ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

 

नमस्कार सोलापूरकर, मी एम.आय.डी.सी. चिंचोळी येथील एक धूळ खात पडलेली इमारत ज्याचे माहिती तंत्रज्ञान संकुल म्हणून १० फेब्रुवारी २००१ रोजी तत्कालीन उद्योग मंत्री डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन केले होते. या कार्यक्रमास तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे साहेब, आर आर पाटील साहेब, आमदार उत्तमप्रकाश खंदारे साहेब हि दिग्गज मंडळी उपस्थित होती. सोहळा खूप दिमाखदार झाला, हे दाखविणारा फलक तुमच्या स्वागताला पहायला आणि वाचायला तुम्हाला मिळेल. आजकाल तुम्ही काय म्हणता ते, ट्रेन्डीग वगैरे तसचं काहीतरी तेंव्हा मीडिया ने यास खूप चांगली प्रसिद्धी दिली होती, महाविद्यालयातील युवक मोठ्या आशाने या सर्वांकडे पाहत होता, शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी तर स्वप्नं रंगू लागले होते, कि आता सोलापूर सोडायची गरज नाही, माहिती तंत्रज्ञान संकुल (आय टी पार्क) सोलापुरात झाल आहे म्हणजे “अपनी तो निकल पडी”, कारण जॉब साठी होम टाऊन सोडायची गरज आता राहणार नव्हती, सगळं इथेच सोलापुरी होईल असे वाटतं होते. २०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या रिपोर्ट नुसार पुण्यात खाजगी आय टी पार्क संख्या हि १७२ एवढी आहे, मुंबई १६१ , ठाणे १४०, संभाजीनगर ०३, नाशिक ०५ , नागपूर ०५ अशी एकूण ४८६ एवढी खाजगी आय.टी. पार्क अस्तित्वात आहेत.

          इन्व्हेस्टर मंडळी महाराष्ट्रात यावेत या दृष्टीने प्रत्येक सरकार प्रयत्न करतं पण शासनाच्या प्रयत्नाने औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत होणारे संकुल सोलापुरात साकारत होतं आणि हा निर्णय देखील खूप लवकर झाला, नाही तर म्हणतात ना, “शासकीय काम सहा महिने थांब”, पण या वेळी असे झाले नाही, मलाही त्याचं आश्चर्य वाटलं पण म्हंटल सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आपल्या स्थापनेने होणार आहे याहून अभिमानाची गोष्ट ती कोणती? त्याचं झाल असे “करेरा होल्डिंग” नामक एक इटालियन कंपनी जी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा मनोदय घेऊन आली, त्या नुसार त्यांनी कोल्हापूर येथे १३० दशलक्ष डॉलर एवढी गुंतवणूक करून ग्रीन फिल्ड टेक्सटाईल पार्क स्थापन करणार असं ठरलं. यात सोलापूरचा नंबर लागला, सोलापूरच्या वाट्याला १९५ हेक्टर एवढी जमीन देण्यात आली, आणि विकासकाचे काम एम.आय.डी.सी.ला देण्यात आले. या विकासकाने त्वरेने बांधकाम करीत सुसज्ज अशी इमारत उभी केली (त्याकाळी ४.५ कोटी एवढा खर्च झाला आहे), सर्व सोयी सुविधा अर्थातच ज्या टेक्सटाईल पार्क साठी गरजेच्या आहेत त्या सर्व येथे देण्यात आल्या, कामकाज सुरु होईल अशी आशा होती पण करेरा होल्डिंग्ज ने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे त्यांच्या अंतर्गत कारणाने रद्द केले आणि माझी सगळी स्वप्न धुळीस मिळाली. मग याच संकुलास माहिती तंत्रज्ञान संकुल म्हणून घोषित करण्यात आले.

          या नंतर नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रीज असोसियेशनचे तत्कालीन अध्यक्ष मा.श्री जयकुमार पाटील साहेब यांच्या पुढाकाराने इमारती मध्ये विविध व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, पाटील साहेबांनी खूप प्रयत्न केले, आय टी आणि तत्सम व्यवसाय इमारतीत सुरु व्हावेत यासाठी पण तेंव्हा इंटरनेट, ट्रान्सपोर्ट, कनेक्टीव्हिटी इ. सुविधांचा अभाव या सर्व बाबी घातक ठरल्या आणि काहीच सुरु होऊ शकलं नाही. जे अद्यापही काहीच सुरु झालं नाही. एकूण १८ हॉल  उपलब्ध असताना एकही वापरता येत नाही हे किती मोठे दुर्दैव !!! सुविधांची वानवाच कारणीभूत ठरली म्हणावे लागेल. आय.टी. पॉलीसी अंतर्गत विविध सुविधा देणे हे विकासकास बंधनकारक करण्यात आलेलं असल्याने त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्याच लागतात जसे कि मॉल्स, सिनेमा, रेसिडेन्शियल अपार्टमेंट, शो-रूम्स, हॉस्पिटल आणि इतर सुविधा या ठिकाणी अपेक्षित आहेत असे महाराष्ट्र शासनाची आय.टी. पॉलीसी २०१५ सांगते. अशी कोणतीच सुविधा माझ्या इथे नाही. आज इथे व्यक्त होताना एकच विनंती करावी वाटते कि या आणि इतर सुविधा देऊ केल्यास नक्कीच माझा योग्य वापर होऊ शकेल.

          इमारत बंद अवस्थेत आहे म्हंटल कि विविध गोष्टींची चोरी होणे, काचा फोडणे, विद्रुपीकरण करणं या यातना मला देखील भोगाव्या लागल्या, आता माझी देखभाल करण्याची जबाबदारी श्री. सुभाष श्रीमंत पवार आणि श्री तुकाराम ज्ञानोबा जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. पण जो पर्यंत कुणी पुढाकार घेऊन इथे काम सुरु करणार नाही तो पर्यंत माझा योग्य वापर होणार नाही हे नक्की !!

आय. टी. पार्क येथे खालील सेवा / व्यवसाय सुरु करता येऊ शकतील. (काही मोजक्या बाबी खाली देत आहे)

१.      आय टी सॉफ्टवेअर

२.      आय टी हार्डवेअर

३.      आय टी एनेबल सर्विसेस (ITeS)

a.    बॅक ऑफिस ऑपरेशंस

b.    कॉल सेंटर

c.    कॉन्टेट डेव्हलपमेंट

d.    डेटा प्रोसेसिंग

e.    इंजिनिअरिंग आणि डिझाईन

f.     इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग

g.    वेब साईट सर्विसेस

h.    रिमोट मेंटेनन्स इ.

आणखी बरचं आहे पण हे करताना (आय टी पॉलीसी आधारे) सोलापूर महापालिका, विकासक यांनी काही बाबींची काळजी घ्यायला हवी जसे कि परिवहनच्या माध्यमातून चांगली सेवा, वाढीव एफ.एस.आय. ची तरतूदीचा फायदा घेता यावा, वीज दर, मुद्रांक शुल्क सूट (सी, डी, डी+ महानगरपालिका अंतर्गत), उद्योग संचालनाकडे नोंदणी केलेल्या IT/ITeS उद्योगांना वीज दरात १० वर्षा पर्यंत सूट मिळू शकते अशी सोय देखील करण्यात आलेली आहे. सोबतच वीज दर अनुदान देखील मिळवता येते. (subsidy for 3 years @ Rs. 1/- per unit consumed from the date of registration of the IT Park) इतर हि करांवर सूट देण्याची सुविधा पॉलीसी मध्ये देण्यात आलेली आहे.

आज तुम्हा सोलापूरकरांशी संवाद साधण्याचे कारण एकच या इमारतीचा वापर सुरु करता येतो पण गरज आहे पुढाकाराची...... मग घेताय ना पुढाकार ?

धन्यवाद !!


अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

Message Amit Balkrishna Kamatkar on WhatsApp.

https://wa.me/message/LMSBUZHZPASSB1


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. मग आता नेमकी अडचण काय आहे, कोण योग्य व्यक्ती आहे जी या जागेला आणि प्रकल्पला न्याय देऊ शकेल. IT असोसिएशन सोलापूर आपल्याकडे आहे का? बाहेरून कुणी येणार नाही हे सत्य आहे, परंतु आपल्यातीलच सर्व लहान मोठे IT उद्योजक नाही व्यावसायिक एकत्र येऊन क्लस्टर डेव्हलपमेंट च्या धर्तीवर एकत्र काम करू शकतात असे वाटते

      हटवा
    2. आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद. तसे प्रयत्न सरू आहेत पण एखादी आय टी कंपनी सोलापुरात सुरू झाल्यास यास वेग मिळेल असे वाटते,

      हटवा
  2. मला योगदान देण्याची इच्छा आहे आपण मला संपर्क करावा धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. या विषयावरील बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बघितल्याचे आठवते. पण, आता शोधूनही एक पण बातमी सापडत नाहीये. महायुती सरकारच्या नव्या आय टी पार्कच्याच बातम्या दिसत आहेत सगळीकडे. या माहिती तंत्रज्ञान संकुलाचे लोकेशन देखील सापडत नाहीये गूगल मॅप्सवर.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. MIDC चिंचोळी कडे -फ्लायओवर खालून उजव्या हाताकडे सरळ जा, लेखात दिलेल्या फोटो मधील इमारत तुम्हास उजव्या हातास दिसेल. थोडा प्रयत्न केल्यास इमारत कंपाऊंड मध्ये प्रवेश देखील करता येईल.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

एआय शिक्षकांची जागा घेईल ?