तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी
तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून पण आता आय.टी. च्या जमान्यात तुम्हास वाचता येते का आणि स्पष्ट उच्चार आहेत का ? हे दोन प्रश्न महत्वाचे असणार आहेत. तसे पहिले तर संगणक
युजरला टाईप करण्याचे कौशल्य आत्मसात असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तो संगणकाचा
वापरच करू शकत नाही मग हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी युजर टाईपिंग वर प्रभुत्व मिळवितो.
एखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याची लेखणी त्यास मदत करते. मला वाटतं लेखकास
महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याचे विचार आणि ते कागदावर उतरविण्यासाठी
आवश्यक असणारी त्याची लेखणी.. मग हि लेखणी नव्या जमान्यातील का असेना, कारण नव्या
जमान्यात लेखणी ने देखील बरेच बदल स्वीकारले आहेत अस म्हणालो तर वावगं होणार नाही.
हे बदल भौतिक असतील, त्याच्या स्वरूपात झालेले असतील वा तंत्रज्ञाना मुळे झालेले
असतील. आता पहा ना, सुरुवातीला टाईप रायटर होते, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टाईप रायटर
आले मग संगणक कि-बोर्ड आला आणि जसा स्मार्ट फोन चा वापर वाढला तसा आपण सर्वजण
स्मार्ट फोन चा कि-बोर्ड वापरू लागलो, आता हा कि-बोर्ड म्हणजे “लेखणीच” म्हणावी
लागेल, नव्या जमान्यात !!
या नव्या लेखणीचा वापर जगात सगळीकडे
होतो आहेच पण ज्या मंडळीना लिखाणाची आवड आहे, अशा मंडळीना आता नवी लेखणी (मी त्यास
आभासी सहाय्यक म्हणेन) मिळणार आहे, ज्यांच्याकडे विचार आहेत, कल्पकता आहे, व्यक्त
होण्याचं कसबं देखील आहे, आता बदल होईल तो फक्त त्यांच्या लेखणीत ! तुम्ही म्हणाल, काय सस्पेन्स निर्माण
करत आहात सांगा लवकर, मी म्हणेन तेच सांगण्यासाठी तर आजचा लेखन प्रपंच हाती घेतला
आहे. व्यक्त होत असताना प्रथम कागदावर विचार प्रकट करायचे (कागदास काळ करायचं) मग
ते छापण्यायोग्य करण्यासाठी नवीन माध्यमांचा वापर करायचा असे काहीसे सोपस्कार
त्यावर व्हायचे, होतात देखील पण आता काही मंडळी संगणका मध्ये उपलब्ध “युनिकोड”
च्या सहाय्याने “फोनेटिक” टाईपिंग ची सुविधा वापरत आहेत. कॉम्प्युटिंग च्या
जागतिकीकरणामुळे एका नवीन कॅरॅक्टर एनकोडिंग ला जन्म दिला ज्यास युनिकोड असे
म्हणतात. युनिकोड स्टँडर्ड हे सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कॅरॅक्टर
एनकोडिंग स्टँडर्ड आहे आणि व्हर्च्युअली प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टम द्वारे ओळखले
जाते. (हीच याची खासियत म्हणावी लागेल) युनिकोड ला आपण आंतरराष्ट्रीय भाषा म्हणू
शकू. कारण यूनिकोडमुळे आज आपण फक्त मराठीच नाही तर इतर प्रांतीय, आंतरराष्ट्रीय
भाषा मध्ये टायपिंग करू शकत आहोत. फोनेटिक
(स्वर-उच्चारण) मध्ये जसे बोलू तसे टायपिंग होते त्यामुळे लेखन खूप सोपं झाले आहे
असे माझे मत आहे.
सी-डॅक ने तयार केलेला मराठी विश्वकोष
असेल अथवा गुगल ने तयार केलेला “गुगल इनपुट टूल” असेल, गुगल ने पुढाकार घेत
तुम्हाला “सजेशन” पॉप-अप पण दिला आहे (गुगल इनपुट टूल मध्ये), जेणे करून टाईपिंग सोप
व्हावं, लवकर व्हावं हा त्यामागील उद्देश. आज मितीला इतर हि अॅप आहेत जे तुम्हाला युनिकोड
ची सेवा वापरण्यास मदत करतात. इंटरनेट वर तर मी यास क्रांती म्हणेन कारण आपली माय मराठी
अगदी सहज झळकू लागली, (युनिकोड अगोदर हि मराठी टाईपिंग शक्य होते पण त्यास खास
प्रोग्राम्स वापरावे लागायचे) युनिकोड साठी मात्र कोणतेही इतर सॉफ्टवेअर वापरायची
गरज नाही. बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट ला सुद्धा दखल घ्यावी लागली आणि विंडोज ०७
च्या आवृत्ती मध्ये हे बदल देखील करण्यात आले. मराठी इनपुट टूल यात देण्यात आलं. त्यामुळे
झाल असं कि तुम्ही युनिकोड मध्ये लिहिलेला
मजकूर अगदी सहज दुसऱ्या संगणकावर दिसू लागला. एवढचं काय तुमच्या स्मार्ट फोन वर
देखील मराठी मजकूर दिसू लागला. ९० च्या दशकात असा विचार हि केला नव्हता, कि मराठी
टाईप करणं एवढ सोप होईल !! आणि आता तर व्हॉईस टायपिंग !!
माझ्या माहिती प्रमाणे मायक्रोसॉफ्ट
ऑफिस एक्स पी. या आवृत्ती मध्ये प्रथम व्हॉईस टायपिंग आलं, यात एम.एस.वर्ड मध्ये
टाईपिंग करताना “स्पीच टू टेक्स्ट” असा पर्याय देण्यात आला होता तो वापरायचा अर्थात
फक्त इंग्रजी टाईपिंग साठी पण, तो वापरता काही आला नाही, कारण जे दोन सहकारी (आभासी-व्हर्चुअल)
दिले होते त्यांना यु.एस.इंग्लिश (उच्चारण) च कळायचे, भारतीय इंग्रजी त्यांना कळत
नव्हतं त्यामुळे शब्दांचा गोंधळ व्हायचा आपण सांगायचं एक आणि व्हायचं भलतचं टाईप !
त्यामुळे त्यास लोकप्रियता मिळाली नाही. नंतरच्या काळात या विषयावर बरेच संशोधन
झाले आणि आज आपल्याला भारतीय इंग्रजी प्रमाणे तर टाईपिंग तर करता येतेच शिवाय
मराठी मधून देखील व्हॉईस टायपिंग करता येवू शकते. आणि हीच ती नवी लेखणी...एक आभासी
सहाय्यक !! या माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात “तुमचा आवाज तुमची लेखणी” बनला आहे. तुम्हाला काळजी घ्यायची फक्त तुमच्या
उच्चारांची, जेवढे स्पष्ट उच्चार तेवढे उत्तम टाईपिंग !!
सूचना (ऐच्छिक):- तुम्ही प्रात्याक्षिक केले असेल तर उत्तमच पण जर नसेल केले
तर एक प्रयत्न करायला काही हरकत नाही, चला तर मग, एक प्रयत्न करुया, तुमच्या इंटरनेट
रेडी लॅपटॉप / डेस्कटॉप वर मराठी व्हॉईस टायपिंग करूया, तुमच्या कडे योग्य दर्जाचा
हेडफोन विथ माईक असावा आणि गुगल क्रोम ब्राऊजर असावा. गुगल डॉक्स à जी-मेल लॉग इन करा आणि टूल्स मेनू à व्हॉईस टायपिंग निवडा, भाषा निवडा जसे कि इंग्लिश, मराठी, हिंदी आणि “क्लिक
टू स्पीक” ला क्लिक करा, तुम्ही जसे बोलाल तसे टाईप होताना तुम्हाला दिसेल. आणि हो
तुमच्या स्मार्ट फोन वर देखील whatsapp मध्ये टाईपिंग करताना गुगल चा “गुगल व्हॉईस
टायपिंग” हा पर्याय वापरता येवू शकतो.
हॅप्पी व्हॉईस
टायपिंग !!
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
तळटीप: वर दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही प्रयत्न केला असेल तर मला कमेंट मध्ये सांगण्यास विसरू नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा