पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

कर्मचारी आणि संबंध

इमेज
    कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं , हे ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी , त्या सिस्टमनी   तुमची कंपनी चालली पाहिजे , हे ध्यानात घ्यायला हवे , बऱ्याच वेळा काय होतं , कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते , असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.   कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट , भावनिक , व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात , यातील प्रत्येक पैलूस महत्व द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित करते की सर्व कर्मचार्‍यांना न...