कॉम्प्युटरच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा कशी करावी ?
राजेश
आणि महेश दोघे खास मित्र, दोघे एकाच वर्गात, एकाच कॉलेज मध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत
आहेत. राजेश कडे पेंटीयम फोअर प्रोसेसर असणारा संगणक त्याच्या वडिलांनी नुकताच
खरेदी केला. पहिल्या दिवशी राजेश ने संगणक सुरु केला असता संगणक सुरु होण्यासाठी
लागणारा कालावधी खूपच कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानुसार राजेश महेशला
म्हणाला, “माझा संगणक खुप लवकर सुरु होतो व विंडोज देखील जलदगतीने सुरु होते,”
तुझा संगणक देखील असाच जलद आहे का, महेश? त्यावर महेश म्हणाला मी कधी पाहिले नाही,
राजेश त्वरेने म्हणाला, “चल आज चेक करू” लागलीच दोघे महेश च्या घरी गेले आणि
त्यांनी महेशचा संगणक सुरु केला. संगणक सुरु होताच त्यांच्या लक्षात आले कि संगणक
ला पेंटीयम फोअर चा प्रोसेसर असून देखील राजेश च्या संगणकापेक्षा थोडा उशिरा सुरु
होतो आहे.त्यांना त्याचे कारण कळेना, अस का होत असावे याचे उत्तर शोधण्यासाठी
त्यांनी महेशच्या मोठ्या भावास, स्वप्नील यास भेटायचे ठरविले. स्वप्नील हा पदवीधर
असून त्याने संगणकाचा कोर्स पूर्ण केला
आहे आणि आता तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करीत आहे.
संध्याकाळी स्वप्नील कंपनीतून घरी परत येताच राजेश व महेश
दोघेही त्याच्या रूम मध्ये गेले आणि त्यास विचारले, “दादा, आपला संगणक राजेश च्या
संगणका पेक्षा उशिरा का सुरु होतो, दोघांच्याही संगणकात पेंटीयम फोअर प्रोसेसर
आहे, रॅम देखील सारखीच आहे, मग अस का होते आहे ? स्वप्नील म्हणाला, “अरे हो, हो ऑफिस
मधून आल्या आल्या किती प्रश्न ? सांगतो याचे कारण सांगतो”, याचे कारण एकच, महेश ने त्याच्या संगणकाची व्यवस्थित
देखभाल ठेवलीच नसल्याने असे होते आहे, स्वप्नील हे सांगताच महेश म्हणाला, “दादा, काहीही
काय?” मी दररोज संगणक स्वच्छ ठेवतो, पुसतो आणि देखभाल ठेवत नाही म्हणे !!” यावर
स्वप्नील हसला आणि म्हणाला फक्त संगणक स्वच्छ ठेवणे म्हणजे देखभाल नाही महेश,
संगणकात असणाऱ्या विविध युटीलिटीज वापरून त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. राजेश
म्हणाला, “दादा, अशा कोणत्या युटीलिटीज असतात, सांग ना, यावर स्वप्नील म्हणाला, डिस्क-क्लिन
अप, डिस्क-डी-फ्रेगमेंटर या युटीलिटीज तुम्ही वापरू शकता.
स्वप्नील पुढे म्हणाला डिस्क-क्लिन अप
या युटीलिटी द्वारे तुमच्या संगणका वरील अनावश्यक फाईल्स काढून टाकता येतात, मग
त्या तुम्ही डिलीट केलेल्या रि-सायकल बिन मधील फाईल्स असतील अथवा इंटरनेट चा वापर
करीत असताना तयार झालेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या फाईल्स असतील, अशा सगळ्या
फाईल्स डिस्क-क्लिन अप काढून टाकते ज्यामुळे तुमचा संगणकाचा परफॉर्मन्स सुधारण्यास
मदत होते.
अमित बाळकृष्ण कामतकर
तळटीप : Share & Comment करण्यास विसरू नका.
खूप छान माहिती, उपयुक्त माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाधन्यवाद,
हटवाUseful information
उत्तर द्याहटवा