गुगल- माय बिझनेस
गुगल विविध सेवांसाठी सर्वश्रुत नांव ! इंटरनेट वर काहीहि काम असल कि युजर गुगल ला पहिली पसंती देतो. गुगलवर सर्च करायचं आणि पुढे जायचं अस साधारण इंटरनेट वापरणाऱ्याचे असत अस सर्वेक्षण सांगत. गुगल च्या विविध सेवांबद्दल मी या अगोदर लिहिले आहे पण आज तुम्हाला गुगल ने देवू केलेल्या नवीन सेवे बद्दल माहिती सांगणार आहे. वेब साईट तयार करणे तस थोड जिकीरीचे काम, प्रोग्राम कोड लिहावा लागतो,फोटोज अलायनमेंट करावे लागतात आणी एखादे ले-आऊट सुद्धा तयार करावे लागते पण हे सगळ आता तुमच्यासाठी गुगल करणार आहे आणि तेही केवळ काही मिनिटात !! वाटल ना आश्चर्य ! पण हे खर आहे गुगल ने “माय बिझनेस” या नावाने एक नवीन सेवा सुरु केली आहे ज्यामध्ये युजर अवघ्या काही मिनिटात स्वत:ची वेब साईट तयार करू शकतो. साधारण ४०० दशलक्ष भारतीय ऑनलाईन असतात आणि त्यापैकी ३०० दशलक्ष भारतीय हे स्मार्ट फोन चा वापर करतात अस गुगल चे सर्वेक्षण सांगत आणि हे स्मार्ट फोन वापरणाऱ्या युजरना गुगल ने केंद्रस्थानी धरल आहे. या स्मार्ट फोन युजरना वेब साईट तयार करायची असल्यास सहज सोप्या स्टेप्स ने वेब साईट तयार करण्याचे टूल गुगल ने याद