ऑनलाईन शिक्षण पद्धती- एक संधी
गिरीश कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत आहे. गिरीश ला शिक्षण घेताना सतत अपडेट रहायची सवय आहे. एके दिवशी त्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल माहिती घ्यायचे ठरविले पण त्याला सुरुवात कशी करावी हे कळेना. वैदेही त्यांची मोठी बहिण नेहमी त्याला अशा कामात मदत करत असते. संगणक हाताळण्याच्या तुटपुंज्या ज्ञानावर गिरीश प्रयत्न करीत आहे पण त्याला काही जमत नव्हते. वैदेही चे पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता सध्या ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असतानाच वैदेही ने एम.एस.सी.आय.टी. कोर्स चे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिला विविध बाबी इंटरनेट वर कशा शोधायच्या हे अवगत आहे, ते ती कोर्स मध्ये शिकली आहे. गिरीश ला सुरुवात कशी करावी हे कळेना हे वैदेही च्या लक्षात आल्यावर वैदेही ने लागलीच ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल गिरीश ला सांगायला सुरुवात केली, वैदेही म्हणाली, “बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये शिक्षण उपलब्ध करतात, ज्या मध्ये व्हिडीओ कोर्स व वेब कोर्स असे दोन पर्याय उपलब्ध होतात. एन.पी.टेल ( http://nptel.ac.in ) हि एक अशाच प