सुजाण पालकत्व : II
शुभम
श्रीकांत घाणेकर, एक गोंडस मुलगा, अभ्यासात हुशार, विविध खेळात निपुण. शुभमच्या घरी
आई वडील आणि लहान बहीण, शुभम लहानपणा पासून लाडात वाढलेला, शुभम चे वडील सरकारी
नोकरीस होते आणि आई गृहिणी, शुभम साधारण चवथी मध्ये असेल, घरा शेजारी मित्र मंडळी
कांही त्याच्या वयाची, काही त्याच्या पेक्षा वयाने मोठी, पण सगळी संध्याकाळी
शाळेतून आली की धमाल मस्ती करायचे. शुभमची जी मित्र मंडळी वयाने मोठी होती
त्यांच्या कडे खिशात कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे असतं, एके दिवशी गिरीश, शुभम
चा मित्र त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, “शुभम, माझ्याकडे बघ किती पैसे
आहेत?” , याचं शुभम ला खूप अप्रूप वाटलं, गिरीश कडे पैसे आहेत आणि आपल्याकडे नाहीत
यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला, काय करावे त्यास कळेना, थोडा वेळाने स्वत:ची समजून
घालून शुभम खेळण्यात गुंग झाला. त्या दिवशी रात्री झोपताना शुभम ला सारखा गिरीश
डोळ्या समोर येत होता त्यास झोप काही येईना, पण त्यादिवशी कसा बसा शुभम झोपला.
दुसरे दिवशी सगळ्या मित्रांचे दुपारीच भेटायचे ठरले होते त्याप्रमाणे सगळे मित्र
गोळा झाले आणि खेळ सुरु झाला.
त्यादिवशी
शनिवार होता, शुभमच्या बाबांना सुट्टी होती त्यामुळे बाबा घरीच होते, शुभम बाबांना
सांगून खेळायला घरा बाहेर पडला, घरा बाहेर सगळे मित्र त्याची वाट पहात होते,
क्रिकेट चा खेळ खेळायचा असं ठरल आणि खेळ सुरु झाला, खेळ सुरु असतानाच गिरीश पुन्हा
शुभम जवळ आला व त्याने स्वत:च्या खिशात हात घालत पैसे काढले आणि शुभम दाखवत
म्हणाला, “आहेत का तुझ्याकडे पैसे?” आता मात्र शुभमला आव्हान दिल्यासारखे वाटले
त्याने लागलीच घराकडे मोर्चा वळविला, घरात शिरताच बाबांना पैसे मागायचे म्हणून
त्याने हाक मारली,”बाबा, ओ बाबा”, पण बाबांनी काही उत्तर दिले नाही, बाबा झोपले
होते, आता काय करावं ? असा प्रश्न शुभम ला पडला, आज गिरीश ला उत्तर द्यायचे हे
त्याने नक्की केले होते, पण कसे हा प्रश्न त्याच्या समोर होता. त्याच्या डोक्यात
एक विचार आला, अर्थातच अयोग्य ! त्याने बाबांच्या खिशातील पैसे घ्यायचे ठरविले... एक
प्रकारची चोरीच ती ! आई घरात नव्हती आणि बाबा झोपलेले, त्यांना न सांगता त्यांच्या
खिशातील पैसे घ्यायचे म्हणजे चोरीच म्हणावी लागेल यास, शुभम ने खुर्ची घेतली आणि
बाबांच्या खिशातून सुट्टे पैसे काढले, साधारण पाच ते दहा रुपये असावेत, हे सुट्टे
पैसे खिशात घातले आणि थेट गिरीश जवळ गेला आणि त्यास खिसा दाखवत म्हणाला, “हे बघ ,
माझ्याकडे हि पैसे आहेत”,
शुभम योग्य
वागला कि अयोग्य यापेक्षा यातून एक बोध पालकांनी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.
मुलं कॉपी कॅट असतात हेच यावरून लक्षात येतं. मोठी माणसे जे करतात जसे करतात
त्याप्रमाणे नक्कल करायची एवढचं त्यांना माहिती असते. हि नक्कल करताना ती कितपत
योग्य आहे एवढी बुद्धी लहान वयात नसते हेच
खरे. पण पालक म्हणून आपण काही बाबींची काळजी घेतली तर खूप काही बदल घडू शकतो असं
वाटते. पालक म्हणून आपले वागणे-बोलणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष असणे गरजेचे कारण
मुलं याचीही नक्कल करू शकतात नव्हे करतातच ! बाबा आई शी अथवा आई बाबाशी रागात कसे
बोलतात हे मुलांनी पाहिले असल्यास मुलांना राग आला कि ते तसेच वागतात, हे तुम्हीही
अनुभवले असेल. या सोबतच आजकाल आपल्या पाल्याचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत याची
माहिती पालकांना असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पाल्याचे मित्र/ मैत्रीण समवयस्क
आहेत कि त्याच्या पेक्षा मोठे आहेत याची माहिती पालकांना असणे गरजचे आहे. वयातील
फरक पाल्यास बऱ्याच वेळा चुकीच्या मार्गावर घेवून जाण्याची शक्यता नाकारता येत
नाही. नको असणाऱ्या बाबी पाल्याच्या कानावर पडून त्यातून पाल्य नवीनच काही शिकू (नको
असलेल्या बाबी) शकतात. त्यामुळे आपले पाल्य कुणा सोबत खेळत आहे अर्थात स्मार्ट
फोनच्या जमान्यात मैदानी खेळ कमीच झालेले आहेत, पण स्मार्ट फोन वर देखील कोणती गेम
अथवा व्हिडियो सुरु आहे याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. पाल्य नुसतेच
खेळायला बाहेर गेला आहे, एवढी माहिती पुरेशी नाही, लक्ष असणे आवश्यक असे सुचवावे
वाटते.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा