पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

स्टार्टअपची कल्पना

इमेज
  स्टार्टअप हा शब्द आपल्या चांगला परिचयाचा झाला आहे. त्यास वेगळ्या ओळखीची गरज नाही असं वाटतं मला पण ज्या शिक्षण पद्धतीत आपण वाढलो, शिकलो ती शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम जॉबची संधी देऊ करते, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे आपण जाणलं, समजलं पाहिजे. मग जर स्वत:चा स्टार्टअप करायचा असेल तर तुमच्याकडील कल्पनांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. कल्पना ही अद्वितीय हवी, ती नवीनच असावी असे नाही एखाद्या प्रचलित गोष्टीमध्ये बदल करून नवीन सुरुवात देखील स्वागतार्ह आहे. मी माझ्या व्याख्यानात सांगतो तेच पुन्हा सांगेन “कल्पनांचा नवोन्मेष” फार महत्वाचा. आपल्या युवक वर्गाकडे असे कौशल्य आहे त्यास गरज आहे आत्मविश्वास देण्याची आणि “हो पुढे मी तुझ्या सोबत आहे” असा विश्वास देण्याची.           जमशेठजी टाटा यांना कोणती कल्पना सुचली की त्यांनी भव्य मोटर्स कंपनी बनविण्याचे ठरविले? धीरूभाई अंबानी यांना कोणती कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी सुरू केली जी आज सर्वात मोठी कंपनी आणि भारताची शान म्हणून आपण पाहतो. या दोघांमध्ये आणि इतर यशस्वी उद्योजकां मध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्यांनी त्यांच्य

“स्टार्ट अप” इंडिया

इमेज
  स्टार्टअप लेखमाला सुरू झाली आणि त्याचे चार भाग प्रकाशित देखील झाले. स्वत :चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे. तुमच्याकडील कल्पनांची पारायणं तज्ञ व्यक्तीं सोबत करावी लागतील, त्यास प्रमाणित करून घ्यावे लागेल , तुमची कल्पना समाजातील कोणत्या प्रकारची अडचण सोडवू शकते आहे का , हे तप