पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

डिजिटल इंडिया – डिजिटल लॉकर

सध्या संपूर्ण भारत भर चर्चेत असलेला विषय म्हणजे डिजिटल इंडिया , कॅश लेस इंडिया !! कॅश लेस इंडिया होणे हेतू भारत सरकार विविध पावले उचलत आहे. त्या अनुषंगाने लोकांमध्ये जागृती होणे देखील आवश्यक आहे. त्या आधारे कॅशलेस कडे पावले उचलली जातील देखील !! डिजिटल इंडिया या योजनेत सरकार व नागरिक दोघेही ऑनलाइन होणार आहेत. डिजिटल इंडिया हि संकल्पना सर्व भारतीयांच्या सहभागाशिवाय पूर्ण होवू शकत नाही याची सुरुवात आधार कार्डापासून झालेली आहेच. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही डिजिटल इंडिया या संकल्पनेतील एक पल्ला पार केला असे मी मानतो. तुम्ही तुमच्या कडील सर्व महत्वाची कागद पत्रे डिजिटल लॉकर (बँकामध्ये ज्याप्रमाणे लॉकर्स असतात त्याप्रमाणेच) मध्ये ठेवू शकता. शासकीय/ निमशासकीय यंत्रणेत तुम्हास रोजगारासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हास लागणारी सर्व कागदपत्र (शैक्षणिक,मालमत्ता कागदपत्र) ह्या डिजिटल लॉकर मध्ये ठेवून तुमच्या अर्जा सोबत ऑनलाइन जोडता येतील व त्यावर तुम्ही ई-साईन करू शकाल. अर्जा सोबत जोडायच्या प्रति देखील साक्षांकित,सत्यप्रत(true copies) करण्याची गरज आता राहणार नाही. त्यामुळे डिजिटल लॉकर