्या आणि वाटलं किती आणि काय काय गोष्टी केल्या आपण यश मिळावं म्हणून , एका अर्थाने स्वत:ला सिद्ध करायला म्हणू फारतर आपण ! आपल्या उमेदीच्या काळात केलेली धडपड (अर्थात ती अजूनहि चालूच आहे) म्हणजे हेच काहीतरी असावं !! मला आठवतं २००० साली कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु केल्यानंतर त्यास संस्थेच स्वरूप देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आणि मग प्रयत्न सुरु झाले एखाद्या शासकीय संस्थेची मान्यता घेण्याचे. जसे कि विद्यापीठ मान्यता, शासनाच्या तंत्र-शिक्षण बोर्डाची मान्यता अनेक पर्याय !! हे करीत असताना सगळा पत्र व्यवहार हा कधी मराठीत तर कधी इंग्रजी मध्ये आणि तोही शिस्तबद्ध भाषेत ! आज वाचल्यावर मलाच थोड आश्चर्य वाटलं कि हे आपण केलं आहे ? कसं जमलं असेल आपल्याला !!! भूतकाळात डोकावताना आणि त्यात स्वत:च्या भूत

मेरा रंग दे बसंती चोला

इमेज
मेरा रंग दे बसंती चोला, हे गीत कायम प्रेरणास्त्रोत आहे, कधीही गावे/ऐकावे आपल्या समोर भगतसिंग आलेच पाहिजेत, हे गीत आपणही अनेकदा ऐकले असावे. प्रत्येक गीतकाराने मातृभूमी प्रती त्याच्या भावना प्रकट करीत असताना नकळत आपल्या भावनांना देखील स्पर्श केला आहे. मातृभूमी प्रती समर्पण भाव या गीतातून व्यक्त होतो असे मला वाटते. मातृभूमी प्रती समर्पित भाव जागवण्याचे प्रेरणादायी गीत !! हे गीत हिंदी चित्रपट सृष्टीत अनेकदा लिहिले गेले आणि त्यास संगीत दिले गेले. मग ते प्रेम धवन (शहीद- मनोजकुमार अभिनित शहीद) असतील, समीर (द लीजंड ऑफ भगतसिंग- अजय देवगण अभिनित) असेल अथवा देव कोहली (२३ मार्च १९३१ शहीद - बॉबी देवोल अभिनित) असतील, या सर्वांनी मेरा रंग दे बसंती चोला या गीतास त्यांच्यापरीने न्याय देण्याचे काम केले आहे. प्रत्येक संगीतकाराने देखील तेवढीच त्याची काळजी घेतली आहे. आणि प्रत्येक वेळी उत्कट असे गीत आपल्यापर्यंत पोहोचले. पण मेरा रंग दे बसंती हे गीत सर्व प्रथम लिहिले राम प्रसाद बिस्मिल यांनी, आता हे, राम प्रसाद बिस्मिल कोण? तर लखनऊ च्या तुरुंगात काकोडी कारस्थानात अटक केलेले स्वातंत्र्यसैनिक होते. वसंत पंचम

लेख शतपुर्ती

इमेज
  लेखनाची आवड तशी कॉलेज मध्ये असल्यापासूनच होती पण लिहितं व्हावं अशी मनानं उचल खावून त्याचं प्रत्यक्ष कृतीत रुपांतर होवून विविध विषयांवर लेखन करीत आज तुम्हा वाचकांसमोर शंभरावा लेख सादर करताना प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. तसा मी काही लेखक, साहित्यिक नाही पण जे ज्यावेळी जस सुचलं तस कागदावर उतरवलं एवढचं !! या लिखाणामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान विषयातील विविध नव्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सोबतच आयुष्यात येणारे कडू-गोड अनुभव देखील कागदावर उतरवले...... यातील काही लेखांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, हो ,हो माझ्यासाठी  “अभूतपूर्वच” कारण लेख पोस्ट केला आणि तो सोशल मीडिया माध्यमातून पाठविला कि वाचक ऑनलाइन यायचे आणि तंत्रज्ञानाच्या कमालीमुळे मला याची देही याची डोळा पहायला मिळायचं, काही वाचक मंडळीच्या कमेंट्सने वेगळीच ऊर्जा मिळायची, कारण कमेंट्स म्हणजे काय तर “ऑनलाइन संवादच” कि !! नाही का ? आभासी संवाद म्हणू फार तर आपण यांस....         मला आठवतं पहिली पोस्ट ब्लॉग (https://amitkamatkar.blogspot.com) वर टाकली आणि सोशल मेडिया मध्ये आवाहन केल “ब्लॉग पहावा”, अर्थात

अपॉइंटमेंट कॅलेंडर कसे तयार करावे ?

इमेज
            संजीव आणि राजीव  नुकतेच एका कंपनीत नोकरीस लागले आहेत , संजीव चे काम पर्सनल असिस्टंट चे आहे तर राजीव चे काम कॉम्प्युटर ऑपरेटर चे आहे . संजीव ला त्याच्या साहेबांनी अपॉइंटमेंट च्या नोंदी ठेवणे व त्यानुसार त्यांना आठवण करून देणे आदी कामे करायची आहेत. संजीव ने त्यानुसार कॅलेंडर चे एक पान कात्रण करून स्वत:च्या डेस्क वर चिकटवले आणी त्यामध्ये नोंदी करायला सुरुवात केली. राजीव हे सर्व पहात होता त्याने संजीव ला विचारले, “संजीव, हे काय करतो आहेस?, अरे कॉम्प्युटर च्या युगात कॅलेंडर चे कात्रण वापरणार आहेस कि काय ?”, “मित्रा स्मार्ट बन, कॉम्युटर चा वापर करायला शिक !!”, संजीव म्हणाला राजीव मी कॉम्प्युटर चा वापर इतर कामांसाठी करतो आहे, पण कॅलेंडर म्हणून कसा वापर करू ?” यावर राजीव ने आउटलुक बद्दल संजीव ला सांगितले, आउटलुक हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस या अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर मधील एक प्रोग्राम !! जो वैयक्तिक माहिती व्यवस्थापनाचे काम करतो. आउटलुक चा वापर करून ई-मेल पाठविणे, स्विकारणे, विविध दैनदिनी चे व्यवस्थापन नोंदी करणे, नवीन कॉन्क्टॅक्ट तयार करणे त्याची माहिती स्टोअर करणे, कॅलेंडर इ.कामे करता येत

नर्वस नायंटीज

इमेज
  मागील काही दिवस मी नर्वस नायंटीज चा शिकार झालो आहे की काय असं वाटतं मला. नर्वस नायंटीज म्हणजे काय तर वैचारिक ब्लॉक, कृतीशीलता खुंटणे !! अगदी अर्धांग वायु झाल्यावर जी स्थिति तशीच काहीशी मनाची स्थिति म्हणूया फार तर.. नर्वस नायंटीज हा तर क्रिकेटचा भाग आहे, तुम्ही म्हणाल मी कुठे क्रिकेट खेळतो? मग त्याचा माझ्याशी कसा संबंध ? त्याचं असं आहे मित्रांनो आपण सर्वजण तर जाणता की माझा ब्लॉग ( https://amitkamatkar.blogspot.com ) आहे, ज्यावर मी माझे लेखन प्रकाशित करतो. विविध लेख जे प्रकाशित होतात त्यांची संख्या मागील अनेक दिवस झाले ९०च्या पाशात अडकली आहे. म्हणून मला नर्वस नायंटीजचा फील येतो आहे. लेख लिहायचा आणि पोस्ट करायचा म्हणजे डोक्यात विचार यायला हवे आणि आकारात आणायचे असल्यास ते लिहावे लागतील पण होत नाहीए, अर्थातच माझ्यासाठी नर्वस नायंटीज !!!! आज हा लेख पूर्ण झाला (म्हणजे एक धाव घेता आली) आणि प्रकाशित करण्यात मी यशस्वी झालो तर एकूण ९८ लेख ब्लॉगवर प्रकाशित होतील, फक्त २ लेख कमी शंभरी गाठायला !! आता पर्यंतच्या लेखांचा प्रवास खूप उत्कट, ज्ञान वर्धन करणारा (वाचक आणि लेखक दोघांचा बरं का!) आणि हो अ

अतुलनीय “आनंद”

इमेज
  फिल्मफेअर मध्ये बेस्ट डायलॉग, बेस्ट स्टोरी, बेस्ट अॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट एडिटिंग हे पुरस्कार आणि सोबतच एक राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा चित्रपट म्हणजे “आनंद”, हो, हृषीकेश मुखर्जी यांचा आनंद, १९७१ साली प्रदर्शित हा चित्रपट तसे पाहिलं तर जीवनाची मूल्यं अगदी हसत, हसत सांगून जातो. “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही”, चित्रपटातील संवाद अप्रतिमच, एका पेक्षा एक सरस, जणू काही संवाद लिहिणाऱ्या “गुलजार” यांची स्पर्धा स्वत:शीच होती, “मुझसे एक कविता का वादा   है, मिलेगी मुझको”, एन.सी. सिप्पी आणि हृषिदा या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शन हृषिदा यांच, संगीत सलील चौधरी, हि सगळी भट्टीच माइंड ब्लोइंग ! जबरदस्त !! मग स्टारकास्ट हि तेवढीच दमदार, आनंद सहगल – जयचंद (राजेश खन्ना ), डॉक्टर भास्कर बॅनर्जी- बाबू मोशाय (अमिताभ बच्चन), रेणू (सुमिता सन्याल), डॉ. प्रकाश व सौ. सुमन   कुलकर्णी (रमेश व सीमा देव), इसाभाई (जॉनी वॉकर), सिस्टर डी सा (ललिता पवार) आणि इतर हि मंडळींनी या चित्रपटात योगदान दिलं. या चित्रपटास ५० वर्ष झाली म्हणून वाचण्यात आलं आणि वाटलं आपणही काही लिहायला जमतं का ते पह

पहिली कमाई – लाईफ टाईम मेमरी !

इमेज
  आयुष्यात काही गोष्टीना खूप महत्व असतं, जस कि शाळेचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिला मित्र/मैत्रीण, पहिलं प्रेम आणि नोकरी करीत असाल तर पहिला पगार, आणि व्यवसाय असल्यास पहिली कमाई ! सगळं कसं पहिलं वहिलं ज्यास अनन्य साधारण असं महत्व, सर्वसामान्य श्रेणीत हा विषय समान असावा अस मला वाटतं, कदाचित तुम्हीही सहमत असालं.. मी मागील एकोणवीस वर्षापासून व्यवसायात आहे पण मला आठवतं बरोबर एकवीस वर्षापूर्वी झालेला माझा पहिला पगार ! त्यावेळी मी कॉलेज शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत “इंजिनीअर” म्हणून नोकरीस लागलो होतो, एक महिना/ तीस दिवस काम करायचं आणि पगारा दिवशी म्हणायचं “आजी सोनियाचा दिनू” असचं काहीतरी असतं चाकरमान्यांच ! माझ्याही आयुष्यात तो दिवस आला, खरचं खूप आंनद होतो , तो “धनादेश” अथवा रोख स्वरूपात (आज अवघड आहे !) मिळालेली रक्कम हातात घेवून....अगदी “आज मै उपर, आसमां नीचे” वगैरे म्हणाल्यासारखं !!           त्या दिवशी माझा पगार झाल्यानंतर घरी येताना अनेक विचार मनात आले, कसा खर्च करावा पगार ! आयुष्यात स्वत: कमविलेले पैसे ! आहा ! स्वत:चा एवढा अभिमान वाटतं होता, काय आणि किती सांगू तुम्हाला !! असचं होत असे