ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

“आदर्श” बनण्याचा क्यु-आर कोड

 

आजच्या लेखांमध्ये वापरण्यात आलेला क्यु-आर कोड, आदर्श असा अर्थबोध देतो, तो फक्त स्कॅन करून “आदर्श” होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं, नाही का? ज्यास आदर्श व्यक्ति व्हायचं आहे त्याने क्यु-आर कोड स्कॅन करावा, पण असे होत नाही, असे करता येत नाही, मग आदर्श बनण्याचा क्यु-आर कोड नक्की काय आहे? हे आजच्या लेखात पाहुयात..   आयुष्यात आपण कुणाचा आदर्श होऊ म्हणून कुणी त्यासाठी परिश्रम करीत नाहीत, आदर्श बनतात ते त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यां मुळे, केलेल्या सामाजिक योगदान आणि दूरदृष्टि मुळे , त्यांचा नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सर्वात महत्वाचं म्हणजे गरुडझेप घेण्याची जिद्द या सर्व बाबी मुळे एक आदर्श व्यक्तिमत्व घडतं , लोक आजकाल फक्त लाईम लाइटच्या झगमगाटास भुलतात आणि त्यासच आदर्श मानू लागतात. जे सर्वस्वी चुकीचे आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांती साठी प्रार्थना १३ व्या शतकात लिहून ठेवली होती जी आजही प्रेरणा देते. अवघ्या हिंदुस्थानाचे अखंड प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज- आजही त्यांची शिकवण , त्यांचे विचार धीरोदात्त मानून चालणारे अनेक लोक आहेत, चीरकाल राहतील. आयुष्य घडविताना थोरा मोठ्यांचा मान राखायचा, त्यांचे आचार-विचार समजून घ्यायचे, अंगीकारायचे, याचं बाळकडू या आदर्श मंडळींनी नक्कीच घेतलेलं असणारं. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार, दोषांचा भागाकार, याचा अर्थ स्वत: मधील उत्तम गुण वाढवायचे आणि दोषांचे प्रमाण कमी करायचं , त्यासाठी प्रयत्न करायचे.  विचार आणि कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज भासते. संस्कार म्हणजे काय तर मूल्यं – वॅल्यूज इन अवर लाइफ! संस्कार उत्तम आचरणाचे , उत्तम अभ्यासाचे , उत्तम वागणुकीचे, संस्कार म्हणजे कोणालाही न दुखावता बोलण्याचा हातखंडा मिळविणे, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त काही नवीन करण्याचे हे सारं सारं करिअर घडविताना मॅटर करतं.

          एक पालक म्हणून तुम्ही आम्ही जी कृती करतो त्याचे अनुसरण पाल्य करीत असतो हे ध्यानात घेतलं पाहिजे, कॉपी टू कॉपी अशी ही कृती असते, त्यामुळे एक पालक म्हणून सदैव जागरूक राहणं फार आवश्यक असतं. आजकाल आजू-बाजूस घडणाऱ्या गोष्टी पाहता जागरूकता यास खूप महत्व आहे, त्याच्याकडे काना-डोळा करणे परवडणारे नाही. सगळ जग बोटांवर स्थिरावत आहे अशावेळी माहिती, आणि विविध बाबी सहज उपलब्ध होतात त्यातूनच पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार , चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात त्यात दू-मत नाही पण ज्याचा आपल्या संस्कृतीशी दुरान्वये संबंध नाही त्याचा विचार न करता केला जाणार स्वीकार मला घातक आणि आपल्याकडील समाज बदलास पोषक वाटतं नाही. आपण सगळेच ज्या समाजात राहतो त्याचे काही तरी देणं लागतो, असा विचार डोक्यात ठेवावा, या विचाराने बरीच मदत होईल असे वाटते. असे म्हंटले जाते “बी द चेंज”, पण चांगल्या गोष्टींचा बदल स्वीकारणं , हे केल्यास तुमचे अनुकरण इतर लोकही करतील, पण तुमच्यावर जबाबदारी आहे हे विसरू नका. उत्तम कार्य करायच आहे? अभ्यास करून एखादं शिखर गाठायचं आहे तर प्रतिकूल परिस्थिती ही येणारचं त्यावर मात करून , त्याचे भांडवल न करता पुढे जाणे आणि यश साध्य करणे , हे करीत असताना आपल्या यां मार्गावर दूसरा कुणी चालण्यास तयार असेल तर त्यास मार्ग दाखविणे म्हणजे “आदर्श” . शाळेत अभ्यास करून परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजे करिअर नाही तो एक शैक्षणिक प्रवासातील टप्पा आहे. करिअर घडवित असताना “मला काय आवडतं?”, “मला काय जमतं?”, आणि “समाजास त्याची गरज आहे का?” या तीन प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असावीत , नसतील तर याची उत्तरं शोधा जी तुम्हास तुमच्या करिअर ट्रॅकवर घेऊन जातील आणि तुम्ही नक्कीच उद्याचे आदर्श व्यक्तिमत्व असाल.

शुभेच्छा !!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 

यु-ट्यूब: Amit Kamatkar


फोटो: गुगल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?