ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

माईल्स टू गो बिफोर आय स्लीप



   The woods are lovely, dark and deep,   
   But I have promises to keep,   
   And miles to go before I sleep

अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या “स्टॉपिंग बाय वूड्स” या कवितेतील या ओळी प्रेरणा देतात असं वाटतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट  यास प्रवासात सहज सुचलेलं हे काव्य खूप साध आहे पण शेवटच्या चार ओळीं मध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. जो खरोखरी प्रेरणादायी आहे. दोन दिवसापूर्वी कामानिमित्त बाहेर पडलो होतो त्यावेळी एफ.एम. वर (कार मध्ये) प्रसिद्ध शो सुरु होता त्यामध्ये निवेदकाने या कवितेचा उल्लेख केला आणि काही काळा साठी मी भूतकाळात गेलो. या ओळी सर्वप्रथम मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नावाने तयार केलेल्या कॅलेंडर वर पाहिल्या, वाचल्या होत्या, आणि त्याच दिवशी या ओळीनी हृदयात घर केलं होत. आयुष्यात प्रेरणा घेण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही, लागते ती फक्त इच्छाशक्ती, ती असली कि झालं, आणि आपण हि त्यादिशेने वाटचाल सुरु करतो.
               कवी रॉबर्ट प्रवासा दरम्यान जंगलातून जाताना त्याने हि कविता लिहिली असावी कारण त्यात तो म्हणतो आहे वूड्स आर लव्हली डार्क अँड डीप, जंगल आणि निसर्ग अफाट आहे आणि तितकीच अंतहीन, मनुष्य त्याच्यावर स्वत:ची इच्छा लादू शकत नाही, त्यास फक्त प्रवास करता येवू शकतो आणि हा, जीवन प्रवास करताना त्यास त्याच्या जबाबदारीचं भान असणं खूप महत्वाचं आहे. कवीस हेच भान दाखवून द्यायचे आहे असे वाटते. जीवनात अनेक जबाबदाऱ्या  पेलत असताना मनुष्याने याची जाणीव ठेवली पाहिजे असचं कविला सुचवायचे असावे. म्हणूनच तो म्हणतो “आय हॅव प्रोमिसेस टू कीप, अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप”, आजपर्यंत जे प्रयत्न पूर्वक साध्य केले आहे त्याचा आनंद तर आहेच पण मृत्यूस आलिंगन देण्याच्या अगोदर अजून खूप काही साध्य करायचे आहे, ज्याचे वचन मी माझ्या आप्त-स्वकीयांना दिले आहे, स्वत:ला दिले आहे, मग हे साध्य करण्यासाठी तसे जाणीवपूर्वक प्रयत्न मी केले पाहिजे. हे प्रयत्न करीत असताना अनेक अडचणी येवू शकतात पण न डगमगता आपण चालत राहिलं पाहिजे, कवितेत कवी रॉबर्ट म्हणतो जीवनात एखादी संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी नसेल, जिथे सगळं संपल असं वाटेल तरी हि हार पत्करणे माझ्या स्वभावात नाही अशीच स्वत:ची समजूत काढून पुढे गेले पाहिजे.


          अर्थात हा मला गवसलेला “स्टॉपिंग बाय वूड्स”  या कवितेचा अर्थ आज तुमच्या सोबत शेअर केला आहे, तुम्हाला हा अर्थ कसा वाटला मला जरूर कळवा, तुमच्या कमेंट्स मधून !!


अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

#प्रेरणादायक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?