डिजिटल इंडिया – डिजिटल लॉकर
सध्या
संपूर्ण भारत भर चर्चेत असलेला विषय म्हणजे डिजिटल इंडिया , कॅश लेस इंडिया !! कॅश
लेस इंडिया होणे हेतू भारत सरकार विविध पावले उचलत आहे. त्या अनुषंगाने लोकांमध्ये
जागृती होणे देखील आवश्यक आहे. त्या आधारे कॅशलेस कडे पावले उचलली जातील देखील !!
डिजिटल इंडिया या योजनेत सरकार व नागरिक दोघेही ऑनलाइन होणार आहेत. डिजिटल इंडिया
हि संकल्पना सर्व भारतीयांच्या सहभागाशिवाय पूर्ण होवू शकत नाही याची सुरुवात आधार
कार्डापासून झालेली आहेच. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही डिजिटल इंडिया या
संकल्पनेतील एक पल्ला पार केला असे मी मानतो. तुम्ही तुमच्या कडील सर्व महत्वाची
कागद पत्रे डिजिटल लॉकर (बँकामध्ये ज्याप्रमाणे लॉकर्स असतात त्याप्रमाणेच) मध्ये
ठेवू शकता. शासकीय/ निमशासकीय यंत्रणेत तुम्हास रोजगारासाठी अर्ज करायचा असल्यास
तुम्हास लागणारी सर्व कागदपत्र (शैक्षणिक,मालमत्ता कागदपत्र) ह्या डिजिटल लॉकर
मध्ये ठेवून तुमच्या अर्जा सोबत ऑनलाइन जोडता येतील व त्यावर तुम्ही ई-साईन करू
शकाल. अर्जा सोबत जोडायच्या प्रति देखील साक्षांकित,सत्यप्रत(true copies)
करण्याची गरज आता राहणार नाही. त्यामुळे डिजिटल लॉकर हि सुविधा समजावून घेवून तिचा
वापर करता आला पाहिजे असे वाटते. डिजिटल इंडिया मध्ये डिजिटल लॉकर ची भूमिका
महत्वाची असणार आहे यात शंकाच नाही. विविध सर्टिफिकेट, पॅनकार्ड, वोटर कार्ड, आधार
कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी सुरक्षित पणे स्टोअर करून ठेवता येतील.
डिजिटल लॉकर वापरायचा असल्यास
तुमच्याकडे आधार कार्ड असावे म्हणजे अधिक सुरक्षित पणे सर्व बाबींचा वापर करता
येतो. तुम्हास सर्व प्रथम www.digilocker.gov.in या संकेत स्थळावर जावे लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईल च्या सहाय्याने तुमच
अकौंट सहज तयार करू शकाल. मोबाईलवर वन टाईम पासवर्ड (OTP) प्राप्त झाल्यावर तुमचे
डिजिटल लॉकर अकौंट तयार होईल.यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या आधारे व त्या
सोबतच नोंदणीकृत मोबाईलच्या आधारे पुढील प्रक्रिया करणे सहज शक्य होईल. तुमच्या
कडे असणारी तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुम्ही या लॉकर मध्ये सुरक्षित ठेवू
शकता व गरजेच्या वेळी शासकीय कार्यालयाकडे वापरू शकता. जी शासकीय कार्यालये संगणकीकृत
झाली आहेत त्या कार्यालयाकडून देखील तुम्ही कागदपत्रे या लॉकर मध्ये स्टोअर करू
शकता. जसे आर.टी.ओ मार्फत घेतलेले तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही या लॉकर मध्ये
सुरक्षित मागवू शकता यासाठी तुमच्याकडे लायसन्स क्रमांक असणे आवश्यक, हि कागदपत्रे
ईशूड डॉक्युमेंटस् या सदराखाली तुम्ही पाहू शकता.कोणतेही डॉक्युमेंटस् e-sign करणे
(self attested) हेतू तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक. आधार कार्ड वरील माहिती
द्वारे e-sign काम करते,पडताळा करणे हेतू बायोमेट्री अथवा OTP चा वापर केला जातो व
तुमच डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड होते.
तुमचे डिजिटल लॉकर अकौंट सुरु करायचं
असल्यास विद्या कॉम्प्युटर्स तुम्हास सहकार्य करेल. यासाठी आपण संपर्क करू शकता,
विद्या कॉम्प्युटर्स , प्लॉट नं.२, श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज रोड, जुळे सोलापूर
फोन-२३०३३३४.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा