माईल्स टू गो बिफोर आय स्लीप
The woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या “स्टॉपिंग बाय वूड्स” या कवितेतील या ओळी प्रेरणा देतात असं वाटतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यास प्रवासात सहज सुचलेलं हे काव्य खूप साध आहे पण शेवटच्या चार ओळीं मध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. जो खरोखरी प्रेरणादायी आहे. दोन दिवसापूर्वी कामानिमित्त बाहेर पडलो होतो त्यावेळी एफ.एम. वर (कार मध्ये) प्रसिद्ध शो सुरु होता त्यामध्ये निवेदकाने या कवितेचा उल्लेख केला आणि काही काळा साठी मी भूतकाळात गेलो. या ओळी सर्वप्रथम मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नावाने तयार केलेल्या कॅलेंडर वर पाहिल्या, वाचल्या होत्या, आणि त्याच दिवशी या ओळीनी हृदयात घर केलं होत. आयुष्यात प्रेरणा घेण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही, लागते ती फक्त इच्छाशक्ती, ती असली कि झालं, आणि आपण हि त्यादिशेने वाटचाल सुरु करतो. कवी रॉबर्ट प्रवासा दरम्यान जंगलातून जाताना त्याने हि कविता लिहिली असावी कारण त्यात तो म्हणतो आहे वूड्स आर लव्हली डार्क अँड डीप, जंगल आणि निसर्ग