पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

तंत्रज्ञानाची कमाल – टेक २

इमेज
  तंत्रज्ञान जसं विकसित होतं आहे त्याप्रमाणे मानवजातीस याचा फायदाच होईल, अर्थात त्यासाठीच ते वापरलं गेलं पाहिजे. याच दरम्यान विविध संज्ञा पुढे येताना आपण पाहतो आहोत, जसं कि क्लाऊड कॉम्प्युटिंग, आय.ओ.टी.(इंटरनेट ऑफ थिंग्ज), आय.आय.ओ.टी. (इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज), ए.आय. (आर्टीफीशिएल इंटेलीजंस), या सर्व विषयांवर मी यापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते ब्लॉग व माझ्या फेसबुक वॉल वर प्रकाशित देखील केलं आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा कोणतेही क्षेत्र ! विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा मुळी हा डेटाच असणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. हा डेटा युजर विविध कारणांनी शेयर करतो, आणि याचा वापर सॉफ्टवेअर विकासक विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करतात.            लॉ...