ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

यश म्हणजे साध्य, सिद्धी अन् प्रगती- भाग -२

 



मागील भागात यश म्हणजे काय? या विषयी मार्गदर्शन केले त्याचाच भाग म्हणून पुढे मार्गदर्शन करीत असताना हे यश कसे साध्य करावं यां विषयी अधिक माहिती यां लेखात देत आहे. तसे पाहिले तर यशाची व्याख्या व्यक्ति परत्वे बदलते पण तरी देखील विविध तज्ञ मंडळींनी केलेली यशाची व्याख्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते. यश म्हणजे मन:शांती अशीही व्याख्या करता येऊ शकते, जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही केलेले सर्वोत्तम प्रयत्न म्हणजे यश !! अमेरिकन तत्वज्ञानी इमर्सन याने केलेली यशाची व्याख्या आपल्याला सांगते- आनंदात राहणे, हसणे, हुशार लोकांचा आदर करणे, इतरामध्ये सर्वोत्तम शोधणे, जगाला तुमच्याकडील उत्तम देणे, जीवन सुलभ आहे, जे तुम्ही जगला आहात ते म्हणजे यश आहे. हे कसे साध्य होऊ शकेल यां विषयी मागील भागात मार्गदर्शन केलेले आहे आज याच विषयी अधिक जाणून घेऊया:

१.      भावनिक बुद्धिमत्ता: एकूणच बुद्धिमत्ता हे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी योगदान देणारा एक घटक असल्याचे मानले जात आहे. परंतु काही तज्ञानी असे सुचविले आहे की भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणखी महत्वाची असू शकते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावना समजून घेण्याची , वापरण्याची, आणि तर्क करण्याची क्षमता. भावनिक दृष्ट्या सक्षम मंडळी केवळ स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्याही भावना समजून घेण्यात अग्रेसर असतात. भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी तुमच्या स्वत:च्या भावनांकडे लक्ष द्या, जे आजकालच्या जगात लुप्त होत चालले आहे असे मी मानतो. स्वत:स काय वाटते आणि ते तसेच का वाटते? याची उत्तर शोधली जात नाहीत, ती शोधावीत कारण त्यानंतर आपण इतर मंडळींच्या भावना जाणू शकू. इतरांचे ऐका ते काय बोलत आहेत ते जाणून घ्या, असे होतानाही अलीकडे दिसत नाही. यावर थोडा विचार नक्की करा !

२.      मानसिक सहनशीलता:- मानसिक सहनशीलता / कणखरपणा म्हणजे अनेक अडथळ्यांना तोंड देऊनही प्रयत्न करीत राहणे आणि पुढे चालत राहणे. मानसिक दृष्ट्या सक्षम असलेली मंडळी आव्हानांना संधीच्या स्वरूपात पाहतात. त्यामुळे यशस्वी होण्याच्या त्यांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास असतो. ते जे हातात घेतात त्यास तडीस नेतात. त्यासाठी ते स्वत:शी वचनबद्ध असतात. कसे करता येईल? तर स्वत:वर विश्वास ठेवा, सकारात्मक आणि स्व-प्रोत्साहन देणारे / राहण्याचे मार्ग शोधा, त्याचां स्वीकार करा. प्रयत्न करीत रहा, जरी गोष्टी अशक्य वाटतात किंवा येणारे अडथळे तुम्हास प्रतिरोध करतात तरी तुमचे कौशल्य विकसित करा आणि जीवनात चालत राहण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि सर्वात महत्वाचं स्वत:ची काळजी घ्या. “सर सलामत तो पगडी पचास” हा मूलमंत्र ध्यानात ठेवा.

३.      प्रखर इच्छाशक्ती:-जीवनात यशस्वी होणाऱ्या व्यक्तिं कडे चिकाटी आणि प्रखर इच्छाशक्ती महत्वाची हे विसरू नका- ही वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात, परंतु यात देखील सुधारणा करता येऊ शकते. आव्हानांचा सामना करीत असताना टिकून राहण्यास शिकणे आणि आपल्या मेहतीच्या फळांची वाट पाहणे ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली असू शकते.

यशाचे कोणतेही एकच माप नाही, आणि जीवनात कसे यशस्वी व्हायचे याचे एकच असे उत्तर नाही तरीही यशस्वी लोकांच्या काही सवयी पाहून तुमच्या स्वत:च्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी नवीन डावपेच आणि रणनीती शिकू शकता. क्षमतांची जोपासना करा आणि सोबतच त्याचे संगोपन करा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?