ऑनलाईन शिक्षण पद्धती- एक संधी
गिरीश
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत आहे. गिरीश ला शिक्षण घेताना सतत
अपडेट रहायची सवय आहे. एके दिवशी त्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल माहिती
घ्यायचे ठरविले पण त्याला सुरुवात कशी करावी हे कळेना. वैदेही त्यांची मोठी बहिण
नेहमी त्याला अशा कामात मदत करत असते. संगणक हाताळण्याच्या तुटपुंज्या ज्ञानावर
गिरीश प्रयत्न करीत आहे पण त्याला काही जमत नव्हते. वैदेही चे पदवी पर्यंत चे
शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता सध्या ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत
असतानाच वैदेही ने एम.एस.सी.आय.टी. कोर्स चे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिला
विविध बाबी इंटरनेट वर कशा शोधायच्या हे अवगत आहे, ते ती कोर्स मध्ये शिकली आहे.
गिरीश ला सुरुवात कशी करावी हे कळेना हे
वैदेही च्या लक्षात आल्यावर वैदेही ने लागलीच ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल गिरीश ला
सांगायला सुरुवात केली, वैदेही म्हणाली, “बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन शिक्षण
पद्धती मध्ये शिक्षण उपलब्ध करतात, ज्या मध्ये व्हिडीओ कोर्स व वेब कोर्स असे दोन
पर्याय उपलब्ध होतात.
एन.पी.टेल (http://nptel.ac.in) हि एक अशाच प्रकारची सेवा देणारी वेबसाईट
आहे. हि भारत सरकार ने ऑनलाईन शिक्षण पद्धतीस चालना देण्यासाठी सुरु केली आहे.
यामध्ये भारतातील सर्व आय.आय.टी. संस्थान मधील प्राध्यापकांचे व्हिडीओ लेक्चर्स
उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या मध्ये आय. आय. टी. मुंबई, दिल्ली,गुवाहाटी,
कानपूर, खरगपूर, मद्रास, रुरकी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.या वेबसाईट वर ९९४
पेक्षा जास्त कोर्सेस अध्ययन करण्याकरिता उपलब्ध आहेत, आणि याचे पेज व्ह्यूज
असणारी संख्या तब्बल २९२ दशलक्ष एवढी आहे. हे ऐकताच गिरीश ला आश्चर्याचा धक्काच
बसला. पुढे वैदेही म्हणाली, हे व्हिडीओज यु ट्यूब चॅनेल वर देखील उपलब्ध असून
त्यावर १९४२८ व्हिडिओ अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. गिरीश अजून एक महत्वाची बाब म्हणजे
यात ४ प्रकारचे प्रमाणपत्र विद्यार्थी पूर्ण करू शकतो.
या वेबसाईटवर विविध क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध केलेले आहे ज्या मध्ये
कृषी, वातावरण विज्ञान, संगणकशास्त्र व तंत्रज्ञान, एरोस्पेस इंजिनियरिंग, ऑटोमोबाईल
इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नोलॉजी, इलेक्ट्रीकल,
इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, मॅनेजमेंट, जनरल इ. शाखा मधील अभ्यासक्रम
अध्ययनासाठी आहेत.
हि सर्व माहिती समजल्यावर गिरीश जाम खुश
झाला कारण त्याला आता नवीन माध्यमातून शिक्षण घ्यायला मिळणार होते. पण त्याच वेळी स्वत:च्या
मर्यादा देखील त्याच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्याने ठरविले, एम.एस.सी.आय.टी
कोर्स करायचा आणि विविध स्टडी स्किल्स आत्मसात करायच्या. सोबत ऑनलाईन शिक्षण
पद्धतीचा उपयोग करून एखाद प्रमाणपत्र मिळवायचं.
अमित
कामतकर
Nice
उत्तर द्याहटवाNice thanks
उत्तर द्याहटवा