दैनिक संचार मध्ये दि.२४/१०/२०१५ रोजी प्रकाशीत झालेला डिजिटल व स्कील इंडिया बद्दल माहिती देणारा माझा लेख.
पोस्ट्स
जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
फॉलोअर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्मार्ट सिटी आहे काय ? सर्व प्रथम केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये सोलापूरची निवड झाल्याबद्दल तमाम सोलापुरकरांचे अभिनंदन ! गिरणगाव म्हणून ओळख असलेले सोलापूर संपूर्ण देशात स्मार्ट सोलापूर म्हणून प्रसिद्ध होत आहे याचा एक सोलापूरकर म्हणून मला अभिमान वाटतो पण त्या सोबतच जबाबदारीची जाणीव ठेवणे आपल कर्तव्यच आहे. स्मार्ट सिटीची शासनाकडून कोणत्याही प्रकारची विशिष्ट अशी व्याख्या देण्यात आलेली नाही परंतु सुखकर राहणी, सहज उपलब्ध होणा-या सोयी सुविधा, प्रदूषण रहित वातावरण तसेच नैसर्गिक सुविधांचा वापर हे सर्व उपलब्ध होणे म्हणजेच स्मार्ट सिटी !! पण या सर्व बाबीं मध्ये लोक सहभागास अनन्यसाधारण असे महत्व आहे. लोकसहभागाशिवाय स्मार्ट होणे अवघडच नाही तर अशक्य आहे. आता पहा सुरुवातीस सोलापूरचा गावठाण भाग किंवा ज्यास आपण जूने सोलापूर म्हणू तो परिसर स्मार्ट होणार आहे मग उर्वरित सोलापूरकरांनी तो भाग स्मार्ट होण्यासाठी योगदान देणे अपेक्षित आहे. कारण पहा ना, ज्या सिटीचे नागरिक स्मार्ट तीच सिटी स्मार्ट ! नुसती सिटी स्मार्ट कधीच होवू शकत नाही. नाही का ? तर मग सोलापूरकर म्हणून मि काय योगदान