कॉम्प्युटरच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा कशी करावी ?
राजेश आणि महेश दोघे खास मित्र, दोघे एकाच वर्गात, एकाच कॉलेज मध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत. राजेश कडे पेंटीयम फोअर प्रोसेसर असणारा संगणक त्याच्या वडिलांनी नुकताच खरेदी केला. पहिल्या दिवशी राजेश ने संगणक सुरु केला असता संगणक सुरु होण्यासाठी लागणारा कालावधी खूपच कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानुसार राजेश महेशला म्हणाला, “माझा संगणक खुप लवकर सुरु होतो व विंडोज देखील जलदगतीने सुरु होते,” तुझा संगणक देखील असाच जलद आहे का, महेश? त्यावर महेश म्हणाला मी कधी पाहिले नाही, राजेश त्वरेने म्हणाला, “चल आज चेक करू” लागलीच दोघे महेश च्या घरी गेले आणि त्यांनी महेशचा संगणक सुरु केला. संगणक सुरु होताच त्यांच्या लक्षात आले कि संगणक ला पेंटीयम फोअर चा प्रोसेसर असून देखील राजेश च्या संगणकापेक्षा थोडा उशिरा सुरु होतो आहे.त्यांना त्याचे कारण कळेना, अस का होत असावे याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी महेशच्या मोठ्या भावास, स्वप्नील यास भेटायचे ठरविले. स्वप्नील हा पदवीधर असून त्याने संगणकाचा कोर्स पूर्ण केला आहे आणि आता तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करीत आहे.