गुगल डुडल !!
गुगल आज (२७/०९/२०२३) २५ वर्षाचं होत आहे. आजचे डूडल गुगलचा लोगो चा प्रवास दाखवीत आहे. १९९८ ला सुरु झालेला “वेब वर माहिती हुडकण्याचा” प्रवास निरंतर सुरु आहे. १९९८ ला सगळ्याना भीती होती ती Y2K ची, काय होईल २००० साली? काही कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये कोडींग ज्या प्रकारे केलेले होते त्याप्रमाणे वर्ष बदलेल का कॉम्प्युटर साल १९०० दाखवेल. या भितीने त्यावेळी गुगल ला सर्वात जास्त विझिट्स झाल्या असाव्यात. याहू मेल जास्त वापरलं जायचं त्याचवेळी हॉट मेल हि वापरात होतं पण जिथे कनेक्टीव्हिटी चाच विषय होता तिथे हे सगळं आता सारखं लगेच उपलब्ध होत नव्हतं. सोलापुरात (किंबहुना सगळीकडेच) ९७-९८ दरम्यान इंटरनेट जोडणीला बराच वेळ लागायचा, तेंव्हा डायल-अप कनेक्शन्स असायचे. कधी कधी लागलीच जोडणी व्हायची नाहीतर बराच वेळ कनेक्टीव्हिटी मिळतच नव्हती. मग अशा परिस्थितीत कुठलं "गुगल" आणि काय ? त्यावेळी कॉलेज युवक-युवतींना लायब्ररी शिवाय पर्याय नसायचा, अभ्यासा विषयी काही हवं असल्यास हि मुलं लायब्ररी मध्ये जायची. (आज मुलं जात नाहीत अस मला अजिबात सुचवायचं नाही). आज काहीहि माहिती हवी असली कि ठरलेलं असतं “गुगल करा