फॉलोअर

स्मार्ट सिटी आहे काय ?
       सर्व प्रथम केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये सोलापूरची निवड झाल्याबद्दल तमाम सोलापुरकरांचे अभिनंदन ! गिरणगाव म्हणून ओळख असलेले सोलापूर संपूर्ण देशात स्मार्ट सोलापूर म्हणून प्रसिद्ध होत आहे याचा एक सोलापूरकर म्हणून मला अभिमान वाटतो पण त्या सोबतच जबाबदारीची जाणीव ठेवणे आपल कर्तव्यच आहे. स्मार्ट सिटीची शासनाकडून कोणत्याही प्रकारची विशिष्ट अशी व्याख्या देण्यात आलेली नाही परंतु सुखकर राहणी, सहज उपलब्ध होणा-या सोयी सुविधा, प्रदूषण रहित वातावरण तसेच नैसर्गिक सुविधांचा वापर हे सर्व उपलब्ध होणे म्हणजेच स्मार्ट सिटी !! पण या सर्व बाबीं मध्ये लोक सहभागास अनन्यसाधारण असे महत्व आहे. लोकसहभागाशिवाय स्मार्ट होणे अवघडच नाही तर अशक्य आहे. आता पहा सुरुवातीस सोलापूरचा गावठाण भाग किंवा ज्यास आपण जूने सोलापूर म्हणू तो परिसर स्मार्ट होणार आहे मग उर्वरित सोलापूरकरांनी तो भाग स्मार्ट होण्यासाठी योगदान देणे अपेक्षित आहे. कारण पहा ना, ज्या सिटीचे नागरिक स्मार्ट तीच सिटी स्मार्ट ! नुसती सिटी स्मार्ट कधीच होवू शकत नाही. नाही का ? तर मग सोलापूरकर म्हणून मि काय योगदान देवू शकतो याचा विचार प्रत्येकाने करणे योग्य होईल असे मला वाटते.
       स्मार्ट सिटीचा डोलारा १.शासन, नियोजन व व्यवस्थापन 2. भौतिक पायाभूत सुविधा ३.समाज उपयोगी पायाभूत सुविधा ४. आर्थिक सुविधा या चार महत्वपूर्ण बाबींवर रचण्यात आला आहे .
१. शासन, नियोजन व व्यवस्थापन :- या मध्ये अपेक्षित बाब एकदम सोपी आहे . यात केंद्रस्थानी त्या शहराचे नागरिक राहणार आहेत. शहराचा नागरिक या नात्याने शासनास (स्थानिक संस्था) सूचना कारणे अथवा प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे अशा बाबी नागरिकांकडून अपेक्षित आहेत. शासनास (स्थानिक संस्था) सुशासन तसेच ई-शासन बनविणे व राबविणे या दोन्ही मध्ये नागरिक योगदान देवू शकतो. जसे शासनाच्या विविध योजनांचा ऑनलाइन लाभ घेणे हा भाग देखील स्मार्ट होण्यासाठी पाहिलं पाऊल होवू शकते. एखाद्या विभागास तशी सेवा नसेल तर त्या विभागास ती सेवा सुरु करण्याबाबत सुचवणे व त्याचा पाठपुरावा करणे. अर्थात स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करीत असताना महानगरपालिकेने स्मार्ट सिटी बद्दलच्या अपेक्षा नोंदविण्यास आवाहन केले होते, अगदी त्याच प्रकारे लोकसहभाग अपेक्षित आहे तरच नियोजन व व्यवस्थापन करणे शक्य होईल असे वाटते.
2. भौतिक / आवश्यक पायाभूत सुविधा :   या सुविधा उपलब्ध करून देणे थोडे जिकीरीचे काम आहे असे वाटते कारण या सुविधान बद्दल नागरिक कधीच जागरूक नसतात. ती जागरूकता निर्माण होणे हि या सुवेधेची गरज आहे. यात आपणास परीवहन सेवा , चालण्यासाठी व सायकलिंग साठी स्वतंत्र पथ, बागा फुलविणे व त्यांचा सांभाळ करणे, पाण्याचे व्यवस्थापन करणे ज्या मध्ये प्रक्रिया केलेले व प्रक्रिया न केलेले पाणी यांचा समावेश होतो. सांडपाणी, पावसाचे पाणी , जल पुर्न्भरण सारखे प्रकल्प लोकसहभागातून पूर्णत्वास जावू शकतात. सोबत सौर उर्जा उपकरणांचा वापर, पवनचक्की चा वापर आणि माहिती तंत्रज्ञान व शासनाशी सतत जोडलेले राहण्यासाठी १००% वाय-फाय परिसराची उपलब्धता !
३.समाज उपयोगी सुविधा :- या सुविधे अंतर्गत खेळ,करमणूक, ई-एज्युकेशन, टेली-मेडिसिन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देता येवू शकेल. खेळाचे मैदान, टेली-मेडिसिन, करमणुकीसाठी सोयी-सुविधा देत असताना सामाजिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा संकल्प स्मार्ट सिटी देत आहे असे म्हंटले तर वावगे होणार नाही. केंद्र सरकारचे   जन-औषधी सारखे प्रकल्प यात मोलाचा वाटा उचलू शकतात व टेली मेडिसिन च्या वापराने युवकांना         स्वयं-रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे मात्र नक्की !
४. आर्थिक सुविधा : कोणत्याही योजनेची सुरुवात करीत असताना आर्थिक पाठबळाची आवश्यकता लागणार यासाठी विविध फायनांशीअल हब ची निर्मिती या सुविधे अंतर्गत करता येवू शकेल. एखादा उद्योग, सेवा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या सुविधेचा प्रथम हेतू आहे. पर्यावरण पूरक योजना तयार करीत असताना खासगी गुंतवणूकदार  देखील महत्वाची भूमिका पार पाडू शकतात याची विशेष नोंद घ्यावी लागेल.
       हि बाजू झाली योजनेची पण सोलापूरचा नागरिक म्हणून आपण स्मार्ट कसे होवू ? यासाठी मला खालील बाबी सुचवाव्या वाटतात. या सर्व बाबी आत्मसात करण आपणा सर्वाना सहज शक्य आहेत असे वाटते आणि स्मार्ट होणे या पेक्षा काही वेगळे नसावे !!!
हे विश्वची माझे घर : १.घर व परिसर स्वच्छ ठेवणे 2. कच-याचा योग्य विनिमय/व्यवस्थापन- यामध्ये घंटा गाडीचा वापर, कचरा कुंडी व्यवस्थापन- कुंडी भरलेली असल्यास महापालिकेस फोन करा. ओला कचरा /सुका कचरा विभाजन करा. ३. रस्त्यावर, कार्यालयात थुंकू नका.४.रस्त्यावरचे दिवे (सकाळच्या वेळी) चालू असतील तर महापालिकेस कळवा ५. पाणी वापराचे नियोजन करा. तोटी नसलेल्या नळांना पुढाकार घेवून तोटी लावा. ६. शौचास घरा बाहेर जावू नका- कुणी जात असेल तर अटकाव करा.
वाहतुकीचे नियम : १. ,एका टू-व्हीलर वर तीन/चार जन प्रवास करू नका. 2. प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी पुढाकार घ्या- स्वत:च्या गाडीपासून प्रदूषण नियंत्रित करा.३.वन-वे मध्ये ड्रायविंग करू नका- विरुद्ध दिशेने प्रवास करू नका, कुणी करत असेल तर अटकाव करा. ४. हाय-वे वर सर्विस रोड चा वापर करा. ५.वाहन चालविताना मोबईल चा वापर टाळा. ६. फोर-व्हीलर असल्यास सीट –बेल्ट चा वापर करा.7.शाळेतील विद्यार्थी शाळा सुटल्या नंतर एका रांगेत बाहेर सोडा व त्याच शिस्तीत घरी जाण्याबद्दल सूचना करा- यासाठी शाळेतील शिक्षक व पालक महत्वाची भूमिका बजावू शकतात. यामुळे अपघात होणार नाहीत आणि प्रदूषण नियंत्रणात येण्यास मदत मिळेल असे वाटते.
माहिती तंत्रज्ञान –हि नवी आशा व दिशा : माहिती तंत्रज्ञान शिका,नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा जसे तुमचा स्मार्ट फोन वापराचे प्रशिक्षण घ्या (वापरता येत नसल्यास), आधार कार्ड बनवून घ्या-ती तुमची डिजिटल ओळख आहे हे विसरू नका. स्मार्ट सिटी मध्ये तुमची डिजिटल ओळख महत्वाची ठरणार आहे. ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा. विविध बिल ऑनलाइन भरण्याचे प्रशिक्षण घ्या व त्याचा वापर सुरु करा.
इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर :- स्मार्ट सिटी इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर फार मोलाचा ठरणार आहे कारण सर्व स्मार्ट होत असताना माहिती तंत्रज्ञानाचा वापर एक अत्यावश्यक बाब असणार आहे.२०२० पर्यंत २६ अब्ज वस्तू एकमेकांशी जोडल्या जातील व त्या बॉडी एरिया नेटवर्क या प्रणाली द्वारे वापरता येवू शकतील.आणि याच वस्तू आपल्याला स्मार्ट माहिती देण्यास वापरता येवू शकतील.जसे पाणी,वायू प्रदूषणाची आकडेवारी, स्मार्ट पार्किंग- आपली गाडी पार्क करण्यासाठी जागा कुठे उपलब्ध आहे याची माहिती, रस्त्यावरून जाताना कोणत्या लेन मध्ये ट्राफिक जम आहे याची माहिती, कचरा कुंडी भरली आहे याची माहिती आपसूकच महापालीकेकडे पोहोच होईल. गोळ्या-औषधांसाठी सूचना उपकरणे, सायकल ट्रेक वर वारयाची दिशा आदी बाबी सहज उपलब्ध होतील यासाठी आवश्यक पायाभूत सुविधे अंतर्गत तयार केलेले १००%वाय-फाय परिसर आपल्याला मदत करतील !!!
या सर्व बाबी जर आपण आत्मसात करू शकलो तर मला विश्वास वाटतो कि आपण नक्कीच सोलापूर ला स्मार्ट सिटी बनवू !! स्मार्ट सिटी चे स्मार्ट नागरिक होण्यासाठी तुम्हास शुभेच्छा !!

माझा हा माहितीपूर्ण लेख दैनिक दिव्य-मराठी मध्ये दि.०७/०२/२०१६ रोजी प्रसिद्ध झाला आहे.

टिप्पण्या

  1. वाहतूकीचे नियम न पाळणारी जनता ही कोणतेही वर्तमानपत्र न वाचणारी, आकाशवाणीवरील संबंधित निवेदने न ऐकणारी असतेे, असा ठाम ग्रह , माझातरी , झालेला आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. वाहतूकीचे नियम न पाळणारी जनता ही कोणतेही वर्तमानपत्र न वाचणारी, आकाशवाणीवरील संबंधित निवेदने न ऐकणारी असतेे, असा ठाम ग्रह , माझातरी , झालेला आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. स्वयंशिस्तीने कितीतरी गोष्टी सुधारता येतील.
    जसे की स्वच्छता,
    वाहन चालवण्याचे नीयम पाळून आपघात टाळणे...इत्यादी

    उत्तर द्याहटवा
  4. स्वयंशिस्तीने कितीतरी गोष्टी सुधारता येतील.
    जसे की स्वच्छता,
    वाहन चालवण्याचे नीयम पाळून आपघात टाळणे...इत्यादी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?