फॉलोअर

फायरबॉल – मालवेअर पासून सावधान



संपूर्ण जग अजून रॅन्समवेअर या व्हायरस पासून संरक्षण उपाय करीत असतानाच आता फायरबॉल  या मालवेअर पासून नवीन धोका उद्भवला आहे. रॅन्समवेअर हा तुमच्या डेटा साठी पैशाची मागणी (खंडणी मागणारा) करणारा व्हायरस आहे आणि फायरबॉल हा एक मालवेअर व्हायरस आहे. मालवेअर म्हणजे तुमच्या संगणकास नुकसान पोहोचविणे हेतू तयार केलेला प्रोग्राम. फायरबॉल या मालवेअर मुळे जगातील २५० दशलक्ष संगणकास धोका उद्भवू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. हा धोका भारत, ब्राझील, मेक्सिको याठिकाणी 20% पर्यंत होवू शकतो अस तज्ञ सांगतात.

          हा मालवेअर तुमच्या संगणकावर इंस्टॉल झाल्यावर वापरकर्त्यास गुगल/ याहू सारख्या दिसणाऱ्या वेबपेजेस वर डायरेक्ट (पाठवितो) करतो. हि दोन्ही पेजेस दिसायला अगदी हुबेहूब गुगल आणि याहू सारखी दिसतात ज्यावर विविध नकली लिंक्स  वापरकर्त्यास (युजरला)क्लिक करण्यासाठी उपलब्ध होतात. या क्लिक्स द्वारे वापरकर्त्याची माहिती गोळा केली जाते. इस्त्राईल येथील चेक पॉइंट या सिक्युरिटी फर्म ने याचा शोध लावला असून त्यांच्या मते भारत सुद्धा या व्हायरसच्या फेऱ्यात येवू शकतो अस त्यांच म्हणण आहे. सिक्युरिटी फर्म च्या मते या मालवेअर व्हायरस ची व्याप्ती मोठी आहे आणि विध्वंसक क्षमता हि तेवढीच आहे. बीजिंग स्थित जाहिरात कंपनी रॅफोटेक या प्रकारचे नकली क्लिक चे पेजेस त्यांच्या जाहिरातदारांसाठी तयार करते.


          चेकपॉइंट या सिक्युरिटी फर्म नुसार रॅफोटेक हि संक्रमित संगणकावरील संपूर्ण माहिती जसे कि क्रेडीट कार्ड क्रमांक, व्यावसायिक योजना, पेटंटस आणि इतर बाबी एकत्रित करून ती विकू शकते. फायरबॉल मुळे वैयक्तिक माहितीस धोका निर्माण होवू शकतो. या मालवेअरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे संक्रमित संगणकावर कोणताही कोड वापरता येवू शकतो म्हणूनच सिक्युरिटी फर्म नुसार हा एक न्युक्लीअर बॉम्ब आहे जो संक्रमित संगणकास नुकसान पोहचवू शकतो. चेकपॉइंट नुसार जगातील पाच पैकी एका कॉर्पोरेट कंपनीच्या नेटवर्कला या मालवेअर ने संक्रमित केले आहे. भारत आणि ब्राझील या देशांमध्ये जवळपास 25 दशलक्ष संगणक संक्रमित झालेले असू शकतात. या व्हायरस मुळे वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर होवू शकतो त्यामुळे काळजी घेणेच सोईचे होईल असे वाटते.

          तुमच्या संगणकास अॅन्टी व्हायरस (अपडेट केलेला) असावा याची खबरदारी घ्यावी आणि जर तुम्ही विंडोज १० वापरत असाल तर अपडेट रहा सोबतच  आभासी पेजेसवर क्लिक करणे टाळणे हेच खबरदारीचे उपाय आपण करू शकतो. 

काळजी घ्या..    


अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?