फॉलोअर

गुगल डुडल !!



गुगल आज (२७/०९/२०२३) २५ वर्षाचं होत आहे. आजचे डूडल गुगलचा लोगो चा प्रवास दाखवीत आहे. १९९८ ला सुरु झालेला “वेब वर माहिती हुडकण्याचा” प्रवास निरंतर सुरु आहे. १९९८ ला सगळ्याना भीती होती ती Y2K ची, काय होईल २००० साली? काही कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये कोडींग ज्या प्रकारे केलेले होते त्याप्रमाणे वर्ष बदलेल का कॉम्प्युटर साल १९०० दाखवेल. या भितीने त्यावेळी गुगल ला सर्वात जास्त विझिट्स झाल्या असाव्यात. याहू मेल जास्त वापरलं जायचं त्याचवेळी हॉट मेल हि वापरात होतं पण जिथे कनेक्टीव्हिटी चाच विषय होता तिथे हे सगळं आता सारखं लगेच उपलब्ध होत नव्हतं. सोलापुरात (किंबहुना सगळीकडेच) ९७-९८ दरम्यान इंटरनेट जोडणीला बराच वेळ लागायचा, तेंव्हा डायल-अप कनेक्शन्स असायचे. कधी कधी लागलीच जोडणी व्हायची नाहीतर बराच वेळ कनेक्टीव्हिटी मिळतच नव्हती. मग अशा परिस्थितीत कुठलं "गुगल" आणि काय ? त्यावेळी कॉलेज युवक-युवतींना लायब्ररी शिवाय पर्याय नसायचा, अभ्यासा विषयी काही हवं असल्यास हि मुलं लायब्ररी मध्ये जायची. (आज मुलं जात नाहीत अस मला अजिबात सुचवायचं नाही). आज काहीहि माहिती हवी असली कि ठरलेलं असतं “गुगल करायचं”....

सर्च इंजिन हि संकल्पना सर्वाना माहिती करून दिली आणि रुजवली अस म्हणालो तरी वावगं होणार नाही आणि त्याचे श्रेय ‘गुगल’ लाच द्यायला हवं, डेस्कटॉप वर आलेलं गुगल कधी स्मार्ट फोनवर आलं आणि आपली बोटं त्यावर फिरू लागली हे कळालचं नाही. गुगल ची अजून एक खासियत अशी आहे कि एखाद्या दिवसाचे महत्व डूडल स्वरूपात (उत्तम मार्केटिंग टूल) व्यक्त करतात त्यामुळे आपोआपच आपण त्याविषयी माहिती घेण्यासाठी गुगल करतो. आजच हि डूडल पहा खूप सुंदर

आहे. आता तर घरातील बच्चे कंपनी देखील पालकांना सांगतात “गुगल वर सापडेल”, येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये गुगल तुमच्या-आमच्या जीवनातील एक हिस्सा बनू पाहत आहे नव्हे बनलेलं आहे.(हि कंपनी यामध्ये यशस्वी झालेली आहे. अगदी तुमच्या घरात पोहोचली आहे) गुगल तुमचा “असिस्टंट” असं एखादं बिरूद देखील ‘गुगल’ मिरवत आहे !! (आज विविध स्मार्ट फोन वर गुगल असिस्टंट उपलब्ध आहेच) हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. प्रथमतः फक्त इंग्रजी भाषेत (आपल्याकडे) उपलब्ध होणारं गुगल आता प्रादेशिक भाषेत सुद्धा उपलब्ध होत आहे. बाजारात उपलब्ध होणारं प्रत्येक नवीन तंत्रज्ञान लागलीच सोप्या आणि सहज सुविधेसह गुगल त्याच्या युजर्स ना देवू करतं हे त्यांच्या यशाचं सूत्र असावं अस वाटतं.

गुगल सूट – ज्यामध्ये तुमच्या गरजेची प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज मिळून जाते. अगदी ई-मेल सुविधे पासून ते गुगल असिस्टंट पर्यंत सबकुछ , मग त्यात ऑपरेटिंग सिस्टम असो कि ब्राउजर (प्रोग्राम्स जे वेब अॅक्सेस पुरवितात), कॅलेंडर, मॅप (ज्याचा उपयोग प्रवासात आपण सगळेच करतो), गुगल डॉक्स, स्प्रेडशीटस्, प्रेझेंटेशन ई. सोबत हँगआउट, ड्यूओ, गुगल क्लाऊड, गुगल मिट या सुविधा आपण सगळेच वापरतो. (काही समजून तर काही नकळत पणे). वॉइस टायपिंग ही सुविधा गुगल डॉक्स मध्ये उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. गुगल स्वत:स आणि युजर्सना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करतं असा अनुभव आहे.

स्पर्धात्मक युगात एक उत्तम केस स्टडी म्हणून गुगल चा वापर विद्यार्थी करू शकतात. गुगल ने त्याच्या प्रतिस्पर्ध्या बरोबर गुणवत्ता ठेवून स्पर्धा कशी केली याचा अभ्यास विद्यार्थ्यांना किंबहुना प्रत्येक व्यावसायिकास प्रेरक ठरू शकतो अस वाटतं.


गुगल ला “डूडल” शुभेच्छा !!


अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


इतर विषयावरील लेख वाचण्यासाठी क्लिक करावं.                 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?